Infrastructure
पीएम गतिशक्तीची पाच वर्षे: भारताच्या पायाभूत सुविधा नियोजनात परिवर्तन
Posted On:
12 OCT 2026 1:43PM
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
|
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (PMGS-NMP) हा केवळ पायाभूत सुविधांचे मॅपिंग करण्यापुरता मर्यादित न राहता, आता एका व्यापक नियोजन प्रणालीच्या रूपात विकसित झाला आहे. एकात्मिक नियोजन आणि प्रकल्पांमधील समन्वय साधण्यासाठी हा प्लॅटफॉर्म भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि पायाभूत सुविधा एकाच व्यासपीठावर आणतो. आज या उपक्रमात 58 केंद्रीय मंत्रालये व विभाग, तसेच सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत.
|
पायाभूत सुविधा: विकसित भारताचे मुख्य इंजिन
भारत सध्या ज्या प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे, त्यासाठी विविध क्षेत्रे आणि वाहतूक व्यवस्थांमध्ये परस्परांशी उत्तम समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, जलमार्ग आणि सार्वजनिक उपयुक्तता सेवा (उदा. वीज, पाणी, गॅस वाहिन्या) बहुदा एकाच प्रदेशातून एकमेकांना छेदत जातात. या सर्व नेटवर्कचे नियोजन एकत्र केल्यास वेळ आणि खर्चात मोठी बचत होते, प्रकल्पांमध्ये समन्वय राखता येतो आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे शक्य होते. यातूनच, वेगवेगळ्या पायाभूत सुविधांना एकाच सामायिक नियोजन आराखड्यात समाविष्ट करणाऱ्या एका नवीन दृष्टिकोनाची गरज निर्माण झाली.
हीच गरज पूर्ण करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी 'पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन' ची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाद्वारे विविध केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील डेटा 'भौगोलिक माहिती प्रणाली' आधारित एकाच सामायिक व्यासपीठावर आणला गेला. 'पीएम गतिशक्ती'मुळे नियोजकांना पायाभूत सुविधा, भौगोलिक वैशिष्ट्ये, आर्थिक क्षेत्रे आणि इतर संबंधित माहिती एकाच ठिकाणी पाहता येते; ज्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अचूक डेटावर आधारित नियोजन आणि निर्णय घेणे शक्य झाले आहे. पाच वर्षांनंतर, हा दृष्टिकोन आता संपूर्ण देशभरात लागू झालेल्या एका व्यापक नियोजन प्रणालीच्या रूपात विकसित झाला आहे.
पीएम गतिशक्ती: एका दृष्टीक्षेपात
पीएम गतिशक्तीचे कार्य अशा सहा प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे, ज्यांचा मुख्य उद्देश पायाभूत सुविधांचे नियोजन अधिक एकात्मिक, कार्यक्षम आणि सुसमन्वित बनवणे हा आहे. यामध्ये एकात्मिक विकास, बहुपर्यायी (मल्टीमॉडेल) पायाभूत सुविधा, शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी, भूसंपादनाला गती देणे, परवानग्या मिळण्यातील विलंब कमी करणे आणि पर्यावरणावरील परिणाम शक्य तितका कमी करणे यांचा समावेश होतो.

पीएम गतिशक्तीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
|
तुम्हाला माहीत आहे का?
'पीएम गति शक्ती' मध्ये भारतमाला, सागरमाला, अंतर्गत जलमार्ग, ड्राय/लँड पोर्ट्स आणि उडान (UDAN) यांसारख्या विविध मंत्रालयांच्या आणि राज्य सरकारांच्या पायाभूत सुविधा योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
|
- पायाभूत सुविधांची सात प्रमुख इंजिने: रस्ते, रेल्वे, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक नागरी वाहतूक आणि लॉजिस्टिक्स (मालवाहतूक व्यवस्थापन) या सात मुख्य क्षेत्रांचा या योजनेचा पाया म्हणून समावेश करण्यात आला आहे
- संपूर्ण सरकारचा एकत्र सहभाग (होल-ऑफ-गव्हर्नमेंट प्लॅनिंग): या राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये 58 केंद्रीय मंत्रालये व विभाग तसेच सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे; ज्यामुळे पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व प्रस्तावांचे विविध क्षेत्रांच्या चौकटीत एकत्र नियोजन व मूल्यांकन करणे शक्य झाले आहे.
- एकात्मिक डिजिटल नियोजन: हा राष्ट्रीय मास्टर प्लॅन पायाभूत सुविधा आणि भौगोलिक माहिती 'जीआयएस' (GIS) वर आधारित एकाच सामायिक व्यासपीठावर आणतो; ज्यामुळे जागांचे भौगोलिक नियोजन करणे आणि त्या आधारे योग्य निर्णय घेणे सोपे होते.
