• Sitemap
  • Advance Search
Technology

गगन: भारताच्या आकाशात अचूकतेने दिशादर्शन

Posted On: 01 JUL 2026 2:53PM

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

गगन (जीपीएस एडेड जीईओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी विकसित केलेली भारताची स्वदेशी उपग्रह आधारित क्षमता संवर्धित प्रणाली आहे. ती जीपीएस अचूकता वाढविते आणि सुरक्षित विमान उड्डाणासाठी विश्वसनीय माहिती पुरविते. आंतरराष्ट्रीय मानक प्रमाणित गगन, विमान जमिनीवर उतरण्यासाठी उपग्रह आधारित सहाय्य पुरविते आणि हवाई क्षेत्रापलीकडे सेवा देते.स्वदेशी नेव्हिगेशन म्हणजेच दिशादर्शन क्षमता दृढ करून, गगन भारताचा तांत्रिक स्वावलंबनाचा आणि उपग्रह दिशादर्शन क्षेत्रात जागतिक नेतृत्वाचा दृष्टीकोन बळकट करते.

 

अचूक दिशादर्शनाची आवश्यकता : भारताने गगन का विकसित केले

हवाई वाहतुकीत अतिशय अचूक दिशादर्शनाची आवश्यकता असते इथे जागा निश्चित करण्यामध्ये अगदी क्षुल्लक चूक झाली तरी उड्डाणाच्या सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) विमानांना त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी सहाय्य करते मात्र या प्रणालीच्या सिग्नलवर वातावरणीय स्थिती आणि इतर बाबींचा त्यावर परिणाम होऊ शकतो. भारत महत्वाची हवाई बाजारपेठ म्हणून विस्तारत असताना अचूक आणि विश्वासार्ह दिशादर्शन ही राष्ट्रीय प्राधान्य असलेली बाब बनली आहे.

याची दखल घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतीय विमान प्राधिकरण(एएआय) यांनी संयुक्तपणे जीपीएस एडेड जीईओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन (गगन) प्रणाली विकसित केली.ही उपग्रह आधारित संवर्धित प्रणाली (एसबीएएस) असून तात्कालिक त्रुटी निवारण आणि विश्वसनीय माहिती पुरवीत जीपीएस सुधारणा करणारे तंत्रज्ञान आहे. जीपीएस सिग्नल दिशादर्शनासाठी अयोग्य असेल तर विश्वसनीय माहिती वैमानिकाला सावध करते.

2015 पासून गगन प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे.यामुळे एसबीएएस कार्यान्वित असलेल्या अमेरिका,युरोप,आणि जपान यासारख्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. आज गगन भारतीय हवाई क्षेत्रात सुरक्षित हवाई संचालनासाठी सहाय्य करत असून हवाई क्षेत्रापलीकडेही त्याचा उपयोग आहे. याने भारताची स्वदेशी दिशादर्शन क्षमता भक्कम झाली असून आत्मनिर्भर भारत हे देशाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगेकूच झाली आहे.

 

भारताच्या दिशादर्शन परिसंस्थेत गगन

गगन आपल्या प्रारंभापासून जागतिक स्तरावर ओळखला जाणारा दिशादर्शन उपग्रह म्हणून पुढे आला आहे.मागील काळात गगन ने महत्वाचे प्रमाणन आणि कार्यात्मक यश साध्य केले आहे.नुकतीच साध्य केलेली कामगिरी म्हणजे जून 2026 मध्ये नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने, गगनचा उपयोग करत व्यावसायिक जेट विमानावर भारताचा पहिला उपग्रह आधारित लँन्डींग सिस्टम अ‍ॅप्रोच म्हणजेच उपग्रहावर आधारित विमान उतरविण्याची पद्धत यशस्वीपणे पूर्ण केली.

 

गगनचे महत्वाचे घटक

ग्राउंड स्टेशन,संपर्क प्रणाली आणि जिओस्टेशनरी उपग्रह यांच्या समन्वित जाळ्याद्वारे गगन काम करते.हे घटक वास्तव वेळेत जीपीएस सिग्नलवर लक्ष ठेवतात,आवश्यक सुधारणा लक्षात घेतात आणि विमानाला विस्तृत दिशादर्शन माहिती पाठवितात.

