कृषी मंत्रालय
राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार येथे 11 एप्रिल ते 19 जुलै दरम्यान 3.70 लाख हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण मोहीम
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2020 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे टोळधाड नियंत्रण कार्यालयांकडून 11 एप्रिल ते 19 जुलै दरम्यान 1,86,787 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण मोहीम राबवण्यात आली. 19 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार राज्य सरकारांनी 1,83,664 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण मोहीम राबवली. राजस्थानमध्ये टोळधाड नियंत्रणासाठी बेल हेलिकॉप्टर्सचा वापर करुन हवाई फवारणी क्षमता वृद्धिंगत केली आहे, तसेच वाळवंटी प्रदेशात भारतीय हवाई दलाने टोळधाड नियंत्रणासाठी एमआय-17 हेलिकॉप्टरची चाचणीही केली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि हरियाणा राज्यात पीक नुकसानीची नोंद नाही. तथापी, राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) टोळधाडीसंबंधी अफगाणिस्तान, भारत, इराण आणि पाकिस्तान या दक्षिण-पश्चिम आशियाई देशांची बैठक बोलावली आहे. आतापर्यंत एफएओकडून दक्षिण-पश्चिम आशियाई देशांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या 15 आभासी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1639955)
आगंतुक पटल : 269