Economy
एआय@वर्क : उत्पादकता, नोकऱ्या आणि नवोन्मेषाला चालना
सर्वसमावेशक विकास, नवोन्मेष आणि कौशल्य विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Posted On:
12 FEB 2026 1:29PM

महत्त्वाची वैशिष्ट्ये
- स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या 2025 च्या ग्लोबल एआय व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
- डेटा पायाभूत सुविधा, उद्यमशीलता आणि लोकसंख्याशास्त्र हे कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) अंगिकारासाठी प्रमुख घटक आहेत.
- भारतामध्ये, समान व्यवसायांच्या संचामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांचा सापेक्ष प्रसार जागतिक सरासरीपेक्षा 2.5 पटीने जास्त होता (स्टॅनफोर्ड ग्लोबल एआय इंडेक्स रिपोर्ट).
- 87% उपक्रम सक्रीयपणे एआय उपायांचा वापर करत आहेत (नॅसकॉम एआय अडॉप्शन इंडेक्स)

एआयः वृद्धीचे इंजिन
कोडिंगपासून सर्जनशीलतेपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचे नियम नव्याने लिहित आहे; उद्योगांना शक्ती देत आहे, नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे आणि भारताला भविष्याकडे झेप घेण्यास प्रवृत्त करत आहे. AI हे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगाराच्या वाढीसाठी एक गतिमान प्रेरक शक्ती ठरत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आर्किटेक्चरच्या ऍप्लिकेशन्स, मॉडेल्स, चिप्स, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या पाचही स्तरांवर पद्धतशीर प्रगतीसह भारत 'एआय-सज्ज' राष्ट्रांच्या पहिल्या गटामध्ये समाविष्ट आहे. भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक बाजारपेठेतील आकारमान 2020 मधील 103.6 अब्ज अमेरिकन डॉलरवरून वाढून 2024 मध्ये 288.8 अब्ज अमेरिकन डॉलर झाले आहे. याच कालावधीत, भारतातील एआय बाजारपेठ 2.97 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 7.63 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत विस्तारली आहे. भारतीय एआय बाजारपेठ 42.2% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीसह (CAGR) 2032 पर्यंत 131.31 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
भारत सरकार "सर्वांचे कल्याण, सर्वांचे सुख" सुनिश्चित करतानाच, AI प्रेरित परिवर्तनाशी सुसंगत अशा भारतातील तांत्रिक विकासाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासातील केंद्रित उपक्रमांद्वारे हे साध्य झाले आहे. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि देशाची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत होईल, याची हमी सरकारद्वारे उचलली गेलेली पावले देत आहेत.

जागतिक एआय क्षेत्रातील भारताचे उदयोन्मुख नेतृत्व
जागतिक मानके असे दर्शवतात की, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेच्या बाबतीत एक सुस्थितीत असलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.

|
जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान
|
|
सूची
|
भारताची क्रमवारी
|
याचे महत्त्व काय ?
|
|
स्टॅनफर्ड विद्यापीठाची 2025 जागतिक एआय व्हायब्रन्सी
|
अमेरिका आणि चीनच्या मागे तिसरी
|
संशोधन आणि विकास, प्रतिभा आणि अर्थव्यवस्था यात वृद्धी
|
|
आएमएफचा एआय सज्जता निर्देशांक
|
भारताने 49.3 गुण मिळवले आहेत, जे इतर उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या 42.1 या सरासरी गुणांपेक्षा जास्त आहेत
|
भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) स्वीकारण्यासाठी आणि त्यापासून लाभ मिळवण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे.
|
|
ऑक्सफर्डचा सरकारी एआय सज्जता निर्देशांक 202
|
दक्षिण आणि मध्य आशियामध्ये भारत आपले आघाडीचे स्थान राखून आहे आणि 66.55 गुणांसह जागतिक स्तरावर 27 व्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये घेतलेले विविध गतिमान निर्णय आणि प्रयत्नांच्या जोरावर भारताची ही भक्कम वार्षिक प्रगती झाली आहे.
|
एकत्रितपणे, हे जागतिक निर्देशांक उत्पादकता, सर्वसमावेशकता आणि दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनासाठी एक प्रेरक शक्ती म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेण्याची भारताची वाढती क्षमता अधोरेखित करतात.
|
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारताचे धोरणात्मक वर्चस्व
भारताची जागतिक एआय सज्जता ही तरुण आणि डिजिटली कुशल लोकसंख्या, भक्कम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगाने वाढणारी स्टार्टअप परिसंस्था यांच्या अनोख्या मिश्रणावर आधारित आहे. हे पायाभूत घटक भारताला मोठ्या प्रमाणावर एआय विकसित करण्यासाठी, तैनात करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक शाश्वत धोरणात्मक आघाडी प्रदान करतात.