महत्वाचे घटक

तैनात घटकांची संख्या

भूमिका

भारतीय रेफरन्स स्टेशन्स (आयएनआरईएस)

15

देशभरात जीपीएस सिग्नलवर सातत्याने देखरेख ठेवतात आणि त्रुटी शोधतात

इंडियन मास्टर कंट्रोल सेंटर्स (आयएनएमसीसी)

2

सर्व रेफरन्स स्टेशनकडून आलेला डाटा प्रोसेस करतात, सिग्नल करेक्शन मापन आणि विश्वसनीय माहिती निर्माण करतात

इंडियन लँड अपलिंक स्टेशन्स (आयएनएलयुएस)

3

जमिनीवरून गगन उपग्रहापर्यंत त्रुटी सुधारणा आणि विश्वासार्ह माहिती पाठवतात

संपर्क जाळे

4

सर्व गगन स्टेशन्सन जोडते आणि सुरक्षित,वास्तव काळात दिशादर्शन डाटा प्रसारण शक्य करते

गगन पेलोडसह जिओस्टेशनरी उपग्रह

3

सेवा क्षेत्रात सुधारित दिशादर्शन सिग्नल प्रसारित करतात

 

तुम्हाला हे माहित आहे का ? जिओस्टेशनरी भूस्थिर उपग्रह पृथ्वीच्या भ्रमणाच्या वेगानेच फिरत असल्याने आपल्याला ते एकाच जागी स्थिर दिसतात . जी सॅट – 8, जी सॅट – 10 आणि जी सॅट – 15 हे भारताचे जिओस्टेशनरी उपग्रह असून त्यावर गगनचे पेलोड आहे.या विशेष दिशादर्शन प्रणाली असून त्या गगनच्या सुधारणा आणि विश्वसनीय माहिती वापरकर्त्यांसाठी प्रसारित करतात.

या क्षेत्रात अधिक अचूक दिशादर्शन आणि विनाअडथळा संचालनाद्वारे ते उपग्रह आधारित हवाई वाहतूक क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधिक दृढ करत आहे.

 

भारताची दिशादर्शन विषयक स्वदेशी परिसंस्था

गगनची एकात्मिक संरचना भारताच्या व्यापक उपग्रह दिशादर्शन कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे.गगनसह भारताने नेव्हिगेशन विथ इंडियन कॉनस्टेलेशन (नाविक) ही स्वदेशी प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली विकसित केली आहे.स्थिती,दिशादर्शन आणि टायमिंग सुविधा नाविक देते तर अचूक विमान लँन्डींग आणि दिशादर्शनाला सहाय्य करण्यासाठी गगन जीपीएस सिग्नल अधिक सक्षम करते.

गगन

नाविक

उपग्रह आधारित संवर्धित प्रणाली (एसबीएएस)

स्वतंत्र प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली

वास्तविक वेळेत सुधारणा आणि विश्वासार्ह माहिती याद्वारे जीपीएस सुधारणा

पोझिशनिंग,दिशादर्शन आणि टायमिंग सेवा पुरविते

भारतीय हवाईउड्डाण माहिती क्षेत्रात नागरी हवाई वाहतूक क्षेत्राला सहाय्य

कव्हरेज क्षेत्रात भारत आणि भारतीय हद्दीच्या पलीकडे 1500 किमी क्षेत्राचा समावेश

 

आपल्याला हे माहित आहे का ?

2025 मध्ये भारताने नाविक रेफरन्स स्टेशन उभारण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमवेत करारावर स्वाक्षऱ्या केल्या.या उपक्रमामुळे राष्ट्रीय सीमेपलीकडे भारताच्या स्वदेशी दिशादर्शन प्रणालीची कामगिरी आणि पोहोच दृढ होईल. ही भागीदारी दिशादर्शन सहकार्य वृद्धिंगत करते आणि भारताच्या अंतराळ आधारित पोझिशनिंग आणि टायमिंग क्षमतेवरचा वाढता आंतरराष्ट्रीय विश्वास प्रतीत करते.

