ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत (टप्पा–II) राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या उचल आणि वितरणाचा आढावा


सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी पीएमजीकेवाय-II अंतर्गत जुलै आणि ऑगस्टसाठी अतिरिक्त मोफत अन्नधान्य वितरण ऑगस्ट 2020च्या अखेरीस पूर्ण करणे अपेक्षित

Posted On: 11 AUG 2020 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020


अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव यांनी आज पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत (टप्पा-II) अन्नधान्य (तांदूळ / गहू) आणि हरभरा यांची उचल आणि वितरणाच्या स्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न व नागरी पुरवठा प्रभारी सचिवांसह आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणाची पाहणी केली. 

अन्न आणि सामाजिक वितरण विभागाच्या सचिवांनी प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी जुलै आणि ऑगस्ट 2020 महिन्याच्या धान्य उचल आणि वितरणाच्या स्थितीबाबत आणि सध्या सुरू असलेल्या संपाच्या काळात सर्व एनएफएसए लाभार्थ्यांना पुरेसे धान्य वेळेवर उपलब्ध होत असल्याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय, अन्न आणि सामाजिक वितरण विभागाच्या सचिवांनी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत, एनएफएसए अंतर्गत किंवा कोणत्याही राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) योजनेत समाविष्ट नसलेल्या सर्व स्थलांतरित / अडकलेल्या स्थलांतरितांना मोफत अन्नधान्याच्या वितरण प्रगतीचा आढावा घेतला. ज्याचा वितरण कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

काही राज्ये वगळता, नियमित एनएफएसए अन्नधान्य आणि पीएमजीकेवाय अन्नधान्यांच्या नियोजनाचे वितरण चक्र / नियमित नियोजनाच्या समायोजनामुळे पीएमजीकेवाय अंतर्गत मोफत अन्नधान्यचे वितरण हे काहीसे उशीराने होत आहे आणि इतर तार्किक अडचणी लक्षात घेता, बहुतेक राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये धान्य उचलण्याची आणि वाटप करण्याची प्रगती समाधानकारक आहे. जवळजवळ सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी पीएमजीकेवाय-II अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिरिक्त मोफत धान्य वितरण ऑगस्ट 2020 अखेर पूर्ण करणे अपेक्षित आहे. 

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645217) Visitor Counter : 201