आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात, सलग 4 थ्या दिवशी 24 तासांत 6 लाख नमुन्यांची चाचणी
2.27 कोटींपेक्षा अधिक नमुन्यांची चाचणी
प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या वाढली, आज 16,513 चाचण्या
Posted On:
07 AUG 2020 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 07 ऑगस्ट 2020
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने, देशात सलग चौथ्या दिवशी दररोज 6 लाखांपेक्षा अधिक कोविड-19 नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. प्रयोगशाळांचे विस्तारलेले जाळे आणि सुविधा यामुळे गेल्या 24 तासांत देशात 6,39,042 नमुना चाचणी करण्यात आल्या आहेत. देशात सध्या 2,27,88,393 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या वाढून ती आता 16,513 एवढी झाली आहे.
दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या साप्ताहिक सरासरीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन, 14 जुलै 2020 रोजी 2.69 लाख एवढी संख्या होती, ती 6 ऑगस्ट 2020 रोजी 5.66 लाख एवढी झाली.
14 जुलै 2020 रोजी संचयी चाचण्यांची संख्या 1.2 कोटी होती ती वाढून 6 ऑगस्ट 2020 रोजी 2.2 कोटी एवढी झाली. याच काळात सकारात्मकता दर 7.5% वरुन 8.87% झाला. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे सकारात्मकता दरात वाढ झाली, पण दिल्लीतील अनुभवाने स्पष्ट केले की, त्वरीत अलगीकरण, ट्रॅकींग आणि वेळीच रुग्णालय व्यवस्थापन या उपायाने हे कमी होईल.
देशभरातील प्रयोगशाळांचा विस्तार करण्यात येत आहे. सध्या देशात 1,383 प्रयोगशाळा आहेत, यात 931 प्रयोगशाला सरकारी आणि 452 खासगी आहेत. यात:
• रिअल-टाईम आरटी पीसीआर आधारीत चाचणी प्रयोगशाळा: 701 (सरकारी: 423 + खासगी: 278)
• ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 573 (सरकारी: 476 + खासगी: 97)
• सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 109 (सरकारी: 32 + खासगी: 77)
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
* * *
D.Wankhede/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644244)
Visitor Counter : 202