उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभा सचिवालय कर्मचाऱ्यांसाठी आर.के. पुरम येथे 40 निवासस्थाने बांधण्यात येणार;


अध्यक्ष वेंकैया नायडू यांनी 46 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी केली

Posted On: 10 AUG 2020 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांना जाणवणारी घरांची चणचण लक्षात घेता, राष्ट्रीय राजधानीतील सेक्टर 12 या मोक्याच्या ठिकाणी 40 निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.

राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी उपराष्ट्रपती निवासातून दूरस्थ पद्धतीने फलकाचे अनावरण करत या 46 कोटींच्या  निवासी प्रकल्पाची  आज पायाभरणी केली.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि नागरी हवाई वाहतूक  मंत्री  हरदीप सिंग पुरी या प्रसंगी उपस्थित होते.

सचिवालय कर्मचाऱ्यांना निवासांची समस्या भेडसावत असतानाही 2003 मध्येच सचिवालयाला सुपूर्द केलेली ही मोक्याची जागा उपयोगात आणण्यासाठी  एवढा उशीर लागल्याबद्दल नायडू यांनी अनावरणानंतर काळजी व्यक्त केली.  या घरबांधणी प्रकल्पाला 17 वर्षांचा विलंब केल्यामुळे आता जास्त खर्च सचिवालयाला करावा लागणार आहे जो टाळता आला असता. सामाजिक- आर्थिक –न्यायिक व्यवस्थापकीय अशी अनेक जळमटं लागल्यामुळे ही मोक्याच्या जागा वापरात न येता पडून राहिली.

या जागेचा उपयोग करण्यासंदर्भातील दिरंगाईबद्दल आपला दृष्टीकोन व्यक्त करताना नायडू म्हणालेकेंद्रसरकारी कर्मचाऱ्यांची घरांची गरज भागण्याचे प्रमाण 67 % असताना, राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांची घरांची मागणी ही 38 % एवढ्याच प्रमाणात भागते.  सचिवालय कर्मचाऱ्यांसाठी  टाईप- III and टाईप-IV प्रकारातील घरांची अनुपलब्धता 72 % नुसार आहे.  आर के पुरम या 4024 चौ.मीटर भूभागावर बांधण्यात येणाऱ्या गृहबांधणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात टाईप- III प्रकारातील 32 आणि टाईप-IV प्रकारातील 28 क्वार्टर्स बांधण्यात येतील असे नायडू यांनी सांगीतले. सध्या 1,400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 536 घरे सध्या उपलब्ध आहेत.

कामकाजाच्या लांबलचक आणि दमवणाऱ्या वेळांमुळे, विशेषतः संसद सत्र सुरू असताना कामाच्या ठिकाणाजवळ निवासस्थान असले तर त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाप्रती भरीव योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे सांगत नायडू यांनी राज्यसभा सचिवालय कर्मचाऱ्यांना जाणवणाऱ्या घरांच्या अनुपलब्धतेवर खंत व्यक्त केली.

NBCC ने या गृहबांधणी प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी सांगितला असला तरी , घरांची कमतरता बघता हा प्रकल्प वेळेआधी पूर्ण होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे सांगत केंद्रीय गृहबांधणी आणि शहरी व्यवहार आणि नागरी हवाई वाहतूक  मंत्री  हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभा अध्यक्षांना आश्वस्त केले.  शहरी भागात 2016 मध्ये  सुरू झालेले  हौसिंग फॉर ऑल मिशन उत्कृष्ट प्रगती करत आहे असे त्यांनी नमूद केले. यामधून 1.07 कोटी घरांना याआधीच मंजूरी दिली गेली आहे तर 1.12 कोटी घरांचे उद्धिष्ट लवकरच म्हणजे 2022 या नियोजित वर्षाआधीच साध्य होईल.  या मिशन अंतर्गत शहरी भागात 35 लाख घरे बांधली गेली आणि ती वितरीतही करण्यात आली, याशिवाय आणखी 65 लाख घरेबांधणीच्या टप्प्यात आहेत.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644910) Visitor Counter : 189