- माहितीची व्यापक उपलब्धता: पीएम गतिशक्तीचे सार्वजनिक व्यासपीठ मान्यताप्राप्त 230 डेटा संचांपर्यंत (डेटासेट) पोहोच उपलब्ध करून देते. या डेटाच्या मदतीने प्रकल्पासाठी जागेची उपयुक्तता तपासणे, जोडणीचे मॅपिंग करणे, मार्गाची आखणी करणे आणि आवश्यक नियमावलींचे पालन तपासणे शक्य होते.
- डेटाच्या थरांची उपलब्धता (डेटा लेयर्स): 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत उपलब्ध असलेल्या 23,493 पेक्षा जास्त डेटा लेयर्समुळे पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित महत्त्वपूर्ण माहिती एकाच सामायिक जीआयएस प्लॅफॉर्मवर उपलब्ध झाली आहे.
|
आयटीएलए (ITLA): एकात्मिक वाहतूक नियोजनाला बळकटी
पीएम गतिशक्तीला पूरक म्हणून, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरणाच्या' (ITLA) स्थापनेस मंजुरी दिली आहे. हे प्राधिकरण दीर्घकालीन वाहतूक नियोजन आणि समन्वयावर लक्ष केंद्रित करेल.
आयटीएलए (ITLA) दहा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 'राष्ट्रीय वाहतूक मास्टर प्लॅन' तयार करेल. हे प्राधिकरण विविध क्षेत्रांमधील तसेच वार्षिक वाहतूक नियोजनाचे मूल्यमापन करेल, आणि ₹500 कोटी किंवा त्याहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे तांत्रिक परीक्षण करेल. तसेच, हे प्राधिकरण या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल.
याशिवाय, हे प्राधिकरण फास्टॅग (FASTag), वाहन, आणि जीएसटीएन (GSTN) ई-वे बिल यांसारख्या विविध स्रोतांमधील माहिती एकत्रित करून 'राष्ट्रीय वाहतूक डेटा भांडार' (NTDR - नॅशनल ट्रान्सपोर्ट डेटा रिपॉझिटरी) विकसित करेल.
|
गतिशक्ती समन्वयापासून ते प्रकल्प नियोजनापर्यंत कसे कार्य करते:
पीएम गतिशक्तीची रचना त्रिस्तरीय संस्थात्मक आराखड्यावर (Three-tier institutional framework) आधारित आहे, ज्यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:
- सक्षम सचिव गट (Empowered Group of Secretaries - EGoS): कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील हा 'ईजीओएस' (EGoS) गट पीएम गतिशक्तीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतो, तसेच मास्टर प्लॅनमध्ये आवश्यक सुधारणा व बदलांचा आढावा घेऊन त्यांना मंजुरी देतो.
- नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG): या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपमध्ये विविध पायाभूत सुविधा मंत्रालये आणि विभागांच्या 'नेटवर्क प्लॅनिंग' विभागांचे प्रमुख एकत्र येतात. हा गट पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांची कसून पाहणी करतो आणि सुसंगत नियोजन, एकत्रीकरण व प्रकल्पांचे सुसूत्रीकरण सुनिश्चित करतो. याशिवाय, प्रकल्प नियोजनाअंतर्गत राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या प्रगतीवरही हा गट बारकाईने लक्ष ठेवतो.
- तांत्रिक मदत पथक (Technical Support Unit - TSU): टीएसयू (TSU) मध्ये विविध क्षेत्रांतील आणि विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असतो, जे प्रकल्प मूल्यमापन प्रक्रियेत मदत करतात. पीएम गतिशक्तीचे सचिवालय म्हणून काम करणाऱ्या लॉजिस्टिक्स विभागाला हे पथक सर्वतोपरी सहकार्य करते.
11 ऑगस्ट 2026 पर्यंत, नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने (NPG) सुमारे 18.66 लाख कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या 396 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन केले आहे. यापैकी 256 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 198 प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या संस्थात्मक व्यवस्थेला डिजिटल प्लॅटफॉर्मचे मजबूत पाठबळ लाभले असून, ते नियोजकांना भौगोलिक माहिती (जिओस्पेशिअल डेटा), उपग्रह छायाचित्रे (सॅटेलाइट इमेजरी) आणि विश्लेषणात्मक साधने उपलब्ध करून देते.
