पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांना 3 ऑक्टोबरला ‘युएनईपी चॅम्पियंस ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान केला जाणार

Posted On: 02 OCT 2018 4:16PM by PIB Mumbai

संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘युएनईपी चॅम्पियंस ऑफ द ईयर’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून उद्या नवी दिल्लीत अनिवासी भारतीय केंद्रात होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटारेस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. यावेळी पंतप्रधान सभेला संबोधितही करतील.

 आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याच्या क्षेत्रात मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे २०२२ पर्यत भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या अभियानाची दखल घेतलेल्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पर्यावरणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे राजकीय नेतासामाजिक कार्यकर्ता किंवा खाजगी क्षेत्रातील व्यक्तीना दरवर्षी चॅम्पियंस ऑफ  अर्थ हा पुरस्कार दिला जातो.

*****

B.Gokhale / R. Aghor 



(Release ID: 1548306) Visitor Counter : 100