खाण मंत्रालय

प्रल्हाद जोशी यांनी खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतसाठी संशोधन आणि विकास (आर अँड डी) पोर्टल केले सुरू

Posted On: 19 JUN 2020 9:40PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेसाठी सत्यभामा (SATYABHAMA) (खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना) पोर्टल सुरु केले. राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी), खाण माहिती विभागाद्वारे पोर्टलची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे. खाण मंत्रालयाचे सचिव सुशील कुमार आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

शुभारंभाच्या वेळी केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशातील खाण व खनिज क्षेत्रात संशोधन व विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर दिला. जोशी यांनी खाण व खनिज क्षेत्रातील वैज्ञानिक आणि संशोधकांना आत्मनिर्भर भारतसाठी गुणात्मक व नाविन्यपूर्ण संशोधन व विकास कार्य करण्याचे आवाहन केले.

सध्याच्या व्यवस्थेच्या विरुद्ध जिथे वैज्ञानिक / संशोधकांनी संशोधनाचे प्रस्ताव स्वतः उपस्थित राहून सादर केले आहेत, तेथे सत्याभामा पोर्टल प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच निधी/अनुदान वापरण्यास परवानगी देते. संशोधक पोर्टलमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवालदेखील सादर करू शकतात. पोर्टलवर माहिती पुस्तिका (युजर मॅन्युअल) देखील उपलब्ध आहे जिथे प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया अधोरेखित केली आहे.

देश आणि त्याच्या लोकांच्या हितासाठी लागू केलेल्या भू-विज्ञान, खनिज अन्वेषण, खाण आणि संबंधित क्षेत्र, खनिज प्रक्रिया, इष्टतम उपयोग आणि देशाच्या खनिज स्त्रोतांच्या संवर्धनासाठी संशोधनास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने खाण मंत्रालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेंतर्गत संशोधन व विकास प्रकल्प राबविण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागासह मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, राष्ट्रीय संस्था आणि संशोधन व विकास संस्थांना भारत सरकारचे खाण मंत्रालय, निधी प्रदान करते. पोर्टलमुळे योजनेच्या अंमलबजावणीची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वृद्धिंगत होईल.

संशोधन प्रकल्पांना अर्थसहाय्यित करण्यात आलेल्या प्रमुख संस्थांमध्ये भारतीय विज्ञान संस्था, बंगळूरू; भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), खडगपूर; आयआयटी- भारतीय खाण शाळा, धनबाद; आयआयटी, रुरकी; आयआयटी, बॉम्बे; आयआयटी दिल्ली; आयआयटी, भुवनेश्वर; आयआयटी, मद्रास चेन्नई; सीएसआयआर - खनिज व सामग्री तंत्रज्ञान संस्था, भुवनेश्वर; सीएसआयआर- राष्ट्रीय आंतर विद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था; आयसीएआर- केंद्रीय शुष्क विभाग संशोधन संस्था; सीएसआयआर- राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्था; सीएसआयआर-एनएमएल; राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, राउरकेला; जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाईन केंद्र, नागपूर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक, बंगळूरू; नॉनफेरस मटेरियल्स तंत्रज्ञान विकास केंद्र, हैदराबाद इत्यादींचा समावेश आहे.

research.mines.gov.in वर सत्यभामा पोर्टल उपलब्ध आहे. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी खाण मंत्रालयाच्या met4-mines@gov.in वर संपर्क साधू शकता.

********

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1632769) Visitor Counter : 48