जनसांख्यिकी
भारताचे मनुष्यबळ जगातील सर्वात तरुण मनुष्यबळांपैकी एक आहे, जिथे 65% पेक्षा जास्त लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. हा मोठा आणि तंत्रज्ञानस्नेही गुणवत्तेचा पाया एआय आधारित उद्योगांसाठी प्रशिक्षित आणि अनुकूल केला जाऊ शकतो, जो नवोन्मेष (innovation), डिजिटल सेवा आणि भविष्य-सज्ज नोकऱ्यांसाठी एक मजबूत पाया तयार करतो.
डिजिटल पायाभूत सुविधा
भारताचे वेगवान डिजिटल रूपांतर एका मजबूत पायाभूत रचनेवर आधारित आहे, ज्यामध्ये डेटा सेंटर्स आणि व्यापक इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे देशभर क्लाउडचा वापर, एआय तैनात करणे आणि डेटा-आधारित शासनासाठी महत्त्वपूर्ण प्रेरक शक्ती म्हणून उदयास येत आहेत.
भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मुख्य स्तंभांपैकी एक म्हणजे डेटा सेंटर्सचा विस्तार आणि विकास. क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा स्टोरेज आणि AI/ML ॲप्लिकेशन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही सेंटर्स अत्यंत महत्त्वाची आहेत. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने दिल्ली, पुणे, भुवनेश्वर आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये अत्याधुनिक नॅशनल डेटा सेंटर्स स्थापन केली आहेत, जी सरकारी मंत्रालये, राज्य सरकारे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना भक्कम क्लाउड सेवा प्रदान करतात. नॅशनल डेटा सेंटर्समध्ये साठवणूक क्षमता वाढवून ती अंदाजे 100PB पर्यंत करण्यात आली आहे, ज्यामध्ये 'ऑल फ्लॅश एंटरप्राइझ क्लास स्टोरेज', 'ऑब्जेक्ट स्टोरेज' आणि 'युनिफाइड स्टोरेज'चा समावेश आहे. एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण, उपयोजन आणि होस्टिंगसाठी डेटा स्टोरेज अत्यंत आवश्यक असून डेटा सेंटर्समधील वेगवान वाढ यामुळे येणारे अडथळे दूर करण्यास मदत करत आहे.
जून 2025 मध्ये इंटरनेट कनेक्शनने 100 कोटींचा टप्पा ओलांडून 100.29 कोटींची संख्या गाठली आहे. मार्च 2014 मधील 25.15 कोटींच्या तुलनेत यात 298.77% ची प्रचंड वाढीची नोंद झाली आहे.
40 कोटींहून अधिक 5G वापरकर्त्यांसह, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा 5G ग्राहक वर्ग आणि जागतिक स्तरावर सर्वात वेगाने तंत्रज्ञान स्वीकारणारा देश ठरला आहे.
ऑप्टिकल फायबर केबल (OFC) ची लांबी 19.35 लाख मार्ग किमी (2019) वरून वाढून 42.36 लाख मार्ग किमी झाली आहे. आता एकूण 2,14,843 ग्रामपंचायती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडल्या गेल्या आहेत.
डिसेंबर 2025 पर्यंत 5G/6G, AI, आणि Quantum दळणवळण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी 550 कोटी रुपयांच्या 136 प्रकल्पांना अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
2024 मध्ये एआयला प्राधान्य देत, भारताने यापूर्वीच एआय क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी 38,000ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट प्राप्त केले आहेत.
उद्योजकता
गेल्या दशकात भारतीय स्टार्टअप क्षेत्रात अभूतपूर्व विस्तार झाला असून, देशभरात DPIIT द्वारे 2,00,000 हून अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे.
स्टार्ट अप्स आणि एआय उद्योजक हे भारताच्या भवितव्याचे सह-आरेखक आहेत आणि ही वाढती उद्यमशील परिसंस्था एआय उपाय स्थानिक पातळीवर उपयुक्त, परिणामकारक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असतील हे सुनिश्चित करते.
