गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
मेट्रो रेल्वे सेवा 7 सप्टेंबरपासून सुरु होणार
Posted On:
29 AUG 2020 10:48PM by PIB Mumbai
मेट्रो रेल्वे सेवा 7 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणार आहे. यासंदर्भातील प्रमाणक कृती प्रर्क्रिया (एसओपी) प्रसिद्ध करण्यात आली असून केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय 1 सप्टेंबर 2020 रोजी सर्व मेट्रो कंपन्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून याला अंतिम स्वरुप देणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एसओपीसंदर्भात सध्याची वास्तविकता सर्व व्यवस्थापकीय संचालकांनी लक्षात घ्यावी. बैठकीत सर्व सूचना विचारात घेऊन त्यानूसार एसओपी निश्चित करण्यात येईल.
****
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649806)
Visitor Counter : 90