पंतप्रधान कार्यालय

एमएसएमईला सक्षम करण्यासाठी चॅम्पियन्स या तंत्रज्ञान व्यासपिठाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 01 JUN 2020 7:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चॅम्पियन्स (CHAMPIONS) या तंत्रज्ञान व्यासपिठाचा शुभारंभ केला; चॅम्पियन्स (CHAMPIONS) चा अर्थ आहे उत्पादन आणि राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी आधुनिक प्रक्रियेची निर्मिती आणि सामंजस्यपूर्ण अनुप्रयोग (Creation and Harmonious Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength).

जसे की आपल्याला नावावरून लक्षात येतच असेल, हे पोर्टल मुळात लहान युनिट्सच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना प्रोत्साहन, पाठिंबा आणि मदत तसेच त्यांच्या विकासासाठी तयार केले आहे. एमएसएमई मंत्रालयाचा हा खऱ्या अर्थाने वन- स्टॉप-शॉप उपाय आहे.

सध्याच्या कठीण परिस्थितीत एमएसएमईंना मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते (चॅम्पियन) होण्यास मदत करण्यासाठी ही आयसीटी आधारित प्रणाली तयार केली गेली आहे.

 

चॅम्पियनची सविस्तर उद्दीष्टे:

तक्रार निवारण: वित्त, कच्चा माल, कामगार, नियामक परवानग्यांसह विशेषतः कोविडसारख्या कठीण परिस्थिती निर्माण झालेल्या एमएसएमईच्या अडचणी सोडविण्यासाठी

त्यांना नवीन संधी मिळविण्यात मदत करण्यासाठी: वैद्यकीय उपकरणे, पीपीई कीट, मास्क इ. सारख्या वस्तूंचे उत्पादन आणि त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा;

त्यांच्यातील स्पार्क ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, म्हणजेच संभाव्य एमएसएमई जे सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेते (चॅम्पियन) बनू शकतात.

ही तंत्रज्ञानाने सुसज्ज नियंत्रण कक्षासह व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे. टेलिफोन, इंटरनेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्स या आयसीटी साधनांच्या व्यतिरिक्त, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंगद्वारे सक्षम करण्यात आलेली प्रणाली आहे. हे वास्तविकपणे भारत सरकारच्या मुख्य तक्रारी पोर्टल सीपीजीआरएएमएस आणि एमएसएमई मंत्रालयाच्या स्वत: च्या इतर वेब-आधारित यंत्रणेसह रिअल टाइम आधारावर पूर्णपणे समाकलित केलेले आहे. संपूर्ण आयसीटी आर्किटेक्चर एनआयसीच्या मदतीने विनाशुल्क देशातच तयार केले आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयाच्या एका डम्पिंग रूममध्ये रेकॉर्ड वेळेत भौतिक पायाभूत सुविधा तयार केल्या जातात.

प्रणालीचा एक भाग म्हणून हब अँड स्पोक मॉडेलमध्ये नियंत्रण कक्षाचे नेटवर्क तयार केले आहे. नवी दिल्ली येथील एमएसएमईच्या सचिव कार्यालयात हब आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या विविध संस्था  आणि राज्यांच्या विविध कार्यालयात प्रवक्ता आहेत. आत्तापर्यंत, 66 राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन आणि कार्यान्वित केले आहेत. ते चॅम्पियन्सच्या पोर्टल व्यतिरिक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील एकमेकांशी संवाद साधतात. अधिकार्‍यांसाठी एक विस्तृत मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

*****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628405) Visitor Counter : 415