युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

Posted On: 25 JUL 2020 10:55PM by PIB Mumbai

 

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणा भूषवणार असल्याची  घोषणा   केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरियाणाचे मुख्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज केली. टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. हरियाणातल्या पंचकुला इथे या स्पर्धा होणार आहेत.शनिवारी 25 जुलैला हरियानाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग, क्रीडा सचिव रवी मित्तल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महा संचालक संदीप प्रधान यांच्या उपस्थीतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही घोषणा करण्यात आली.

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे सोपवण्यात आल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचे रीजीजू यांनी सांगितले.आपल्या पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धांमुळे देशातल्या तळापर्यंतच्या कौशल्याचा शोध घेता आला यातून  पुढे आलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हा खेळाचा महाकुंभ आहे.  हरियाणाला भक्कम क्रीडा संस्कृती लाभली असून या राज्याने देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत.

भागीदारीविषयी बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले की स्टार स्पोर्ट्स  ने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा देशाच्या क्रीडा कॅलेंडरच्या वार्षिक कार्यक्रमात आणल्या आहेत. जेव्हा एखादा युवा खेळाडू स्वतःला राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहतो तेव्हा केवळ खेळाडूलाच नव्हे तर याचे प्रसारण पाहणाऱ्या इतर युवकांनाही क्रीडा विश्व आपली कारकीर्द घडवण्यासाठीचे क्षेत्र म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असते.ही भागीदारी सुरु रहात असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले.

आधीच्या तीन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरीयानाने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. 2019 आणि 2020च्या या स्पर्धात राज्याने दुसरे स्थान  (200 पदके 2020मध्ये आणि  159 पदके 2019मध्ये ) तर  2018 मध्ये 102 पदके (38सुवर्ण , 26रौप्य, 38कांस्य) पदकांच्या कमी कमाई सह सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.

****

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641305) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri