पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

ब्रिक्स ही सर्वात बहुमोल आणि उपयुक्त भागीदारींपैकी एक - प्रकाश जावडेकर


ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीत पर्यावरण सुधार आणि कमीत कमी अपव्यय करणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आवाहन

Posted On: 30 JUL 2020 11:57PM by PIB Mumbai

 

पाच ब्रिक्स (ब्राझील,रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांचे पर्यावरण मंत्री सहाव्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीला 30 जुलै 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले. ही बैठक रशियाच्या अध्यक्षतेखाली झाली.

भारताचे प्रतिनिधित्व करताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, भारत ब्रिक्सला अत्यंत महत्व देतो. ते पुढे म्हणाले की ब्रिक्स समूहातील देशांच्या आकांक्षा एकसमान आहेत आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी परस्परांमध्ये जी सर्वात उत्तम पद्धत असेल ती समजून घेऊन अंगिकारायला हवी.

राष्ट्रांनी काही गोष्टी अग्रक्रमाने राबवण्याची गरज आहे तसेच ब्रिक्स सामंजस्य करार लवकरात लवकर अंमलात येणे आवश्यक आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. सर्व देशांनी आपण राबवत असलेल्या पर्यावरण व्यवस्थापनाची सर्वोत्तम पद्धत व्यासपीठावर मांडली पाहिजे. भारत यासाठीचे व्यासपीठ पुरवायला तयार असल्याचे यावेळी पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले.

शाश्वत शहरे व्यवस्थापन, समुद्रातील कचराप्रश्न, हवा प्रदूषण आणि नद्यांचे शुद्धीकरण याबाबतीत भारताने केलेल्या प्रयत्नांची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली

समता, सामायिक परंतु कमी-जास्त जबाबदाऱ्यांची विभागणी, अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान यांची भागीदारी हे जागतिक हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या तसेच त्याच्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने निघू शकणाऱ्या तोडग्याचे आधारस्तंभ आहेत यावर भारताचा विश्वास आहे. भारत हा पॅरिस कराराच्या आणि त्याद्वारे येणाऱ्या हवामान संबंधी जबाबदाऱ्यांचा स्वीकार करतो असेही त्यांनी सांगितले.

हवामान प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न अधोरेखित करताना जावडेकर म्हणाले, 2015 मध्ये भारताने 10 शहरांमध्ये हवामान दर्जा तपासणी यंत्रणा बसवल्या. आज या यंत्रणा 122 शहरांमध्ये आहेत. भारताने 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) आणल्याची माहितीही त्यांनी दिली. धूलिकणामुळे होणारे प्रदूषण 2017 पेक्षा 2024 मध्ये वीस ते तीस टक्क्यांनी कमी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

2020 नंतर जैवविविधता चौकट राबवण्यासाठी ब्रिक्स देशांनी समूह म्हणून काम करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीआधी ब्रिक्स कार्यकारी गटाची बैठक झाली.

भारत हा 2021 मध्ये ब्रिक्स बैठकीच्या अध्य़क्षपदी असेल. त्या ब्रिक्स पर्यावरण बैठकीत सहभाग घेण्याचे आमंत्रण यावेळी जावडेकर यांनी ब्रिक्‍स देशांना दिले. यानंतर ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांचे निवेदन प्रसिद्ध झाले. कृतिप्रवण आणि दूरदृष्टी राखणारे निवेदन असा गौरव करत सर्व देशांनी याचे स्वागत केले, ज्यातून ब्रिक्स देशांची एकमेकांसोबत काम करण्याची आणि उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याची उत्सुकता दिसून येते

 

संयुक्त निवेदन इथे वाचा

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642589) Visitor Counter : 135