विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मशीन लर्निंग उपायांतून भौगोलिक-संसाधनांचे संशोधन सुलभ


वैज्ञानिकांनी तंत्रज्ञान-आधारीत (मशिन लर्निंग आधारीत) 3D भूंकपीय माहितीच्या स्वयंचलित विवेचनासाठी व्यावहारिक दृष्टीकोन विकसित केला

Posted On: 05 SEP 2020 10:14PM by PIB Mumbai

 

वैज्ञानिकांना भूकंपाची कारणे शोधणे विशेषतः परिसर भूगर्भीयदृष्ट्या क्लिष्ट असल्यास मानवी विवेचन करणे कठीण जाते, आता त्यांना मशिन-लर्निंग आधारीत माहितीचा स्वयंचलित विवेचन उपाय प्रदान करण्यात आला आहे.

भू-भूगर्भशास्त्र, पात्रांची (बेसिन) उत्क्रांती, स्त्रोत अन्वेषण आणि भूकंप  (सिस्मोजेनेसिस) कारणीभूत प्रक्रिया समजून घेण्यासाठी पृष्ठभागाच्या भूकंपाच्या आकडेवारीवरून उप-पृष्ठभाग (सबसरफेस) भूगर्भीय वैशिष्ट्यांचा प्रभावी शोध घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी, भूकंपीय माहितीचा सतत ओघ, गहन संगणकीय प्रक्रिया आणि कंटाळवाणे विवेचन होते. पण, आता उच्च-कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीमुळे प्रचंड माहितीचे (डेटा) कमी वेळेत विवेचन करण्यात येते. ज्यावेळी भूगर्भीय पृष्टभाग क्लिष्ट असतो त्यावेळी मानवी विवेचन कठीण जाते आणि विपुल माहितीचा (डेटा) साठा निर्माण होतो.

ही प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी (WIHG) या स्वायत संसथेच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान आधारीत (मशीन लर्निंग) 3D भूकंपीय माहितीचे स्वयंचलित विवेचन विकसित केले आहे.         

तैलयुक्त (पेट्रोली फेरस) असलेले न्यूझीलंडमधील कॅन्टरबरी खोरे हे याचे उत्तम उदाहरण आहे. याठिकाणी बशीच्या-आकाराचे मॅग्मॅटिक सिल्स क्रेटासियस ते ईओसिनमध्ये (सुमारे 145 ते 33.9 दशलक्ष वर्षांपूर्वीचा भौगोलिक काळ) जोडल्या जातात, परिणामी सारणीयुक्त चौकटीच्यावर (सिल्स) हायड्रोथर्मल व्हेन्टच्या आत सामावले जाते. 

या अभ्यासानुसार, सिल्स अनुक्रमे 1.5 km2 ते 17 km2 क्षेत्र व्यापते. शिवाय, प्रिन्सिपल सिल्सच्या टोकापासून वाहणारे चुंबकीय द्रव हायड्रोथर्मल व्हेंट्सद्वारे 800 मीटर उंचीपर्यंत वाढतात आणि धातुमय थरावर असलेला गाळ उचलला जातो.  

हे कार्य भौगोलिक समस्या सोडविण्यासाठी मशीन लर्निंग वापरण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि हिमालयासारख्या जिवंत डोंगराळ भागात जटिल भौगोलिक प्रक्रिया समजून घेण्याविषयी खात्री देते.

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651690) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi