भूविज्ञान मंत्रालय

कोकण(मुंबईसह), गोवा आणि मध्य महाराष्ट्रात (घाट परिसर) 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता


Posted On: 05 AUG 2020 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


भारतीय हवामानखात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र/प्रादेशिक हवामान विभागानुसार:

  • उत्तर ओडिशा आणि नजीकच्या गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालवरील कमी-दाबाचे क्षेत्र तसेच संबंधित चक्रवात नैऋत्येकडे सरकला आहे. तो आगामी 2 दिवसांत वायव्येकडे सरकून त्याचा जोर हळूहळू ओसरेल.    
  • दक्षिण गुजरातवरुन चक्रवाती अभिसरणापर्यंत मध्यम आणि उच्च उष्णकटिबंधीय स्तरावर कमी-दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. 
  • अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 50-60 किमी प्रती तास अशा जोरदार पश्चिमी वाऱ्यांमुळे, पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी 2 दिवस राहणार आहे.   

 

वरील घटकांमुळे निर्माण होणारी परिस्थिती:

गुजरात,मुंबईसह कोकण, गोवा  आणि मध्य महाराष्ट्रात  6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 05 ऑगस्ट आणि गुजरात राज्यात 05 & 06 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  

दक्षिण पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ आणि गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालचा भाग या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल.  

 

अधिक तपशील आणि हवामान अपडेटसाठी आयएमडी, नवी दिल्लीच्या संकेतस्थळाला भेट द्या.

http://www.imd.gov.in/pages/allindiawxfcbulletin.php

जिल्हास्तरीय इशाऱ्याच्या माहितीसाठी कृपया हवामानखात्याच्या राज्य पातळीवरील संकेतस्थळांना भेट द्या.

 


* * *

G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643620) Visitor Counter : 136