कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते कृषी मेघचा शुभारंभ


नवभारताच्या डिजिटल शेतीच्या दिशेने कृषी मेघ हे पुढचे पाऊल आहे - तोमर

Posted On: 11 AUG 2020 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी मेघ (राष्ट्रीय कृषी संशोधन आणि  शिक्षण प्रणाली-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस) आणि केव्हीसी अल्युनेट (कृषी विश्वविद्यालय माजी छात्र नेटवर्क) आणि उच्च कृषी शैक्षणिक संस्थाना ऑनलाईन मान्यता प्रणाली   (एचईआय)सुरू केली.

नवीन शैक्षणिक धोरण  2020 च्या धर्तीवर देशातील राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अधिक संबंधित आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करण्याच्या  उद्देशाने केंद्र सरकार -जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे यावर  केंद्रीय मंत्र्यांनी  भर दिला . देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आणि जगभरात कुठंही सहज उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन-आधारित माहितीचे   तत्काळ  डिजिटल पद्धतीने  जतन  करण्याची गरज तोमर यांनी व्यक्त केली.  शेतीत खासगी गुंतवणूक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला. कृषी मेघ हे   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताच्या संकल्पनेतील डिजिटल शेतीच्या दिशेने उचललेलं पुढचे पाऊल आहे असे ते म्हणाले.

2-3 ICAR संस्थांना आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे बनवावी असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले.  तसेच संशोधकांना वास्तविक माहिती उपलब्ध करुन देण्यावरही त्यांनी भर दिला.

केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी हैदराबाद येथील आयसीएआर-नॅशनल अकॅडेमी ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट  येथील आपत्ती निवारण केंद्राबरोबर नवी दिल्ली येथील आयसीएआर-भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचे आयसीएआर-डेटा केंद्रचे एकात्मीकरण  करणार्‍या कृषी मेघची स्थापना केल्याबद्दल आयसीएआरची प्रशंसा केली.  हा उपक्रम कृषी क्षेत्रातील क्रांती असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. त्रिलोचन मोहपात्र, सचिव (डीएआरई ) आणि महासंचालक (आयसीएआर) यांनी आयसीएआर राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (एनएएचईपी) अंतर्गत विविध श्रेणीतील  58 विद्यापीठांना सहाय्य पुरवण्यात आल्याचे सांगितले.  विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये  सुमारे  120 प्राध्यापकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाबरोबरच  सुमारे  377विद्यार्थ्यांना  (यूजी, पीजी आणि पीएचडी)  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण / इंटर्नशिप  मिळाली  आहे. इंटरनेट तंत्रज्ञानाचा / डिजिटलायझेशनचा अधिकाधिक वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. डॉ. महापात्र यांनी कृषी मेघाची मुख्य वैशिष्ट्ये अधोरेखित केली. ही वैशिष्ट्ये  प्रतिमा विश्लेषण, पशुधनामधील  रोग ओळखणे इत्यादी माध्यमातून  व्यापक  शिक्षण आधारित अप्लिकेशन  तयार करणे आणि तैनात करण्यासाठी एआय / डीप लर्निंग सॉफ्टवेयर / टूल्स किटने  सुसज्ज आहेत असे ते म्हणाले. कृषी मेघ हा डिजिटल इंडियाचा एक नवीन अध्याय आहे ज्यायोगे शेतकरी, संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्ते यांना आयसीएआर संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेल्या डिजिटल स्वरुपात शेती, संशोधन, शिक्षण आणि विस्तारासंदर्भात अद्ययावत आणि नवीन  माहिती उपलब्ध झाली आहे.

तत्पूर्वी, आपल्या स्वागतपर  भाषणात डॉ.आर.सी. अग्रवाल, उपसंचालक (कृषी शिक्षण), आयसीएआर यांनी कार्यक्रमाच्या मुख्य उद्दिष्टाबाबत माहिती दिली. कृषी विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सोशल नेटवर्किंगच्या कल्पनेचा परिणामस्वरूप केव्हीसी अल्युनेट विकसित करण्यात आल्याचे अधोरेखित केले. यामुळे सर्व 74 कृषी विद्यापीठांचे माजी विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधू शकतील आणि विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्लेसमेंटमध्ये मदत करू शकतील असे ते म्हणाले. 

