उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून पवित्र जगन्नाथ पुरी रथ यात्रेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा
Posted On:
22 JUN 2020 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2020
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नागरिकांना पवित्र जगन्नाथ पुरी रथ यात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात-
“भगवान जगन्नाथांच्या पवित्र रथ यात्रेच्या मी देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
जगन्नाथ पुरी रथ यात्रा हा ओदिशाचा सर्वात पूजनीय आणि बहुप्रतीक्षित उत्सव आहे. ही रथयात्रा म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान जगन्नाथ यांच्या वार्षिक प्रवासाचे रेखाटन आहे.
रथयात्रेच्या उत्सवाचे वैभव आणि भव्यता आणि ‘रथ’ तसेच रथांची भव्यता खरोखरच अतुलनीय आहे.
भारत आणि संपूर्ण जगात कोविड -19 च्या विरोधातील अखंड लढा सुरू असल्याने आपण आपले जवळपास सर्व पारंपारिक सण घरी राहून साजरे करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत, आपल्याला यावर्षी हे आयोजन साधेपणाने करायला हवे.
तरीही रथ यात्रेशी संबंधित पावित्र्य आणि श्रद्धा आपले जीवन शांतता आणि समरसतेने समृद्ध करेल".
S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633530)
Visitor Counter : 193