विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविडच्या 16 तंत्रज्ञानांच्या वृद्धी आणि प्रमाणीकरणासाठी एनआरडीसी कडून वित्त पुरवठा

Posted On: 17 JUL 2020 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाअंतर्गत उपक्रम, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने, कोविड-19 संबंधित तंत्रज्ञान वृद्धींगत होण्याकरिता व्यावसायीकरणासाठी नवनिर्मितीकारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अनुदान कार्यक्रमा अंतर्गत हे प्रस्ताव मागवण्यात आले होते.

कोविड-19 संबंधी शोध,चाचणी  आणि उपचार क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते यामध्ये प्रक्रिया वृद्धिंगत करणे, उत्पादन प्रमाणीकरण,नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी, फिल्ड परीक्षण,प्रयोगशाळा स्तरावर विकास आणि औद्योगिक आवश्यकता यांच्यातले अंतर कमी करणे ज्यामुळे वाणिज्यिक उत्पादन आणि उत्पादन विपणन यशस्वी ठरेल.

जाहिरातीला प्रतिसाद देत 65 प्रस्ताव प्राप्त झाले होते. तीन सदस्यीय बाह्य तंत्रज्ञान तज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती, त्यांनी 16 तंत्र दृष्ट्या मजबूत आणि समर्पक प्रकल्पांची शिफारस केली.

वित्त सहाय्य दिल्या जाणाऱ्या योजना कोविद-19 चाचण्या, शोध आणि उपचार क्षेत्रातल्या आहेत. सहाय्य करण्यासाठी निवड केलेले  तंत्रज्ञान  तपासणी संच, व्हेंटीलेटर, सॅनीटायझर, पीपीई, मास्क,वैद्यकीय कचरा प्रक्रिया या क्षेत्रातले आहे. 

आय आय टी दिल्ली, आयडीईएमआय मुंबई, आयएनएम इंडियन नेव्ही मुंबई, व्हीबीआरआय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली यासह काही शैक्षणिक संस्था आणि व्यक्तींचायात समावेश आहे.

नवोन्मेशी तंत्रज्ञान  वृद्धीसाठी आणि नमुन्यासाठी उपलब्ध अनुदान यात मोठे अंतर असल्याचे एनआरडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  डॉ एच पुरुषोत्तम  यांनी म्हटले आहे. वित्तीय पाठबळ लाभल्याने त्यांना आणि स्टार्ट-अप ना तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि एका वर्षात हे कल्पक तंत्रज्ञान बाजारात आणण्यासाठी मदत होणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639372) Visitor Counter : 158