भूविज्ञान मंत्रालय

हवामान विभागाकडून संपूर्ण देशभरामध्ये अति मुसळधार पावसाविषयी  गंभीर चेतावणी


पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागात मुसळधार  ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2020 5:48PM by PIB Mumbai

 

देशाच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामानशास्त्र विभागाने संपूर्ण देशभरामध्ये हवामान आणि अतिवृष्टीविषयी गंभीर चेतावणी दिली आहे. या विभागाने देशात होणा-या पर्जन्यवृष्टीविषयी, आगामी दोन-तीन दिवसांचा विस्तृत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार  मध्य प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये आणि  महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये दि. 27 तारखेला आणि 28 या तारखांना तसेच छत्तीसगड राज्यांतल्या काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दि.27 ऑगस्ट (पहिला दिवस) -

मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता- मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात , विदर्भ परिसरामध्ये आणि छत्तीसगड राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तेलंगणा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस होईल. तसेच जम्मू आणि काश्मिर, लडाख, गिलगिठ-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आणि मेघालय, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग आणि यनम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल आणि ओडिशा या राज्यांत, काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे.

 

दि.28 ऑगस्ट (दुसरा दिवस) -

पूर्व-मध्य प्रदेशातल्या काही भागामध्ये अति जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागांतही काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, अरूणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, गुजरात राज्य, कोकण आणि गोवा तसेच तेलंगणा या राज्यांमध्येही अति पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

 

दि.29 ऑगस्ट (तिसरा दिवस) -

मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता- पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात राज्य, कोकण आणि गोवा या परिसरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, हरियाणा, चंदिगड आणि दिल्ली, पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

-------

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1648980) आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil