विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

शास्त्रज्ञांनी स्वदेशी नासॉफरेन्जियल स्वॅब केले विकसित

Posted On: 06 JUN 2020 11:38PM by PIB Mumbai

 

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत, नासॉफरेन्जियल (एनपी) स्वॅबवर विसंबून राहण्याजोगी परिस्थिती नाही, परिणामी याच्या पुरवठा साखळीत विलंब होतो, किंमती वाढतात आणि गुणवत्तेमध्ये फरक पडतो. सीएसआयआर – राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), पुणे यांनी कोविड-19 रूग्णाच्या घशातून नमुने गोळा करण्यासाठी स्वदेशी एनपी स्वॅब विकसित केला आहे. सीएसआयआरने एप्रिलच्या मध्यात एनपी स्वॅबसाठी देशांतर्गत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे एनसीएलच्या निदर्शनास आणून दिले होते.

नासॉफरेन्जियल स्वॅब एक वैद्यकीय उपकरण आहे ज्याची गुणवत्ता, पॉलिमर ग्रेड, परिमाण आणि निर्जंतुकीकरणाची कठोर वैशिष्ट्ये आहेत. एनपी स्वॅबमध्ये एक दंडगोलाकार प्लास्टिकची काठी असते ज्यात सिंथेटिक ब्रिस्टल्स / फ्लॉक ब्रश सारखे टोक (टीप) असते. फ्लॉकिंग प्रक्रिया दांतांच्या ब्रशप्रमाणेच काठीच्या टोकावर समांतर दिशेने बारीक बारीक रेषेत मदत करतात, याशिवाय यामध्ये गोल एकसमान भूमिती आहे आणि एनपी स्वॅब ब्रिस्टल्स मायक्रॉन व्यासाचे असतात.

पॉलिमर विज्ञान आणि रासायनिक अभियांत्रिकी शास्त्रज्ञांची एनसीएल टीममध्ये डॉ चंद्रशेखर व्ही. रोडे, डॉ प्रकाश पी वडगावकर आणि डॉ अनुया ए निसाल यांचा समावेश होता ज्यांनी एनपी स्वॅब पॉलिमर आणि चिकटपणावर विस्तृत तपशीलवार यशस्वीरित्या कार्य केले. वैशिष्ट्यांमध्ये वैद्यकीय-श्रेणीची सामग्री आहे जी उत्पादनांसाठी वापरली जाणे आवश्यक आहे, स्वॅब डिझाइन आणि पॅकेजिंग आणि निर्जंतुकीकरण प्रोटोकॉल. एनसीएलचे संचालक डॉ. अश्विनीकुमार नांगिया यांनी सांगितले की, “पॉलिमर वैशिष्ट्यांचे अनुकूलन करणे आणि अत्यंत थोड्या काळामध्ये तातडीने आवश्यक असलेल्या वैद्यकीय स्वॅब उत्पादनाची रासायनिक विश्लेषणास मान्यता देण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.”

एनसीएलने सीएसआयआरच्या कोविड-19 तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या नियमावलीनूसार नमुना संकलनासाठी स्वदेशी एनपी स्वॅबची प्रक्रिया मुंबई-आधारित रसायन कंपनीकडे हस्तांतरित केली आहे. एनपी स्वॅब्स, त्यांचे व्यास, ब्रिस्टल्सचे संरेखन आणि निर्जंतुकीकरण पद्धतीची योग्य रसायनिक आणि पॉलिमर रचनेची पुष्टी केल्यानंतर एनसीएलने कंपनीला वैद्यकीय उपकरणांच्या मंजुरीसाठी पुढील नियामक मार्ग सुचविला आहे. ते दररोज 1 लाख एनपी स्वॅब्स तयार करण्यास सक्षम असतील.

*****

S.Thakur/S. Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630027) Visitor Counter : 304


Read this release in: English , Bengali , Punjabi , Tamil