संरक्षण मंत्रालय
पाकिस्तान समर्थक 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराकडून खात्मा
प्रविष्टि तिथि:
06 APR 2020 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ धाडसी व्यूहरचना करून जोरदार बर्फवृष्टी होत असतानाही पाकिस्तान समर्थक 5 घुसखोरांना कंठस्नान घातले.
घुसखोरांची माहिती मिळताच निम-लष्करी दलापैकी सर्वात निष्णात दलातील 4 सैनिकांना कनिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार हवाईमार्गाने नियंत्रण रेषेजवळ उतरविण्यात आले.
सैनिक आणि घुसखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत पाचही जणांचा खात्मा करण्यात आला.
या लढाईत भारतीय लष्कराचे 5 सैनिक शहीद झाले. यातील तीन जागीच शहीद झाले तर दोन जण विमानाने जवळच्या लष्कराच्या रुग्णालयात नेताना शहीद झाले.
भारतीय लष्कराच्या विशेष तुकडीचे नेतृत्व सुभेदार संजीव कुमार यांच्याकडे होते आणि त्या तुकडीत हवालदार दवेंद्र सिंग, पॅराट्रूपर बाळ कृष्ण, पॅराट्रूपर अमित कुमार आणि पॅराट्रूपर छत्रपाल सिंग यांचा समावेश होता.
कर्नल अमन आनंद
जनसंपर्क अधिकारी (लष्कर)
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1611811)
आगंतुक पटल : 182