सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कुंभार समुदायाला सक्षम करणे हे सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल: अमित शाह

Posted On: 24 JUL 2020 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

 

समाजात उपेक्षित राहिलेल्या कुंभार समुदायाला सक्षम करत त्यांना आत्मनिर्भर अभियानाचा भाग बनवून घेण्याच्या दृष्टीने, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 100 प्रशिक्षित कुंभारांना इलेक्ट्रिकची चाके प्रदान केली. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेअंतर्गत, या कुंभारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, शाह यांचा मतदारसंघ गांधीनगर मधील बलवा गावातील 100 कुंभारांना ही चाके देण्यात आली.

कुंभार सशक्तीकरण योजनेमुळे उपेक्षित असलेल्या कुंभार समुदायाच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, त्याचवेळी कुंभार कले सारख्या पारंपरिक भारतीय कलेचे जतन देखील केले जाईल.

 

कुंभारांना आपली उत्पादने विकता यावीत यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था, रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन शाह यांनी दिले. अशा योजनांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांचे त्यांनी कौतुक केले.

खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले की आतापर्यंत अशी 17,000 इलेक्ट्रिक चाके देशभरातील कुंभारांना देण्यात आली असून त्याचा सुमारे 70000 लोकांना लाभ मिळाला आहे.  

सध्या देशात दररोज 2 कोटी कुल्हड बनविले जातात. कुंभार अत्यंत नियोजनबध्ह पद्धतीने हे कुल्हड 400 रेल्वे स्थानकांवर विकतात, असेही सक्सेना यांनी सांगितले.  


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641021) Visitor Counter : 154