विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
हिमालयातील भू औष्णिक झऱ्यामधून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन;
हिमालय पर्वतात विविध तापमान आणि रासायनिक स्थितीतील सुमारे 600 भू औष्णिक झरे
Posted On:
10 AUG 2020 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
भूगर्भातून ज्वालामुखीतून बाह्यावतरणात होणारे उत्सर्जन, भूगर्भात होणाऱ्या हालचाली( फौल्ट झोन)आणि भूऔष्णिक व्यवस्थेमुळे जागतिक कार्बन चक्र परिणाम होतो, ज्याचे पृथ्वीवर त्वरित आणि दीर्घकालीन परिणाम होत असतात. हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत, सुमारे 600 भूऔष्णिक झरे आहेत, ज्यांचे तापमान आणि रासायनिक स्थितीतही वैविध्य आहे.
कार्बनचक्र आणि त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ याचा विचार करतांना या झऱ्यांची, प्रादेशिक आणि जागतिक हवामान बदलातली भूमिका आणि भूगर्भातील हालचालींमुळे होणारी वायू उत्सर्जनाची प्रक्रिया यांचाही विचारहोणे आवश्यक आहे.
हिमालयातल्या गढवाल प्रदेशात, सुमारे 10,000 चौरस किलोमीटर्स प्रदेशात हे भूऔष्णिक झरे असून, त्यांच्या पाण्यातून कार्बनडायऑक्साईड चे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था, ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी’ ने हे संशोधन केले आहे.त्यांनी याचा सविस्तर अभ्यास करुन या झऱ्यांमधून वायूउत्सर्जन होत असल्याचे निश्चित केले. यातून अंदाजे कार्बनडाय ऑक्साईड वायू उत्सर्जन (पाण्यात मिसळला गेलेला वायू मुक्त होणे) चे वार्षिक प्रमाण जवळपास 7.2 ×106 mol इतके आहे.
वैज्ञानिक प्रकाशन ‘इन्व्हायरोमेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार, यासंदर्भात, भूऔष्णिक झऱ्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, हिमालयाच्या गर्भात असलेल्या कार्बोनेट खडकाच्या मेटामोर्फिक डीकार्बोनेशन आणि मॅग्नेशियम तसेच ऑक्सिडेशन ऑफ ग्राफएट, मुळे उत्सर्जित होतो. या भूऔष्णिक पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे परिणामतः सिलीकाच्या खडकांची झीज होते.आयसो टॉपिक अध्ययनातून हे ही स्पष्ट झाले आहे, भू औष्णिक जलातील उल्कापाताच्या स्त्रोतातून हे घडत असते.
हिमालयातील गढवाल भागातल्या 20 भूऔष्णिक जलाचे नमुने घेऊन वैज्ञानिकांच्या पथकाने, गोळा केले. WIHG च्या पथकाने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणानुसार, या भूऔष्णिक झऱ्यामधून दरवर्षी 7.2 × 106 mol कार्बन उत्सर्जन होण्याची शक्यता आहे. या अध्ययनातून व्यक्त करण्यात आलेल्या जलप्रवाहामधून उत्सर्जित होणारा कार्बनडायऑक्साईडमध्ये (अंदाजे 1011/ mol/प्रतिवर्ष) हिमालयाला आणि जमिनीवर होणाऱ्या ज्वालामुखीला (1012 mol/प्रतिवर्ष) वर उचलण्याची क्षमता आहे. पृथ्वीवरील वातावरणात मिसळणाऱ्या जागतिक कार्बन उत्सर्जनाचे मोजमाप करतांना, अशा CO2 चा हिशेब करणेही आवश्यक आहे.
M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644826)
Visitor Counter : 234