गती शक्ती विश्व विद्यालय: एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनासाठी कौशल्य निर्माण करणे
गतिशक्ती विश्वविद्यालय (GSV) हे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर विशेष भर देणारे देशातील पहिलेच आणि आगळेवेगळे विद्यापीठ आहे. 2022 मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ वाहतूक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये शिक्षण, कार्यकारी प्रशिक्षण (एग्झिक्युटिव्ह ट्रेनिंग) आणि संशोधन यांना एकाच व्यासपीठावर आणते.
गतिशक्ती विश्वविद्यालय हे विशेष शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून 'पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन' आणि 'राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण (2022)' या दोन्ही उपक्रमांना भक्कम पाठबळ पुरवते. या दोन्ही महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी अभ्यासक्रम तयार करणे आणि ते राबवणे यासाठी हे विद्यापीठ मुख्य नोडल संस्था म्हणून कार्य करते. या सहकार्याअंतर्गत उत्कृष्ट कार्यपद्धती सामायिक करण्यासाठी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील संशोधन व नवनिर्मितीला चालना देण्यासाठी 'ज्ञान केंद्रे' (Knowledge Centres) उभारण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जुलै 2026 पर्यंत, या विद्यापीठाने 'पीएम गतिशक्ती'साठी खास तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांद्वारे 2.4 लाखांपेक्षा जास्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. याशिवाय, हे विद्यापीठ सागरी वाहतूक, पूल व बोगदा अभियांत्रिकी (ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग) आणि संरक्षण लॉजिस्टिक्स (डिफेन्स लॉजिस्टिक्स) यांसारख्या विशेष क्षेत्रांसोबतच एकात्मिक वाहतूक नियोजनासाठीच्या व्यावहारिक संशोधनावरही (अप्लाईड रिसर्च) आपला भर वेगाने वाढवत आहे.
माहितीच्या स्रोतापासून (डेटा)पासून ते निर्णयांपर्यंत: डिजिटली केलेले नियोजन आयोजकांना कशी मदत करत आहे
एनएमपीमुळे भौगोलिक सूचना प्रणालीवर आधारित पायाभूत सुविधा, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्याशास्त्र यांची माहिती (डेटा) एका सामायिक व्यासपीठावर एकत्रितपणे आणली जाते. एकात्मिक पायाभूत सुविधांच्या नियोजनाला समर्थन देण्यासाठी बहुविध दळणवळणाच्या पायाभूत सुविधांसोबत आर्थिक क्षेत्रही निश्चित (मॅपिंग) केले जाते. यामुळे प्रकल्पांचे नियोजन करताना आयोजकांना विविध पायाभूत सुविधांचे जाळे (नेटवर्क) आणि संबंधित भौगोलिक माहिती एकत्रितपणे पाहता येते.
हा प्लॅटफॉर्म स्थानिक नियोजन आणि विश्लेषणात्मक साधनांना, डेटा अद्ययावत आणि एकत्र करण्याच्या यंत्रणांसोबत जोडतो. त्यामुळे प्रकल्पाची अधिक माहिती देणे, सान्निध्य मोजणे, विकासाची प्रतिबंधित/अप्रतिबंधित क्षेत्रे (ज्या क्षेत्रांमध्ये विकासावर निर्बंध असू शकतात) ओळखणे आणि मंजुरी मिळवणे यांसारख्या कार्यांना समर्थन मिळू शकते.
पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा नोड्सचे मॅपिंग
पीएम गतीशक्ती एनएमपी हे बहुविध दळणवळणाच्या पायाभूत सुविधांसोबतच आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक व्यवस्थेच्या केंद्रांचे भौगोलिक स्थान निश्चित (मॅपिंग) करते. यामुळे पायाभूत सुविधांचे दुवे आणि सभोवतालचा विकासात्मक संदर्भ नियोजन प्रक्रियेत समाविष्ट होतो. हे प्लॅटफॉर्म आर्थिक क्षेत्रे आणि विकास प्रकल्पांना आधार देण्यासाठी आवश्यक असलेले पायाभूत सुविधांचे दुवे, तसेच लोकांच्या, वस्तूंच्या आणि सेवांच्या अखंडपणे सुरळीतपणे चालणाऱ्या वाहतुकीवर परिणाम करू शकणाऱ्या दळणवळण व्यवस्थेमधील उणिवा ओळखण्यास मदत करते.
एकात्मिक पायाभूत सुविधांच्या नियोजनास समर्थन देण्यासाठी वस्त्रोद्योग आणि औषधनिर्माण केंद्रांचे समूह, संरक्षण मार्गिका, इलेक्ट्रॉनिक पार्क, औद्योगिक पट्टा, मत्स्यपालन समूह आणि कृषी क्षेत्र यांसारख्या आर्थिक क्षेत्रांच्या जागा निश्चित करून नकाशे तयार केले जातात.