एआय स्टार्ट अप्स
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 या शिखर परिषदेच्या तयारीसाठी 'फाउंडेशन मॉडेल पिलर' अंतर्गत निवडलेल्या 12 भारतीय एआय स्टार्टअप्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील गोलमेज परिषदेत आपले विचार आणि कार्य सादर केले.
हे स्टार्टअप्स भारतीय भाषांचे मॉडेल्स, बहुभाषिक LLMs, स्पीच-टू-टेक्स्ट, टेक्स्ट टू ऑडियो आणि टेक्स्ट टू व्हिडिओ, ई-कॉमर्ससाठी जनरेटिव्ह एआयद्वारे 3D कंटेंट, मार्केटिंग आणि वैयक्तिकृत आशय निर्मिती, इंजिनिअरिंग सिम्युलेशन्स, मटेरियल रिसर्च आणि विविध उद्योगात डेटा चलित निर्णय घेण्यासाठी आधुनिक विश्लेषणशास्त्र, आरोग्य निदान आणि वैद्यकीय संशोधन अशा विविध क्षेत्रांत काम करत आहेत.
संधी म्हणून एआय: कामगार बाजारपेठेतील उत्क्रांती
जागतिक स्तरावर एआयमुळे रोजगारावर गदा येईल अशी भीती असली, तरी भारतासाठी ही सर्वसमावेशक वाढ आणि नाविन्यपूर्ण बदलांची एक अनोखी संधी आहे.
एआय कौशल्यांची वाढती मागणी: दक्षिण आशियात जानेवारी 2023 ते मार्च 2025 दरम्यान, एआय-संबंधित नोकरीच्या जाहिरातींचे प्रमाण 2.9% वरून दुपटीने वाढून 6.5% झाले आहे.
याच काळात एआय कौशल्यांची मागणी बिगर-एआय भूमिकांच्या तुलनेत 75% वेगाने वाढली आहे. भारत आता एआय अंगिकार आणि प्रतिभेच्या मागणीची पूर्तता करणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

भारताच्या कामगार बाजारपेठेतील परिवर्तन
कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित नोकऱ्यांमध्ये होत असलेली झपाट्याने वाढ भारताच्या कामगार बाजारपेठेत सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे दर्शवते.
स्टॅनफर्ड एआय इंडेक्स अहवाल 2025 नुसार, एआय क्षेत्रातील प्रतिभा भरतीमध्ये भारत जगात आघाडीवर असून वार्षिक भरती दर सुमारे 33 टक्के आहे.
भौगोलिक वितरणानुसार गीटहब वरील एआय प्रकल्पांच्या जागतिक आकडेवारीनुसार, 2024 मध्ये एकूण एआय प्रकल्पांपैकी 19.9 टक्के योगदानासह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा योगदानकर्ता ठरला.
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या एआय इंडेक्स अहवाल 2025 नुसार, समान व्यवसाय गटांमध्ये एआय कौशल्यांची सापेक्ष उपलब्धता भारतात जागतिक सरासरीपेक्षा 2.5 पट अधिक होती.
जॉर्जटाउन विद्यापीठाच्या माहितीनुसार, 2015 ते 2025 या कालावधीत भारताने एआय विषयाशी संबंधित 2,62,404 संशोधन लेख प्रकाशित केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनातील अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवले आहे. हे संशोधन भारतातील बळकट तांत्रिक कौशल्याचे प्रतीक असून, आर्थिक सर्वेक्षण 2025–26 मध्येही याची नोंद घेण्यात आली आहे.
जगातील एआयविषयक ज्ञान असलेल्या कामगारशक्तीमध्ये भारताचा समावेश अग्रस्थानी होत असून, या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरोग्य, कृषी, वित्त, शिक्षण आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यापक देशांतर्गत डेटा व्यवस्थेमुळे भारताला तुलनात्मकदृष्ट्या मोठे फायदे मिळण्याची क्षमता आहे.