एडवर्ड विल्यम ब्रेस्न्यान, कृती दल प्रमुख , वर्ल्ड बँक यांनी  आयसीएआरचा उपक्रम परिवर्तनात्मक असल्याचे म्हटले आहे. यामुळे कृषी शिक्षण व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून येईल.  आयसीएआर आणि  त्याच्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले होते. 

कृषी मेघची ठळक  वैशिष्ट्ये

  1. राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीच्या (एनएआरईएस) डिजिटल कृषीच्या  सेवा आणि पायाभूत  गरजा भागवण्यासाठी 2012 मध्ये उभारलेले विद्यमान डेटा सेंटर (आयसीएआर-डीसी) क्लाऊड संगणकीय पायाभूत सुविधांसह बळकट केले जाईल.
  2. आयसीएआर -डीसी आणि आयसीएआर-कृष मेघ हे घटक असलेले एनएआरईएस-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस ई-ऑफिस, आयसीएआर-ईआरपी ,एज्युकेशन पोर्टल, केव्हीके पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅप्स, आयसीएआर संस्था संकेतस्थळे, अ‍ॅकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टम, माजी विद्यार्थी पोर्टल, यूजी आणि पीजी स्तरावरचे  ई-कोर्सेस इ. सारख्या महत्वपूर्ण ऍप्लिकेशनच्या तैनातीसह एनएआरईएस प्रणालीच्या वाढत्या आयटी गरजा पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आणि गतिशील व्यासपीठ उपलब्ध करतात. 
  3. एनएएचईपी अंतर्गत, विद्यमान आयसीएआर डेटा सेंटरची व्याप्ती  कृषी विद्यापीठांना त्यांची संकेतस्थळे आणि आयटी उपायांसाठी होस्ट करण्यास सक्षम बनवण्यासाठी वाढवण्यात आली आहे
  4. सध्याच्या कोविड -19  परिस्थितीमध्ये, आयटी ऍप्लिकेशनच्या 24x7 उपलब्धतेमुळे घरून काम  करणे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  वैज्ञानिक सहकाऱ्यांशी सहकार्य  करणे शक्य झाले आहे.
  5. जोखीम कमी करण्यासाठी, ई-गव्हर्नन्सची गुणवत्ता, उपलब्धता आणि प्रवेशयोग्यता, संशोधन वाढवण्यासाठी , देशातील कृषी क्षेत्राचा विस्तार आणि शिक्षण वाढविण्यासाठी एनएएआरएम हैदराबाद येथील आयसीएआर-कृषी मेघ आयसीएआर-आयएएसआरआय नवी दिल्ली येथील आयसीएआर-डेटा सेंटरसह जोडण्यात आले आहे   
  6. एनएएआरएम , हैदराबादची निवड निवडण्यात आली आहे कारण ती वेगळ्या भूकंपक्षेत्रात आहे.   हैदराबाद  योग्य आहे कारण कुशल आयटी मनुष्यबळ तसेच अनुकूल हवामानासह कमी आर्द्रता पातळी देखील उपलब्ध आहे जी डेटा सेंटर वातावरणात नियंत्रित करता येते. 
  7. या नवीन केंद्रामध्ये प्रतिमा विश्लेषणाद्वारे रोग आणि कीटक ओळख, परिपक्वता ओळखणे आणि प्रतिमा विश्लेषणाद्वारे फळे पिकविणे, पशुधनातील रोग ओळखणे इत्यादी सखोल शिक्षण आधारित ऍप्लिकेशनची निर्मिती आणि ते तैनात अद्ययावत एआय / डीप लर्निंग सॉफ्टवेयर / टूल्स किट आहेत.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645177) Visitor Counter : 449