भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोग-सीसीआयने इरोस पीएलसी, एसटीएक्स आणि मार्को यांच्या प्रस्तावित संयोजनास मान्यता दिली

Posted On: 08 JUL 2020 11:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) इरोस इंटरनॅशनल पीएलसी (इरोस पीएलसी), एसटीएक्स फिल्मवर्क्स इंक (एसटीएक्स) आणि मार्को अलायन्स लिमिटेड (मार्को) यांच्या प्रस्तावित संयोजनास मान्यता दिली आहे.

इरोस पीएलसी ही 'आयल ऑफ मॅन' मध्ये समाविष्ट असलेली कंपनी आहे, ज्याचे शेअर्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये आहेत. ही एक जागतिक भारतीय मनोरंजन कंपनी आहे, जी चित्रपट, दूरचित्रवणी आणि डिजिटल अशा नवीन माध्यमांसारख्या सर्व स्वरूपांमध्ये चित्रपट (हिंदी, तामिळ आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषेच्या चित्रपटांसह) मिळवते, त्याचे उत्पादन आणि वितरण करते. ‘ईरोज नाऊ’ ही देखील इरॉस पीएलसीच्या मालकीची आहे.

एसटीएक्स एक पूर्ण-एकात्मिक जागतिक मीडिया कंपनी आहे, जी प्रतिभा-चालित मोशन पिक्चर्स, दूरचित्रवणी आणि मल्टीमीडिया सामग्रीचे उत्पादन, विपणन आणि वितरण यामध्ये विशेषज्ञ आहे. भारतीय वितरकांना काही चित्रपटांचे परवाना देण्याच्या मार्गाने एसटीएक्सची अप्रत्यक्ष उपस्थिती भारतात आहे. मार्को ही ब्रिटीश व्हर्जिन बेटांच्या कायद्यानुसार संघटित व विद्यमान कंपनी आहे आणि ही गुंतवणूक धारक कंपनी आहे. मार्को हेनीकॅपिटल द्वारे नियंत्रित आहे, ही गुंतवणूक व्यवस्थापन संस्था आहे, जी खासगी इक्विटी बायआउटमध्ये निपुण आहे आणि बांधकाम क्षेत्र, हेज फंड, म्युच्युअल फंड, तसेच इनोव्हेशन गुंतवणूकीसह इतर क्षेत्रात तिचा विस्तार आहे.

दोन-टप्प्यातील व्यवहारात, असे प्रस्तावित आहे की इरोस पीएलसीची अप्रत्यक्षपणे पूर्णपणे मालकीची सहाय्यक कंपनी एसटीएक्समध्ये विलीन होईल आणि एसटीएक्सचे अस्तित्व तसेच राहील. दुसऱ्या टप्प्यात एसटीएक्समध्ये विद्यमान गुंतवणूकदार 'मार्को मार्गे होनी' समूह विलीन झालेल्या घटकाच्या काही समभागांची सदस्यता घेईल.

व्यवहार पूर्ण झाल्यावर, अशी अपेक्षा आहे की इरोस, एसटीएक्स आणि मार्को एकत्रितरित्या काही विशिष्ट अधिकारांसह प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आर्थिक आणि मतदानाचे अधिकार मिळवतील.

सीसीआयच्या तपशीलवार आदेशाचे अनुसरण केले जाईल.

 

S.Pophale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637434) Visitor Counter : 153