संरक्षण मंत्रालय

पाटणा येथे डीआरडीओच्या 500 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

Posted On: 24 AUG 2020 9:17PM by PIB Mumbai

 

पाटणा येथे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) उभारलेल्या 125 आयसीयू बेडसह 500 खाटा असलेल्या कोविड रुग्णालयाचे  उद्घाटन आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले. बिहटा येथे नव्याने बांधलेल्या ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये असलेले हे रुग्णालय डीआरडीओने  दिल्ली छावणी येथे बांधलेल्या 1000  बेडच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या धर्तीवर बांधले आहे.

पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (पीएम केअर्स ) न्यासाने रुग्णालयासाठी निधी दिला आहे. असेच आणखी एक रुग्णालय मुझफ्फरपूरमध्ये उभारण्यात येईल.

रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वीजवातानुकूलन यंत्रणा, पाणीपुरवठा, अग्निशमन व डिझेल जनरेटर बॅकअप, प्रत्येक बेडला ऑक्सिजन पाईपिंग, लिफ्ट्स आणि मॉर्ग या सुविधांसह याच ठिकाणी असलेल्या सात मजली ईएसआयसी हॉस्पिटलचा समावेश आहे.

डीआरडीओने डॉक्टरांची खोली, अभ्यागत कक्ष आणि रिसेप्शनसह प्रशासकीय ब्लॉक , व्हेंटीलेटरसह आयसीयू बेड्स, 125  मॉनिटर्स: 375 सामान्य बेड:  10 केएल क्रायोजेनिक लिक्विड मेडिकल ऑक्सिजन व्हेसल ; प्रत्येक बेडला ऑक्सिजन पुरवठा; पीपीई किट्स आणि सॅनिटायझर्स; सीसीटीव्ही देखरेख  यंत्रणा; उपभोक्ता वस्तूंसह स्वच्छता  सेवा; फार्मसी, मेडिकल पॅथॉलॉजी लॅब, खानपान सेवालॉन्ड्री सेवारुग्णवाहिका सेवा; संगणकीकृत रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली, ; इलेक्ट्रिकल सिस्टम, एअर कंडिशनिंग सिस्टम, डीजी सेट्स इत्यादी विशिष्ट सेवांसाठी व्यावसायिक व्यवस्थापन आणि देखभाल कर्मचारी.यासारख्या  पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत;

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालनालयाने  (डीजीएएफएमएस) रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी इत्यादी सुविधा पुरवल्या आहेत.

बिहार सरकार दररोज 2 लाख लिटर पाणी, 6 एमव्हीए विद्युत पुरवठा आणि रुग्णालयासाठी सुरक्षा व्यवस्था विनामूल्य पुरवणार आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648348) Visitor Counter : 268