वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सुट्टया हिऱ्यांसाठी प्रथमच आभासी पद्धतीने खरेदीदार विक्रेता बैठक
Posted On:
04 SEP 2020 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2020
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव सुरेश कुमार यांनी सुट्ट्या हिऱ्यांसाठीच्या खरेदी विक्रीसाठीच्या पहिल्याच आभासी बैठकीचे उद्घाटन केले. जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीतून खरेदीदार आणि प्रदर्शनकर्त्यांना व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरुन व्यवसाय जोडण्यासाठी आणि संवाद साधण्याची संधी मिळेल.
याप्रसंगी बोलताना सुरेश कुमार यांनी कौन्सिलच्या प्रत्यनांचे कौतुक केले आणि म्हणाले, आभासी पद्धतीने खरेदी-विक्री हा पुढे जाण्यासाठीचा नवीन नॉर्मल आहे. महामारीच्या परिस्थितीत, आपण प्रतीक्षा न करता, विश्वासाने आणि सुरक्षित उपाययोजनांच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी आभासी पद्धतीचा वापर करत आहोत. ते म्हणाले की, मला आनंद आहे की व्यापारी निर्यातीच्या बाबतीत हे भारतातील सर्वांत आशादायक क्षेत्र आहे. महामारीचा व्यापाराला फटका बसला आहे, मात्र अमेरिका, चीन आणि युरोपीय बाजारपेठेतील हरित अंकुरांमुळे निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. ही या क्षेत्रासाठी एक नवीन सुरुवात आहे, त्यासाठी आभासी व्यासपीठाचा विस्तृतपणे वापर करणे आवश्यक आहे आणि भिन्न देश आणि क्षेत्रातील खरेदीदारांशी संपर्क साधण्यासाठी आपल्या नियमित विपणन क्रियेचा एक भाग बनविणे आवश्यक आहे.

उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना जीजेईपीसीचे अध्यक्ष कोलीन शाह म्हणाले, महामारीच्या परिस्थितीने आपल्याला आऊट ऑफ बॉक्स विचार करायला भाग पाडले. जरी महामारीने बळी घेतले असले तरी, यातून काही सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. चीन आणि अमेरिकेची बाजारपेठ जोमाने पुनरागमन करत आहे, याचा आपल्या निर्यातीसाठी लाभ करुन घेता येईल.
जीजेईसीपीसीच्या भविष्यकालीन योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले, उत्तम प्रतीचे हिरे मिळविण्याकरिता भारत प्राधान्यीकृत ठिकाण आहे आणि इनबिल्ट सुरक्षा उपायांसह आभासी पद्धतीच्या बैठकीसाठी अनुकूल आहे. हिरे आणि सोन्याचे दागिने, प्लॅटिनम दागिने आणि कॉस्च्युम दागिन्यांसाठी नजीकच्या भविष्यात अशा आभासी बैठका घेण्याचा विचार आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651461)