अर्थ मंत्रालय
2020-21 आर्थिक वर्षातील जुलै 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या खात्यांचा मासिक आढावा
Posted On:
31 AUG 2020 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
जून 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या मासिक खात्यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
याची ठळक वैशिष्ट्ये: पुढीलप्रमाणे –
केंद्र सरकारला जुलै 2020 पर्यंत 2,32,860 कोटी रुपये (2020-21 या आर्थिक वर्षाच्या एकूण प्राप्तीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या (बीई) 10.4%) मिळाले असून यात 2,02,788 कोटी रुपये कर महसूल (नेट टू सेंटर), 24,614 कोटी रुपये बिगर कर महसूल आणि 5,458 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवल यांचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवल प्राप्तीमध्ये कर्ज वसुली (5,455 कोटी रुपये) आणि निर्गुंतवणूक (3 कोटी रुपये ) समाविष्ट आहेत.
केंद्र सरकारकडून करातील वाटा म्हणून 1,76,009 कोटी रुपये राज्य सरकारांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा वाटा 23,903 कोटी रुपयांनी कमी आहे.
केंद्र सरकारचा एकूण खर्च 10,54,209 कोटी रुपये आहे (संबंधित बीई 2020-21 च्या 34.65% ), यापैकी 9,42,360 कोटी रुपये महसूल खात्याचे आणि 1,11,849 कोटी रुपये भांडवली खात्याचे आहे. एकूण महसूल खर्चापैकी,1,98,584 कोटी रुपये व्याज देयकांवर आणि 1,04,638 कोटी रुपये प्रमुख अनुदानांवर खर्च झाला आहे.
M.Chopade /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650123)
Visitor Counter : 275