रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
वाहन नोंदणी कागदपत्रांच्या मालकीसंदर्भातील अधिसूचनेवर रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सूचना मागवल्या
Posted On:
20 AUG 2020 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 18 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम (सीएमव्हीआर 1989) च्या फॉर्म 20 मध्ये सुधारणा करण्यासाठी एक मसुदा (जीएसआर 515(ई)) जारी केला आहे. वाहनांच्या नोंदणीकरता सीएमव्हीआर अंतर्गत आवश्यक असलेल्या विविध अर्जांमध्ये वाहनाच्या मालकीच्या तपशीलाची माहिती योग्य प्रकारे प्रदर्शित होत नसल्याचे मंत्रालयाला आढळले आहे. त्यामुळे मंत्रालयाने वाहनाच्या मालकीचा योग्य तपशील मिळवण्यासाठी सीएमव्हीआर 1989च्या फॉर्म 20 मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे:-
“4A. मालकीचे स्वरुप, स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, धर्मादाय संस्था, वाहनचालक प्रशिक्षण संस्था, दिव्यांगजन"
(a) जीएसटी सवलत धारक
(b) जीएसटी सवलत घेत नाही
शैक्षणिक संस्था
आस्थापना सरकारी उपक्रम वैयक्तिक
स्थानिक प्राधिकरण
एकापेक्षा जास्त मालक इतर
पोलिस विभाग
राज्य विभाग
राज्य परिवहन
महामंडळ/ विभाग”.
त्याशिवाय दिव्यांगजनांना( शारीरिक विकलांग व्यक्ती) मोटर वाहनांची खरेदी/ मालकी/ परिचालन यांसाठी सरकारच्या विविध योजनांतर्गत जीएसटीचे लाभ आणि इतर सवलती दिल्या जात आहेत.
सीएमव्हीआर 1989 अंतर्गत सध्याच्या तपशीलानुसार मालकीच्या माहितीमध्ये दिव्यांगजन नागरिकांची माहिती प्रदर्शित होत नाही. त्यामुळे अशा दिव्यांगजन नागरिकांना सरकारच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध असलेले अवजड उद्योग विभागाकडून दिले जाणारे आर्थिक प्रोत्साहन भत्त्याच्या योजनांसारखे लाभ मिळवता येत नाहीत. प्रस्तावित सुधारणांमुळे मालकीसंदर्भातील तपशील योग्य प्रकारे प्रदर्शित होतील आणि दिव्यांगजनांना विविध योजनांचे लाभ मिळू शकतील. संबंधित सूचना किंवा अभिप्राय संयुक्त सचिव(एमव्हीएल), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ट्रान्स्पोर्ट भवन, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली- 110001(ईमेल : jspb-morth[at]gov[dot]in) या पत्त्यावर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पाठवता येतील.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647411)
Visitor Counter : 189