संरक्षण मंत्रालय
नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव
Posted On:
14 AUG 2020 11:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
नौसेना पदक (शौर्य)
कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ)
भारतीय नौदलाच्या मिग-29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी. त्यांच्याकडे 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आपात कालीन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मिग-676 उड्डाणावेळी त्यांच्या धाडसी आणि निःस्वार्थी निर्णयाने जमिनीवरील अनेक व्यक्तींचे प्राण वाचले. 16 नोव्हेंबर 2019 रोजी 1147 वाजता, कॅप्टन श्योकंद यांनी दाबोळी विमानतळावर प्रशिक्षणार्थीसमवेत उड्डाण घेतले. 1200 फूट उंचीवर अचानक पक्ष्यांचा मोठा थवा मिग-676 ला धडकला, पायलटने अनेक प्रयत्न करुनही पक्षांनी विमानाला धडका देणे सुरुच ठेवले, काही पक्षी दोन्ही बाजूच्या इंजिनमध्ये घुसल्यामुळे इंजिला आग लागली. कॅप्टन श्योकंद यांनी तातडीने प्रशिक्षणार्थ्याकडून सुत्रे स्वतःच्या हाती घेतली, रेडिओवर तातडीची घोषणा केली आणि विमान सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकामे झालेले डावे इंजिन आणि उजव्या इंजिनला आणि अॅक्सेसरी गिअरबॉक्सला लागलेल्या आगीमुळे पायलटच्या लक्षात आले की, विमान झुआरी तेल भांडार आणि दक्षिण गोव्यातील दाट लोकवस्तीच्या भागात कोसळण्यापूर्वी आपल्या हाती केवळ काही सेकंद आहेत. त्यावेळी कमालीचे प्रसंगावधान दाखवत विमान निर्जन स्थळाकडे वळवले आणि स्वतःचे आणि प्रशिणार्थीचे प्राण तर वाचवले शिवाय अनेक लोकांचे जीवन आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होण्यापासून टाळले. या कार्यामुळे कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ) यांना नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आला.
नौसेना पदक (शौर्य)
कमांडर धनुश मेनन (05556-A)
कमांडर धनुष मेनन यांची बेळगावी, कर्नाटक येथे, नेव्हल डिटॅचमेंट कमांडर म्हणून नियुक्ती असताना 08 ऑगस्ट 2019 रोजी ‘ऑपरेशन वर्षा राहत’ अंतर्गत हलोळी गावात दोन ज्येष्ठ नागरीक झाडावर अडकल्याची माहिती मिळाली. कमांडर धनुष एयू 704 (एएलएच) या हेलिकॉप्टरवर होते. मात्र, नेमक्या जागेचा शोध लागत नव्हता. कमी दृश्यमान, मुसळधार पाऊस, धोकादायक अडथळे अशी ही आव्हानात्मक मोहीम होती. शोधमोहिमेच्या ठिकाणी उच्च शक्ती प्रक्षेपित वाहिन्या (५ मीटर) पर्यंत होत्या. झाडावर अडकलेल्या व्यक्ती तीन दिवसांपासून भुकेल्या होत्या, त्यामुळे त्या रेस्क्यू बास्केटपर्यंतही पोहचू शकत नव्हत्या. पावसामुळे नदी खवळलेली असल्यामुळे हवाई बचावाशिवाय पर्याय नव्हता. नौदल अधिकाऱ्याने निःस्वार्थी भावनेने आणि असमान्य शौर्याने जोरदार वाऱ्यातही हेलिकॉप्टर 125 फूट अशा अतिशय कमी उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला आणि 25 मिनिटांच्या संघर्षानंतर दोघांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्यांच्या या कार्याबद्दल कमांडर धनुष मेनन (05556 A) यांना नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे.
नौसेना पदक (शौर्य)
हरिदास कुन्डू, सीएचए (एफडी) 130956-B
हरिदास कुन्डू, सीएच (एफडी), एअरक्रू डायव्हर म्हणून बेळगावी, कर्नाटक येथे नौदलाच्या ऑपरेशन वर्षा राहत मोहिमेत 08 आणि 09 ऑगस्ट 19 रोजी सहभागी होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचवले, या असामान्य कार्याबद्दल हरिदास कुन्डू, सीएचए (एफडी) 130956-B यांना नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे.
नौसेना पदक (शौर्य)
नवीन कुमार, एलएस (UW), 230889-Z
नवीन कुमार, हे नाविक काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या एका गटामध्ये होते. यांनी नौदलाच्या उच्च परंपरा राखत स्वःच्या दलाचे रक्षण केले. त्यांच्या निःस्वार्थी कार्याबद्दल, नवीन कुमार एल एस (युडब्ल्यू) यांना नौसैना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आला आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645918)
Visitor Counter : 182