उदाहरणार्थ: बिहारमधील खगरिया-पूर्णिया पट्टा. या सुधारित मार्गिकेद्वारे वस्त्रोद्योग समूह, खाद्यपदार्थांचे केंद्र (मेगा फूड पार्क) आणि मत्स्य/सीफूड पार्क यांसारख्या पाच पीएम गतीशक्ती आर्थिक केंद्रांना, तसेच 11 वाहतुकीच्या केंद्रांना एकमेकांशी जोडण्याची योजना प्रस्तावित आहे. या नियोजित जोडणीमुळे संपूर्ण प्रदेशात वस्तू आणि प्रवाशांची जलद वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

वाहतुकीच्या साधनांना (लॉजिस्टिक्स सिस्टम) एकमेकांशी जोडणे
युनिफाइड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (ULIP) सरकारी लॉजिस्टिक्स प्रणालींचे API-आधारित एकत्रीकरण सक्षम करते, तर लॉजिस्टिक्स डेटा बँक (LDB) आयात-निर्यात (EXIM) कंटेनरच्या हालचालींचा रिअल-टाइम मागोवा प्रदान करते. एकत्रितपणे, ते संपूर्ण लॉजिस्टिक्स परिसंस्थेमध्ये डिजिटल माहितीची देवाणघेवाण आणि दृश्यमानता मजबूत करतात. जुलै 2026 पर्यंत, ULIP ने 142 APIs द्वारे 12 केंद्रीय मंत्रालयांमधील 46 सरकारी प्रणालींना एकमेकांसोबत जोडले होते.
वापरकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक डेटा खुला करणे
डिजिटल परिसंस्था आता सरकारी वापरकर्त्यांच्या पलीकडेही विस्तारली आहे. ऑक्टोबर 2025 पासून, भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स (BISAG-N) यांनी विकसित केलेल्या प्रश्नोत्तरांवर-आधारित विश्लेषण यंत्रणेद्वारे गतीशक्ती एनएमपी (GatiShakti NMP) प्लॅटफॉर्म खाजगी क्षेत्रासाठी खुला करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी निवडक असंवेदनशील डेटासेटमध्ये नियंत्रित प्रवेश प्रदान करतो.
हे प्लॅटफॉर्म सध्या 230 प्रत्यक्ष आणि सामाजिक पायाभूत मालमत्तांशी संबंधित सुविधांमधे मान्यताप्राप्त डेटासेटमध्ये प्रवेश देते. वापरकर्ते जागेच्या योग्यतेचे विश्लेषण, दळणवळणाच्या सोयी सुविधा यांचे मॅपिंग, संरेखन नियोजन आणि अनुपालन तपासणी करू शकतात, तसेच विश्लेषणात्मक अहवाल तयार करू शकतात.
डेटा मिळाल्यापासून ते कार्यान्वित होईपर्यंत
डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे प्रकल्पाचा मागोवा घेणे आणि पायाभूत सुविधांचा डेटा अद्ययावत करणे या बाबींसाठी देखील समर्थन मिळते. पीएम ग्रोथ एनएमपी डॅशबोर्ड विविध क्षेत्रीय नियंत्रण आणि कृतीयोग्य अंतर्दृष्टी स्वरूपासाठी विविध-अधिकृत क्षेत्रांतील अहवाल प्रदान करतो. डेटा अपलोडिंग आणि व्यवस्थापन प्रणाली (DUMS) विकेंद्रित आणि रिअल-टाइम डेटा युनिटी आणि अद्ययावतीकरणही सक्षम करते.
एकूण दृष्टिकोन पायाभूत सुविधांच्या विकासाचे माहितीच्या (डेटा)-आधारे निर्णय घेणे, नियोजन करणे आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणे यासाठी भौगोलीक-स्थानिय प्रणाली, उपग्रहावरील प्रतिमा आणि API एकीकरणाचा वापर करतो.
