कृषी मंत्रालय
कोणत्याही प्रभावित भागात टोळ किंवा नाकतोडे आढळले नाहीत
अन्न व कृषी संघटनेच्या अद्ययावत टोळ स्थितीनुसार भारत-पाकिस्तान ग्रीष्मकालीन प्रजनन क्षेत्रात झुंडीचे स्थलांतर होण्याचा धोका जवळजवळ कमी झाला आहे
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2020 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2020
11 एप्रिल 2020 पासून 25 ऑगस्ट 2020 पर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातील टोळ परिमंडल कार्यालया (एलसीओ) द्वारे 2,79,066 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण कारवाई करण्यात आली आहे. 25 ऑगस्ट, 2020 पर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार या राज्यांतील 2,87,374 हेक्टर क्षेत्रावर राज्य सरकारकडून टोळधाड नियंत्रण कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रभावित भागात काल टोळ किंवा नाकतोडे आढळले नाहीत. असे असले तरीदेखील, राजस्थान व गुजरातमध्ये पुरेशी वाहने व फवारणी उपकरणांसह सर्वेक्षण व नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. आज (26.08.2020), एलसीओद्वारे टोळ शोधून काढण्यासाठी आणि त्या असल्यास ती दूर करण्यासाठी सखोल सर्वेक्षण कारवाई सुरू आहे.
अन्न व कृषी संघटनेच्या 24 ऑगस्ट 2020 रोजीच्या अद्ययावत टोळ स्थितीनुसार भारत-पाकिस्तान ग्रीष्मकालीन प्रजनन क्षेत्रात झुंडीचे स्थलांतर होण्याचा धोका जवळजवळ कमी झाला आहे. अन्न व कृषी संघटने (एफएओ) द्वारे दक्षिण-पश्चिम आशियाई देशांच्या (अफगाणिस्तान, भारत, इराण आणि पाकिस्तान) वाळवंट टोळांवर साप्ताहिक आभासी बैठक आयोजित केली जाते. आतापर्यंत दक्षिण-पश्चिम आशियाई देशांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या 23 आभासी बैठका घेण्यात आल्या आहेत.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1648838)
आगंतुक पटल : 133