सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादनाचे अंदाज
Posted On:
31 AUG 2020 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), 2020-21 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादना(जीडीपी) चा जीडीपीच्या खर्चाच्या घटकांच्या संबंधित त्रैमासिक अंदाजासह स्थिर मूल्य (2011-12) आणि चालू मूल्य अंदाज जाहीर केला आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत स्थिर मूल्य (2011-12) साठी जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, वर्ष 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत ते 35.35 लाख कोटी रुपये होते. 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील 5.2 टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत यामध्ये 23.9 टक्क्यांची घसरण निदर्शनाला आली आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत चालू मूल्य साठी जीडीपी 38.08 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, वर्ष 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत ते 49.18 लाख कोटी रुपये होते. 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील 8.1 टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत यामध्ये 22.6 टक्क्यांची घसरण निदर्शनाला आली आहे.
पहिल्या तिमाहीचा अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्राप्त झालेल्या वर्ष 2019-20 च्या रबी हंगामातील (जे जून 2020 मध्ये संपले) कृषी उत्पादनावर; प्रामुख्याने पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभागातील पशुधन क्षेत्रासाठी दूध, अंडी, मांस आणि लोकर यांच्या उत्पादनांचे निर्धारित लक्ष्य, आणि मत्स्यपालन विभागातील माशांचे उत्पादनाचा डेटा यावर आधारित आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी); महालेखा नियंत्रक (सीजीए) द्वारे नियंत्रित केंद्र सरकारच्या खर्चाचा मासिक लेखा, एप्रिल ते जून 2020-21 या कालावधीसाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) द्वारे नियंत्रित राज्य सरकारांच्या खर्चाचा मासिक लेखा वापरण्यात आला आहे. अंदाजपत्र तयार करताना एप्रिल ते जून 2020-21 या कालावधीतील रेल्वे, रस्ते, हवाई आणि जल वाहतूक इत्यादी, वाहतुकीच्या क्षेत्रासह दळणवळण, बँकिंग आणि विमा यासारख्या प्रमुख क्षेत्रांची कामगिरी विचारात घेतली आहे. बीएसई / एनएसईकडून प्राप्त आकडेवारीच्या आधारे एप्रिल ते जून 2020-21 दरम्यान कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी लक्षात घेतली गेली आहे.
अंदाजानुसार वापरलेल्या मुख्य निर्देशकांमधील टक्केवारी बदल खाली सूचीबद्ध आहेत:
M.Chopade /S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650107)
Visitor Counter : 330