रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांनी एसआयएएमच्या 60 व्या वार्षिक संमेलनाला संबोधित केले


वाहन निर्मिती उद्योगावर रोजगारनिर्मितीची मोठी जबाबदारी : गडकरी

Posted On: 04 SEP 2020 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020

 
वाहन निर्मिती उद्योगाचा जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे आणि सर्वाधिक रोजगार असलेले क्षेत्र आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्यांनी आज एसआयएएमच्या 60 व्या वार्षिक संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत या उद्योगाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. समाज आणि अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने या क्षेत्रातील समस्यांचा निपटारा करण्याबद्दल त्यांनी आश्वस्त केले.

नजीकच्या भविष्यात रस्ते सुरक्षा लक्ष्य गाठण्याबाबत मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, अ‍ॅटोमाबाईल क्षेत्राने यासंदर्भात चांगली प्रगती केली आहे. वाहन निर्मात्यांनी वाहनांची सुरक्षा जसे की क्रॅश नियमन, एबीएस एअरबॅग्स, सीट बेल्ट रिमांयंडर, रिव्हर्स पार्किंग असिस्ट, व्हीटीएस इ. या नियमनामुळे भारतीय वाहननिर्मिती क्षेत्राला जागतिक वाहन निर्मिती उद्योगाबरोबर आणले आहे.   

हे भारतीय वाहननिर्मिती उद्योगाच्या असाधारण समन्वयातून आणि कटिबद्धतेमुळे शक्य झाल्याचे गडकरी म्हणाले. वाहननिर्मिती उद्योगाने बीएस- VI निकषांबाबत झेप घेतल्याबद्दल गडकरींनी कौतुक केले.

गडकरी यांनी माहिती दिली की, सध्या प्रतिदिन सरासरी 30 किलोमीटरने रस्तेबांधणी होत आहे, महामार्ग बांधणी प्रतिदिन सरासरी 40 किलोमीटरने होत आहे. भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमाकांचा रस्त्यांचे जाळे असलेला देश आहे.

केवळ वाहने सुरक्षित करुन अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होणार नाही, ते म्हणाले, यासाठी व्यवस्थित रस्ते आराखडा आणि अंमलबजावणी केली पाहिजे. सुसज्ज आणि भविष्याला डोळ्यासमोर ठेवून हे केले पाहिजे. ते म्हणाले, गतिशीलतेचे भविष्य पायाभूत सुविधांमध्ये आहे. त्यानुसार, महामार्ग/एक्सप्रेस मार्गांची निर्मिती रस्ते आणि लेन चिन्हांकीत करुन करण्यात येत आहे.

सध्याचे युग हे डिजीटल असून जीवनाच्या अनेक अंगांशी जोडले आहे. डिजीटलीकरणाचा प्रभाव लक्षात घेत, मोटार वाहन सुधारणा कायदा 2019 मध्ये डिजीटल तंत्रज्ञान आणि वाहतूक सुरक्षा आणि नियमांच्या अंमलबजावणीला चालना देण्यात आली आहे. उद्योगाच्या सहकार्यामुळे, फास्टॅगच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक टोल वसुली केली जात आहे. वाहन पोर्टलशी जोडल्यामुळे,  अखंड आणि सुरळीतपणे फास्टॅग सुरु आहे.

ते म्हणाले, पायाभूत विकास आणि वृद्धीकडे केवळ जोडवाहनांकडेच नाही तर इलेक्ट्रीक आणि पर्यायी इंधन वाहनांकडेही पाहिले जात आहे. त्यांनी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले, तसेच देशभर नियमितपणे इथेनॉल इंधनाची उपलब्धता करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या वाहनांची संख्या वाढल्यास चार्जिंग स्टेशन्स, इंधन स्टेशन्स यांची संख्या वाढत जाईल. आपल्याला एकात्मिक इंधन आराखडा निश्चित करुन टप्प्याटप्याने विविध इंधन पर्यायांचा आणि पायाभूत सुविधांविषयी प्रयत्न करावा लागेल, असे  ते म्हणाले.

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651369) Visitor Counter : 177