विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आघाडीच्या उद्योजकांनी नवीन एसटीआयपी 2020 निर्मितीसंदर्भातील औद्योगिक सल्लामसलत परिषदेत सहभाग नोंदवला


संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यावर परिषदेत भर

उद्योजकांनी उद्योग आणि शिक्षणक्षेत्राच्या व्यापक सहकार्यतेची आवश्यकता प्रतिपादन केली

Posted On: 03 JUL 2020 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020

 

नव्या विज्ञान तंत्रज्ञान आणि नूतनीकरण धोरणाचे बळकटीकरण करावे, आणि उद्योग क्षेत्राने संशोधन आणि विकासाच्या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी (न्यू सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन,एसटीआयपी 2020) महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख उद्योजक आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रो. के.विजयराघवन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक डॉ.आशुतोष शर्मा यांची मिळून आज एक उच्चस्तरीय उद्योग विषयक सल्लामसलत परिषद पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्रा.के.विजयराघवन म्हणाले, की संशोधन आणि विकास क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देऊन अशा आवश्यक रणनीतीचा उद्योग क्षेत्राला लाभ तर  होईलच, याशिवाय गुंतवणुकीतला धोकाही कमी होईल. यावेळी  उद्योजकांना  उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात बोलताना, प्रा.आशुतोष शर्मा यांनी उद्योग क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ते म्हणाले की, उद्योगांनी संशोधन आणि विकास यामध्ये केवळ गुंतवणूक करू नये तर त्याचा यथोचित लाभही घ्यावा. नवीन धोरण बनविताना उद्योगपतींनी शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांशी जोडणाऱ्या  अज्ञात घटकांचा शोध घेऊन त्यातील अंतरही भरून काढावे.

यावेळी केलेल्या आपल्या उद्घाटनपर भाषणात, भारतीय उद्योग संघाचे महासंचालक श्री. चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले, की भारताचा सकल घरेलू उत्पादन वेग वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी उद्योगांनी संशोधन आणि विकासात आवश्यक तो सहभाग नोंदवावा आणि धोरण तयार करण्यात आवश्यक बदल करून ते धोरण कार्यान्वित करायला बांधणीत बदल घडवायला हवा. "लहान सहान बदल करून आपल्या  देशाला हवी तेवढी उंची गाठता येणार नाही," असे ही ते पुढे म्हणाले.

अशा प्रकारचे विकेंद्रीकरण करून, तळापासून शीर्ष स्थानापर्यंत आरेखन प्रक्रियेचा विचार करून, पुनरर्चनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विभागीय केंद्रांवर लक्ष देणारी आणि विस्तृत सामाजिक आर्थिक कल्याण साधणारी अशी विज्ञान तंत्रज्ञान आणि नूतनीकरण धोरण ठरविण्यासाठी झालेली उद्योजकांची प्रथमच झालेली बैठक आहे.  एसटीआयपीचे (STIP2020) सचिवालय आणि भारतीय उद्योग विकास महासंघ (CII) या दोघांच्या सहकार्याने, आभासाी पद्धतीने ही बैठक संपन्न झाली.

