संरक्षण मंत्रालय
मॉस्को येथे आयोजित दुसऱ्या महायुद्धाच्या 75 व्या विजय दिन संचलनात भाग घेण्यासाठी भारत तिन्ही सैन्यदलाची तुकडी पाठवणार
Posted On:
17 JUN 2020 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2020
दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, रशियन आणि इतर मित्र देशाच्या नागरिकांनी केलेल्या वीरता आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी मॉस्को येथे लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 9 मे 2020 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शुईगु यांना याप्रसंगी अभिनंदनाचा संदेश पाठविला आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी 24 जून 2020 रोजी मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिन संचलनात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्याला आमंत्रित केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी या संचलनात सहभागी होण्यासाठी 75-सदस्यांची तिन्ही सेनादलाची तुकडी पाठविण्यास सहमती दर्शविली असून या संचलनात इतर देशांचे सैन्यदल देखील सहभागी होणार आहेत. रशिया जेंव्हा देशभक्तीसाठी लढलेल्या युद्ध नायकांचे स्मरण करेल तेंव्हा रशितायील नागरिकांसमवेत या संचलनात सहभागी होणे म्हणजे या युद्ध नायकांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि ऐक्यभाव दर्शविणे होय.
S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632155)
Visitor Counter : 193