या प्रवाहामुळे तंत्रज्ञान, सेवा, उत्पादन आणि सर्जनशील उद्योगांमध्ये उच्च मूल्याच्या नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. एआयचा वापर वाढत असताना एआय प्रशिक्षक, सेफ्टी टेस्टर्स आणि प्रॉम्प्ट इंजिनिअर्स यांसारख्या विविध नव्या पदांची मागणी वाढत आहे. कौशल्य भारत , डिजिटल इंडिया आणि फ्युचरस्किल्स प्राइम यांसारख्या उपक्रमांद्वारे कौशल्यवृद्धी आणि पुनर्कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून, त्यामुळे अनुभवी तसेच नव्या उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
एआय केंद्र म्हणून दक्षिण भारताचा उदय :
जागतिक बँकेच्या साउथ एशिया डेव्हलपमेंट अपडेट अहवालानुसार, दक्षिण आशियातील एआय-संबंधित रोजगार संधी प्रामुख्याने भारत आणि श्रीलंका येथे केंद्रित असून, त्यामध्ये भारताचा सर्वाधिक वाटा आहे. भारतामध्ये 2025 मधील पांढरपेशा नोकरी जाहिरातींपैकी 5.8 टक्के पदांसाठी एआय कौशल्याची आवश्यकता होती. बंगळुरू (एआय नोकऱ्यांमध्ये 11% वाटा) आणि हैदराबाद (9.57%) यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील तंत्रज्ञान पट्ट्यामुळे ही वाढ होत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे (6.95%) आणि चेन्नई (6.62%) ही शहरेही एआय रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची केंद्रे म्हणून पुढे येत आहेत.
वेतनवाढ आणि कामगार बाजारपेठेतील प्रोत्साहन
एआय-संबंधित रोजगारामध्ये लक्षणीय वेतन लाभ मिळत असून, उदयोन्मुख कौशल्यांसाठी जागतिक स्तरावर मोठी मागणी असल्याचे यातून दिसून येते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, डिजिटल कौशल्यांची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांमध्ये सरासरी 12 टक्के अधिक वेतन मिळते, तर एआय-केंद्रित पदांसाठी सुमारे 28 टक्के अधिक वेतन दिले जाते. एआय कौशल्यांचा विस्तार होत असताना भारत अधिक उच्च-मूल्य गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्प आकर्षित करण्याच्या स्थितीत येत आहे. यामुळे अधिक वेतनाच्या रोजगार संधी निर्माण होऊन जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
भारताची रोजगार सुरक्षितता
भारताला आपल्या कामगारशक्तीचे पुनर्कौशल्य विकसित करण्याची तसेच एआयचा टप्प्याटप्प्याने, सर्वसमावेशक आणि उत्पादकता वाढविणाऱ्या पद्धतीने वापर करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. शेती, आरोग्यसेवा आणि लॉजिस्टिक्स यांसारखी क्षेत्रे, जिथे मानवी कौशल्ये अद्याप अत्यावश्यक आहेत, तीही आता एआयचा स्वीकार करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत.
उत्पादकता वाढ आणि कौशल्य विकास
भारतामध्ये एआयचा स्वीकार वाढत असल्यामुळे उत्पादकतेत लक्षणीय वाढ होत असल्याचे विविध अहवालांतून दिसून येते. नॅसकॉम एआय अडॉप्शन इंडेक्सनुसार भारताला 4 पैकी 2.45 गुण मिळाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत 87 टक्के उद्योगसंस्था सक्रियपणे एआय उपायांचा वापर करत आहेत. मॅकिंझीने 1993 कंपन्यांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2025 मध्ये सर्वेक्षणातील 88 टक्के संस्थांनी त्यांच्या किमान एका व्यावसायिक कार्यात एआयचा वापर सुरू केल्याचे सांगितले. अभ्यासांनुसार, जनरेटिव्ह एआय साधनांमुळे एकूण उत्पादकतेत सुमारे 14 टक्के वाढ होते, तर नवोदित किंवा कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ही वाढ 34 टक्क्यांपर्यंत पोहोचते. यामुळे कौशल्यातील दरी कमी होण्यास मदत होत असून उत्पादकता आणि ग्राहक अनुभव दोन्ही सुधारत आहेत.
सेवा क्षेत्रात एआयमुळे वेगाने वाढ
2024–25 या कालावधीत भारताच्या स्थूल मूल्यवर्धनात (GVA) सुमारे 55.3 टक्के योगदान देणारे सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार राहिले आहे. आयटी, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण आणि दळणवळण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर झपाट्याने वाढत असून, यामुळे उत्पादकता, नवोन्मेष आणि शाश्वत व्यवसाय पद्धतींना चालना मिळत आहे. या क्षमतांच्या बळावर भारतीय कंपन्या एआयचा अवलंब करून जागतिक स्तरावर आपली स्पर्धात्मक ताकद अधिक बळकट करण्याच्या स्थितीत आहेत.
