भूविज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी क्वांटम तंत्रज्ञान आणि विज्ञान यातील उद्योगांच्या सहभागाचे महत्त्व केले अधोरेखित
Posted On:
06 AUG 2020 3:32PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST) सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांनी द असोसिएटेड चेंबर ऑफ काँमर्स ,म्हणजेच असोचेमने नुकत्याच आयोजित केलेल्या इंडिया क्वांटम तंत्रज्ञान आणि विज्ञान परीषदेत (IQTC2020) ,झालेल्या 'क्वेस्ट टुवर्डस इंडियाज क्वांटम सुप्रीमसी" या विषयावर झालेल्या वेबिनार मधे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळात उद्योग विश्वाने सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
क्वांटम आणि उद्योग 4.0 यांचे भविष्य यात सायबर आणि डिजिटल या क्षेत्रांबरोबर संचारण,संगणिकीकरण,निर्णय घेणे आणि त्यानुसार कृती करणे या सर्व घटकांचा समावेश असावा, हे त्यांनी निदर्शनास आणले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू केलेल्या उपक्रमांबद्दल बोलताना प्रो.शर्मा म्हणाले," तीन वर्षांपूर्वी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने फ्रंटीयर टेक्नॉंलॉजी नावाचा एक नवीन विभाग सुरू केला आणि त्याद्वारे सायबर फीजिकल सिस्टीम्स यावर नवीन उपक्रम सुरू केले".या मोहिमेद्वारे देशात 21 केंद्रे आणि 4संशोधन पार्क्स सुरू झाली असून ती क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन याच्या कार्यासाठी वास्तूरचना आणि संचालन केंद्रे म्हणून कार्यरत होतील आणि उद्योग क्षेत्राचे सबलीकरण करतील.
भारत सरकारच्या वतीने क्वांटम टेक्नॉलॉजी (QT),ज्याला नँशनल मिशन आँन क्वांटम टेक्नॉलॉजी म्हटले जाते हा 8,000 कोटी रुपये खर्च करून सुरू केलेला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.विज्ञान तंत्रज्ञान विभागाने क्यूटी या विषयावर भारतात कार्य करणाऱ्या सर्व लोकांना आणि घटकांना एकत्र आणून त्यांना सर्वंकष प्रकल्प अहवाल लिहावयास सांगितले आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रो. शर्मा पुढे म्हणाले, की विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या या दोन्ही मोहीमा ज्ञान प्राप्त करणे ,त्या ज्ञानाचे प्रोटोटाईप डिझाईन बनवून रुपांतर करणे आणि त्या निमित्ताने विज्ञान ,तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती यांच्या पर्यावरणाला आत्मनिर्भर भारताचा भाग बनविणे यासाठी सक्षम आहेत.इंडिया क्वांटम टेक्नॉलॉजी परीषद ही संपूर्ण जगावर कोविडचा घाला झालेला असताना समाधानकारक पर्याय आहे..
*****
U.Ujgare/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643752)