पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या "पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उदघाटन करणार

Posted On: 12 AUG 2020 2:34AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्यामंचाचे उद्घाटन करणार आहेत.

अलिकडच्या काही वर्षांत सीसीबीडीटीने थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. मागील वर्षी कॉर्पोरेट टॅक्सचे दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते आणि नव्या उत्पादन युनिटसाठी हे दर 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. लाभांश वितरण कर' देखील हटविले गेले.

कर सुधारणांअंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचेसुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सीबीडीटीने कित्येक पुढाकार घेतले आहेत. यामध्ये, नव्याने सुरू केलेल्या कागदपत्र ओळख क्रमांकाद्वारे ( डीआयएन) अधिकृत माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणणेयाचा समावेश आहे. याअंतर्गत विभागाच्या प्रत्येक संवादामध्ये संगणकाद्वारे उत्पन्न झालेला वेगळा कागदपत्र ओळख क्रमांक असतो. वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरण पत्र मान्य होणं अधिक सुलभ होण्यासाठी आयकर विभाग आधीच माहिती भरलेली आयकर विवरण पत्र सादर करत आहे.स्टार्टअप्सचे अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत.

प्रलंबित कर विवादांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने प्रत्यक्षकर, 'विवाद से विश्वास अधिनियम, 2020' अंतर्गत आणला असून याअंतर्गतसध्या विवादांची प्रकरणे सोडवण्यासाठी माहिती पत्र भरून घेतली जात जातआहेत. करदात्यांच्या तक्रारी / खटल्यांमध्ये प्रभावी कपात व्हावी यासाठी विविध अपील न्यायालयात विभागीय अपील दाखल करण्यासाठी प्रारंभिक आर्थिक मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा देय देण्याच्या पद्धतींना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आयकर विभाग हे उपक्रम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. इतकेच नव्हे, तर कोविड कालावधीत करदात्यांचे अनुपालन सुलभ करण्यासाठीही विभागाने विविध प्रयत्न केले ज्या अंतर्गत रिटर्न भरण्यासाठी वैधानिक अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे आणि करदात्यांच्या हाती तरलता किंवा रोखतावाढवण्यासाठी परतावा जलदगतीने देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या "पारदर्शक करपद्धती -प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उद्घाटन भविष्यात कर सुधारणांचामार्ग आणखी सुकर करेल..

आयकर विभागाचे अधिकारी यांच्या व्यतिरिक्त विविध चेंबर्स ऑफ कॉमर्स, ट्रेड असोसिएशन, चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन आणि प्रमुख करदाते कार्यक्रमालाउपस्थित राहणार आहेत.. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यावेळी उपस्थित राहतील.

 

U.Ujgare/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645300) Visitor Counter : 310