एआय आणि मानवता
मानवी क्षमतांना अधिक बळ देत आणि उच्च मूल्याच्या रोजगार संधी वाढवत एआय भारतातील कामकाजाच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निर्णयप्रक्रिया आणि सर्जनशीलतेच्या केंद्रस्थानी मानव कायम राहील, याचीही यामध्ये खात्री आहे. विशेषतः गुंतागुंतीच्या आणि संदर्भाधारित कामांमध्ये एआय मानवी कामाची जागा घेण्यापेक्षा त्याला पूरक ठरण्यास अधिक सक्षम असल्याचे दिसून येते. एआयमुळे उत्पादकता वाढण्याची अपेक्षा असून, कामगारांना सर्जनशील, विश्लेषणात्मक आणि मानवी संवादावर आधारित भूमिकांवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. मानवी श्रमांची जागा घेण्याऐवजी मानव आणि यंत्रे एकत्रितपणे काम करतील, अशा पद्धतीने सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल. भारताची तंत्रज्ञान आणि एआय परिसंस्था आधीच 60 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देत असून ती सातत्याने विस्तारत आहे. रोजगार कमी करण्याऐवजी रोजगाराचे स्वरूप बदलण्याला पाठबळ देत, एआय आणि मानव यांच्यात संतुलन राखण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे.
विविध क्षेत्रांमध्ये एआयचा विस्तार आणि कामकाजाचे भविष्य
सेवा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, उत्पादन, निर्मिती, पुरवठा साखळी तसेच ग्राहकांशी थेट संबंधित उपक्रमांमध्येही एआयमध्ये परिवर्तन घडविण्याची मोठी क्षमता आहे. अधिक कार्यक्षमता आणि वैयक्तिक गरजांनुसार सेवा देण्यामुळे या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. एआयचा व्यापक स्वीकार रोजगाराच्या संधी वाढवू शकतो, कामगार बाजारपेठेचे स्वरूप बदलू शकतो आणि सातत्याने कौशल्यवृद्धीला प्रोत्साहन देऊ शकतो. यामुळे मानवी कौशल्य आणि तांत्रिक प्रगती यांचा प्रभावी संगम साधणारी गतिमान आणि सर्वसमावेशक कामगारशक्ती विकसित होण्यास मदत होते.
एआयमुळे कामाच्या स्वरूपात परिवर्तन
भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात धोरणात्मक पद्धतीने पुढे जात आहे. यामधून तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याची गरज अधोरेखित होते. उत्पादकता, सर्वसमावेशक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे साधन म्हणून तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी भारत सरकार विविध राष्ट्रीय कार्यक्रम आणि कौशल्यवृद्धी उपक्रमांद्वारे प्रयत्न करत आहे.
नीती आयोगाच्या “द ऑपर्च्युनिटी फॉर अॅक्सेलरेटेड इकॉनॉमिक ग्रोथ” या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, एआयमुळे निर्माण होणाऱ्या मूल्यवृद्धीच्या माध्यमातून 2035 पर्यंत आघाडीच्या देशांच्या तुलनेत असलेली एआय कौशल्यातील दरी भारत हळूहळू कमी करू शकतो. याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार विकसित अर्थव्यवस्थांमध्ये प्रत्येक 10 पैकी एका नोकरीसाठी, तर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये प्रत्येक 20 पैकी एका नोकरीसाठी किमान एका नव्या कौशल्याची गरज भासत आहे. यावरून कामगार बाजारपेठेत कौशल्यांमध्ये वेगाने बदल होत असल्याचे स्पष्ट होते.
कुशल कामगारशक्ती विकसित करणे, संशोधन क्षमता अधिक बळकट करणे आणि एआय मॉडेल्स तसेच नवोन्मेष प्रक्रियेत सक्रिय योगदान देणे यांद्वारे हे साध्य करता येऊ शकते. बदलत्या कामकाजाच्या जगात सुसंगत राहण्यासाठी सातत्याने कौशल्यवृद्धी करणे अत्यावश्यक होत चालल्याचे या प्रवाहातून स्पष्ट होते. या बदलाची दखल घेत भारत विविध लक्षित कौशल्य विकास उपक्रमांद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगासाठी आपल्या कुशल कामगारशक्तीला सक्रियपणे तयार करत आहे.