 

जागतिक दिशादर्शन जाळ्यासमवेत सुसंगत

आंतरराष्ट्रीय नागरी हवाई मानकांनुरूप गगन विकसित करण्यात आले आहे आणि ते विदेशी प्रणालीसमवेत काम करण्यासाठी सुसंगत असल्याने जीपीएस सिग्नलची अचूकता वाढविते. जसे की -

  • अमेरिकेची वाईड एरिया ऑग्मेमेंटेशन प्रणाली(डब्ल्यूएएएस)
  • युरोपियन जिओस्टेशनरी नेव्हिगेशन ओव्हरले सर्व्हिस (ईजीएनओएस)
  • जपानची मल्टी फंक्शनल सॅटेलाईट ऑग्मेमेंटेशन सिस्टम (एमएसएएस)

गगन ही विषुवृत्तीय क्षेत्रासाठी प्रमाणित पहिली एसबीएएस असून कार्यान्वित उपग्रह –आधारित ऑग्मेमेंटेशन सिस्टम असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताला समाविष्ट करते.

स्वदेशी नवोन्मेश आणि आंतरराष्ट्रीय मानके यांचा संगम घडवीत गगन भारताची हवाई सुरक्षितता आणि दिशादर्शन सेवा भक्कम करत आहे.

 

गगनचा प्रत्यक्ष वापर : हवाई क्षेत्रापलीकडे बहु क्षेत्रीय उपयोग

नागरी हवाई वाहतुकीकरिता उपयोगात आणण्यासाठी गगन प्रणाली विकसित करण्यात आली असली तरी अतिशय अचूक पोझिशनिंग आणि दिशादर्शन क्षमता यामुळे इतर अनेक क्षेत्रासाठीही ती सहाय्यकारक ठरत आहे.जीपीएस सिग्नलची अचूकता आणि विश्वासार्हता उंचावत गगन सुरक्षित संचालन,उत्तम नियोजन आणि अधिक प्रभावी सेवा प्रदान शक्य करते.

  • सागरी दिशादर्शन : सागरी आणि अपतटीय क्षेत्रात अधिक अचूक पोझिशनिंग शक्य करते.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग: कुशल परिवहन आणि वाहन ताफा व्यवस्थापनासाठी सहाय्य.
  • रेल्वे : कार्यात्मक क्षमता आणि सुरक्षितता सुधारते
  • आपत्ती व्यवस्थापन : आपात्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये अचूक स्थान शोधणे शक्य करते.
  • संरक्षण आणि सुरक्षितता : संरक्षण कार्यासाठी दिशादर्शन बळकट करते.
  • टेलीकम्युनिकेशन : दूरसंवाद पायाभूत सुविधांचे विश्वासार्ह समन्वयन करण्यासाठी सहाय्य करते.
  • सर्वेक्षण आणि मॅपिंग : भू सर्वेक्षण आणि भू स्थानिक मॅपिंग अचूकता सुधारते.

हवाई क्षेत्रापलीकडे अचूक उपग्रह दिशादर्शनाचे लाभ पोहोचवत गगन,अधिक प्रभावी सार्वजनिक सेवांमध्ये योगदान देत आहे.

 

पुढील मार्ग

आगेकूच जारी राखत,गगन देशभरात सुरक्षित हवाई दिशादर्शनाला सहाय्य,हवाई वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा आणि संपूर्ण देशभरात उपग्रह आधारित दिशादर्शन सेवा विस्तारत भारताची उपग्रह दिशादर्शन परिसंस्था बळकट करत राहील. स्वदेशी दिशादर्शन तंत्रज्ञानाला पुढे नेण्यात आणि विदेशी प्रणालींवरचे अवलंबित्व कमी करण्यात गगन,नाविकसह महत्वाची भूमिका बजावेल.परिवहन,आपत्ती व्यवस्थापन,सर्वेक्षण आणि इतर क्षेत्रातल्या वाढत्या उपयोगांमुळे कनेक्टेड,आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान चलित भविष्याकडे भारताच्या वाटचालीचा गगन हा महत्वाचा स्तंभ राहील.

 

संदर्भ

अंतराळ विभाग

पीआयबी बॅकग्राउंडर

हवाई वाहतूक मंत्रालय

यु आर राव उपग्रह केंद्र

इस्रो

 

Click here for pdf file

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/निलीमा चितळे/दर्शना राणे

(Explainer ID: 159149) आगंतुक पटल : 13
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Assamese , Gujarati , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Tamil , Telugu , Kannada , Malayalam