मंत्रिमंडळ

बाह्य अंतराळाच्या शांततापूर्ण वापरातील सहकार्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 DEC 2018 9:26PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला बाह्य अंतराळाच्या शांततापूर्ण वापरातील सहकार्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. 25 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

ठळक वैशिष्ट्ये :

या करारामुळे पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग,उपग्रह दळणवळण, आणि उपग्रह आधारित दिशादर्शन , अंतराळ विज्ञान आणि ग्रहांचा शोध, अंतराळयानाचा वापर,  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या संभाव्य क्षेत्रात सहकार्य लाभू शकेल.

या कराराद्वारे एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल, ज्यामध्ये डीओएस/ इसरो आणि रॉयल सेंटर फॉर रिमोट सेंसिंग (सीआरटीएस) तसेच  रॉयल सेंटर फॉर स्पेस रिसर्च अँड स्टडीज (सीआरईआरएस) चे सदस्य असतील, जे हा करार लागू करण्याची मुदत आणि उपायांसह एक कृती आराखडा तयार करतील.

                                         *****

B. Gokhale/ S. Kane



(Release ID: 1555033) Visitor Counter : 63