लवकरच जाहीर होणाऱ्या आणि एसटीआयपीच्या (STIP2020) धोरणासाठी उद्योगपतींनी आपापल्या सूचना द्याव्यात आणि ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवस्था बनविण्याचा मार्ग  तयार करावा, हा या बैठकीचा महत्त्वाचा हेतू  होता. या गोलमेज बैठकीच्या पहिल्या दिवशी, नव्या एसटीआयपी2020 साठी , उद्योग क्षेत्रातील सुमारे 15 महत्वपूर्ण उद्योगपतींनी  यात सहभागी होऊन  सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि संशोधन विकास हा शाश्वत मार्गाने करण्यासाठी आपले सूचना आणि विचार  मांडले. फोर्ब्ज मार्शल प्रायव्हेट लिमिटेडचे सहाध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज, इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ऍक्सीलॉर व्हेंचर्सचे अध्यक्ष श्री. गोपालकृष्णन, टेक महिन्द्राचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सी.पी.गुरनानी, टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक ,श्री. आर मुकुंदन, एलिको लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमेश दाटला, व्यवस्थापकीय संचालक पॅनासिया बायोटेक लिमिटेडचे श्री. राजेश जैन, मॅपमायजिनोमच्या,प्रमुख कार्यकारी अधिकारी श्रीमती एम .एस अनुआचार्य, कॅडिला फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव आय. मोदी, रिन्यूपावर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.सुमंत सिन्हा, मायलिन फाऊंड्रीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. गोपीचंद कात्रागड्डा, टेक्नॉलॉजी अँड न्यू मटिरिअल बिझनेस टाटा स्टील लिमिटेडचे  उपाध्यक्ष डॉ.श्री.देवाशीष भट्टाचार्य, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव, रिलायन्स लाईफ सायन्सेसचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी श्री. वेंकट रमण या सर्वांनी यासंदर्भातील आपली  मनोगते आणि अपेक्षा  व्यक्त केल्या.

उद्योगपतींनी शैक्षणिक आणि उद्योगक्षेत्राची सांगड घालून जीडीपीची टक्केवारी वाढवून संशोधन आणि विकास क्षेत्रात गुंतवणूक करावी यावर उद्योगपतींनी भर दिला. सचिवालयातील एसटीआयपी 2020 चे  प्रमुख आणि डीएसपीचे सल्लागार डॉ. अखिलेश गुप्ता यांनी सचिवालयाने तयार केलेल्या एसटीआयपी 2020 च्या  ट्रॅक 1ते ट्रॅक 4 पर्यंतच्या फॉर्म्युलेशन प्रोसेसच्या रुपरेषेबद्दल सादरीकरण केले, तसेच शासनाच्या उद्योगपतींकडून असलेल्या अपेक्षांची मांडणी केली.

संपूर्ण एसटीआयपीचे धोरण तयार करून कार्यान्वीत करण्यासाठी एसटीआयपी सचिवालयाची स्थापना प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि विज्ञान, तंत्रज्ञान विभाग आणि  या दोघांच्या सहकार्याने झाली आहे. 

एसटीआयपी2020ची  घोषणा पीएसए कार्यालय आणि डीएसटी यांनी एकत्रितपणे भारत आणि विश्व कोविड-19 महामारीच्या संकटातून बाहेर पडून पुनःप्रस्थापित होत असताना जाहीर केली आहे. 2013 ला प्रसिद्ध झालेले, सध्या अस्तित्वात असलेले धोरण बदलून, नवे धोरण या वर्षअखेरीस प्रसिद्ध होईल.

एसटीआयपीचे धोरण 4 इंटरलिंक ट्रॅक्सने बनलेले असून  15000 भागधारकांकडे सूचना आणि प्रस्तावांसाठी पाठविले जाईल. ट्रॅक I - मध्ये सायन्स पॉलिसी फोरमवरून म्हणजे जे व्यासपीठ विनंती करून, सार्वजनिक आणि विशेषज्ञांकडून धोरण तयार करण्यासाठी आणि तयार केल्यानंतर त्यावर प्रस्ताव मागविण्यात येतील. ट्रॅक II- म्हणजे विशेष तज्ञांच्या संकल्पनांचा वापर करून त्यात पुराव्यानिशी शिफारशी  मांडतील धोरणात्मक पध्दतीने अशा संकल्पना मांडणाऱ्या 21 समित्या यासाठी स्थापन केल्या आहेत. ट्रॅक- III मधे विविध मंत्रालये आणि राज्यांचा समावेश असून ट्रॅक IV मधे विविध शीर्ष स्तरावरील भागीदार आहेत. 


* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636288) Visitor Counter : 195