कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
स्किलिंग, रिस्कीलिंग आणि अपस्किलिंगमध्ये प्रशिक्षकांची भूमिका आवश्यक आणि निर्णायक - नरेंद्र मोदी
Posted On:
10 SEP 2020 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचार्यसमदार 2020 (कौशल्य पुरस्कार) च्या दुसर्या आवृत्ती दरम्यान कौशल्य परिसंस्था निर्माण करण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल देशातील प्रशिक्षकांना केलेले लेखी संबोधन सामायिक केले आहे.
दीर्घावधी प्रशिक्षण, अल्पकालीन प्रशिक्षण, जनशिक्षण संस्था, प्रशिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण या पाच प्रकारांतर्गत 92 कौशल्य प्रशिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले.

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने (एमएसडीई) आज कौशल्यआचार्यसमदार 2020 (पुरस्कार) च्या दुसर्या आवृत्तीसाठी डिजिटल परिषद आयोजित केली होती. देशाची कौशल्य परिसंस्था तयार करण्यात आणि भविष्यासाठी सज्ज कार्यदल तयार करण्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध क्षेत्रातील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रशिक्षकांसाठी दिलेल्या संदेशाबद्दल लिहिलेले भाषण सामायिक करण्यात आले. पंतप्रधानांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कौशल्य प्रशिक्षण घेऊन आजच्या तरूणांच्या आकांक्षा जिवंत राहतील यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
आपल्या लेखी भाषणात, पंतप्रधानांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की जागतिक मागणीशी सुसंगत मनुष्यबळ तयार करणे हा सरकारचा कौशल्य कार्यक्रम आहे आणि या दृष्टीने मजबूत कौशल्य विकास परिसंस्था सक्षम करण्यासाठी अनेक प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत संपूर्ण राष्ट्र एकत्र आले आहे आणि आपण बदलत्या काळात जगत आहोत त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात कुशल तरुणांची वाढती मागणी दिसून येत आहे. आपल्या तरुण कामगारांसाठी सध्याच्या आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करण्याची आणि ‘आत्मनिर्भर भारत’ चे मजबूत आधारस्तंभ होण्याची ही एक संधी आहे. आपण स्किलिंग, रीस्किलिंग आणि अपस्किलिंगवर पुरेसा भर देणे आवश्यक असून या प्रयत्नात, प्रशिक्षक आणि तज्ञांची भूमिका अत्यावश्यक आणि निर्णायक आहे. पंतप्रधान म्हणाले की, माझा विश्वास आहे की आज ज्या प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे ते इतर अनेकांना प्रेरणा देतील आणि आपल्या तरुणांच्या आणि देशाच्या विकासासाठी खूप योगदान देत राहतील.

उद्योजकता प्रशिक्षण, राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना (एनएपीएस), जन शिक्षण संस्थान (जेएसएस), प्रधान कौशल विकास योजना (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत अल्प मुदत प्रशिक्षण, प्रशिक्षण संचालनालयांतर्गत दीर्घकालीन प्रशिक्षण यासारख्या भौगोलिक भूभागांतील विविध पार्श्वभूमीवरील एकूण 92 प्रशिक्षकाना . आज झालेल्या डिजिटल परिषदेत गौरवण्यात आले.

उद्योजकता प्रशिक्षण श्रेणीअंतर्गत 3 प्रशिक्षकांना, जन शिक्षणसंस्था अंतर्गत 15 प्रशिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. तसेच 14 प्रशिक्षकांना अल्प मुदतीच्या प्रशिक्षणांतर्गत आणि 44 प्रशिक्षकांना दीर्घकालीन प्रशिक्षण अंतर्गत सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत (एनएपीएस) योगदानाबद्दल मान्यता मिळालेल्या 15 कॉर्पोरेट्ससह 44 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
YouTube: https://www.youtube.com/channel/UCzNfVNX5yLEUhIRNZJKniHg
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653187)