प्रगतीपथावरील पंतप्रधान गतीशक्ती योजना
पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्ग: 2027–28, मध्ये पूर्ण होणारा हा 699 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग असून तो, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औद्योगिक आणि आर्थिक सामुहिक केंद्रांना जोडेल. यामध्ये वाहने आणि मोठ्या आकाराच्या विजेच्या उपकरणांचे (व्हाईट-गुड्स) कारखाने, मोठी औषधनिर्माण केंद्रे (क्लस्टर्स), विशेष आर्थिक क्षेत्रे आणि संरक्षण मार्गिकांचा समावेश आहे. हा प्रकल्प 15 राष्ट्रीय महामार्ग, 25 राज्य महामार्ग आणि 6 रेल्वे स्थानकांना जोडतो, ज्यामुळे बहुविध प्रकारची वाहतूक व्यवस्था शक्य होते.पीएम गतीशक्ती एनएमपी प्लॅटफॉर्मचा वापर करून, वन्यजमिनींवरील अतिक्रमण 19 टक्क्यांनी कमी करण्यासाठी या मार्गाच्या पुनर्मांडणीचा विचार करण्यात आला. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 7–8 तासांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे दरवर्षी अंदाजे 16 कोटी लिटर इंधनाची बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन सुमारे 39 कोटी किलोने कमी होईल.
जोगीघोपा मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क, आसाम: जोगीघोपा मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क हे केंद्र आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले आहे. ईशान्य भारतात रस्ते, रेल्वे आणि अंतर्गत जलमार्गांवरील मालवाहतूक अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.यात एकात्मिक नियोजन आणि मागणी विश्लेषणासाठी पीएम गतीशक्तीचा वापर करण्यात आला आहे. धुबरी आणि फुलबारी दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येत असलेल्या या चार पदरी मार्गाच्या पुलामुळे प्रवासाचे अंतर 205 किमीवरून 20 किमी आणि प्रवासाचा वेळ सुमारे सात तासांवरून 30 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
हरित ऊर्जा मार्गिका: लडाख–हरियाणा: पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रीड मंडळाने (NPG) शिफारस केलेला हा प्रकल्प, 5 गिगावॅट क्षमतेच्या पारेषण प्रणालीद्वारे 13 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि त्याचे ग्रीडशी एकीकरण सक्षम करेल. यामध्ये लडाखमधील पांग आणि हरियाणातील कैथल दरम्यान 480 किमी लांबीच्या एचव्हीडीसी पारेषण वाहिनीचा समावेश असून, तिच्या दोन्ही टोकांना 5 गिगावॅट क्षमतेचे एचव्हीडीसी टर्मिनल्स असतील. ही पारेषण प्रणाली कैथल येथे राष्ट्रीय ग्रीडला जोडण्यापूर्वी हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून जाईल. हा प्रकल्प आर्थिक वर्ष 2029–30 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
एकमेकांना जोडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्याद्वारे भविष्य घडवणे
प्रारंभ झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत, पीएम गतीशक्ती हा उपक्रम; एका राष्ट्रीय पायाभूत सुविधा नियोजन उपक्रमापासून ते एका व्यापक डिजिटल पध्दतीच्या नियोजन परिसंस्थेपर्यंत विकसित झाला आहे. मंत्रालये, राज्ये, जिल्हे आणि नवीन पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये होणाऱ्या त्याच्या विस्तारामुळे भारताच्या पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी अधिक एकात्मिक दृष्टिकोन निर्माण होत आहे.
References
Prime Minister's Office
https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1763576&lang=2®=48
Cabinet Committee on Economic Affairs (CCEA)
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1968732&lang=2®=48
Ministry of Commerce and Industry
https://pmgatishakti.gov.in/pmgatishakti/login
https://pmgatishakti.gov.in/pmgatishakti/about_pmgati
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2178521®=48&lang=2
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/apr/doc2023427188001.pdf
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1964364&lang=2®=48
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2297818®=48&lang=1
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2022/nov/doc20221124135401.pdf
https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1988824&lang=2®=48
https://www.dpiit.gov.in/offerings/schemes-and-services/details/pm-gati-shakti-kjNyATMtQWa
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2178521®=48&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2178500&lang=1®=3
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2297818&lang=2®=48
https://pmgatishakti.gov.in/pmgatishakti/downloadfilenew/--srv--NMP_Files--1741588112582_PMGatiShakti_Compendium%20Vol-1.pdf
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1910456&lang=2®=48
Ministry of Road Transport & Highways
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2111288&lang=1®=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2268357&lang=1®=48
Ministry of Railways
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2031049®=48&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2286394&lang=1®=48
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2206603&lang=1®=1
Gati Shakti Vishwavidyalaya
https://gsv.ac.in/
https://gsv.ac.in/vice-chancellor/
Ministry of Electronics & IT
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2301687&lang=1®=3
PIB Archive
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?ModuleId=3&NoteId=153274&lang=1®=3
https://www.pib.gov.in/FactsheetDetails.aspx?id=151083&NoteId=151083&ModuleId=16®=48&lang=2
पीडीएफ येथे पाहता येईल
नितीन फुल्लुके / वैभवी जोशी / संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(Explainer ID: 160564)
आगंतुक पटल : 104
Provide suggestions / comments