राष्ट्रीय उपक्रम
विकसित भारत दृष्टीकोन 2027 अंतर्गत, एआयला डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा चालक म्हणून पाहिले जात आहे. उद्योगांमध्ये एआयचा समावेश करून भारताचे उद्दिष्ट कामगारशक्तीची उत्पादकता वाढवणे, नव्या रोजगार संधी निर्माण करणे आणि कौशल्यातील अंतर कमी करणे आहे. या पद्धतीमुळे उच्च कौशल्य असलेल्या तसेच प्रारंभिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना सशक्त केले जाईल आणि बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत समतोल सहभाग सुनिश्चित होईल.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम राबविला आहे. हा कार्यक्रम एआयचा वापर वाढवून सर्वांचा सहभाग, सर्जनशीलता आणि समाजासाठी फायदेशीर परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये चार मुख्य भाग आहेत –
- राष्ट्रीय एआय केंद्र,
- डेटा व्यवस्थापन कार्यालय,
- एआय कौशल्य विकास, आणि
- जबाबदार एआय.
#AIforAll या तत्त्वाशी सुसंगत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्वयं-शिक्षण आधारित ऑनलाइन कार्यक्रमावर सरकार भर देत आहे, जेणेकरून प्रत्येकाला डिजिटल परिवर्तनाची ओळख होईल. हा कार्यक्रम दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे — एआय अवेअर आणि एआय ॲप्रीशिएट
भाषिणी उपक्रम, 36 पेक्षा अधिक भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून डिजिटल अर्थव्यवस्थेत संवादातील अडथळे दूर करत आहे. हे ॲप्लिकेशन बारा लाखाहून अधिक जणांनी डाउनलोड केले असून ते विशेषत्वाने इंग्रजी न बोलणाऱ्या प्रदेशांमधील लोकांसाठी रोजगार संधी वाढवणे स्थानिक उद्योजक आणि डिजिटल कामगारांना सशक्त करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार, देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करण्याच्या गतीचे मूल्यांकन करण्यासाठी 'AI आर्थिक परिषद' स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. 'मानवी बुद्धिमत्तेचे' मोल देऊन 'कृत्रिम बुद्धिमत्ते'चा वापर होत नाही ना, हे या परिषदेला सुनिश्चित करायचे आहे. ही परिषद तंत्रज्ञानाची अंमलबजावणी भारताच्या शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या पायाभूत सुविधांशी सुसंगत ठेवण्यासाठी एक समन्वय प्राधिकरण म्हणून काम करेल, तसेच संसाधनाच्या मर्यादा आणि विकासाच्या प्राधान्यांचा विचार करेल.
एकत्रितपणे, हे कार्यक्रम भारतातील कामाच्या स्वरूपात मोठे बदल घडवून आणत असून, देशाला विकसित होत असलेल्या डिजिटल युगात उत्पादकता, समावेशन आणि शाश्वत रोजगार निर्मिती करिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी सक्षम बनवत आहेत.
कौशल्य विकास उपक्रम
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020: या धोरणे शिक्षणाच्या सर्व स्तरांमध्ये डिजिटल आणि एआय साक्षरतेवर मुख्य क्षमता म्हणून भर देण्यात आला आहे. अभ्यासक्रमात संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण समाविष्ट करून, हे धोरण भारताची पुढच्या पिढीला बदलत्या तंत्रज्ञानात्मक वातावरणासाठी तयार केले जात आहे.
कौशल्य भारत अभियान: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (एमएसडीई) नेतृत्वाखालील स्किल इंडिया मिशनमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा समावेश प्रशिक्षण परिसंस्थेत करण्यात आला आहे.
डिसेंबर 2025 पर्यंत, एसओएआर (कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेसाठी कौशल्य) उपक्रमांतर्गत 1.34 लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. या उपक्रमांतर्गत, विद्यार्थी आणि शिक्षकांना मूलभूत आणि उपयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि नॅसकॉम यांच्या भागीदारीत एआय-रेडीनेस अभ्यासक्रम आयोजित केले जात आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तयारीबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी एसओएआर (स्किलिंग फॉर एआय रेडीनेस) अंतर्गत #SkilltheNation आव्हानाची सुरुवात केली.
YUVAi (युथ फॉर उन्नती विथ एआय): इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) द्वारे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, तांत्रिक आणि सामाजिक कौशल्यांनी सर्वसमावेशक पद्धतीने सुसज्ज करण्यासाठी आरेखित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तरुण विद्यार्थ्यांना आठ विषय क्षेत्रांमध्ये एआय-आधारित उपायांचा शोध घेण्यासाठी आणि लागू करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे, जे आहेत:
YUVAi चे आठ विषय क्षेत्रे
कृषी
आरोग्य
शिक्षा
पर्यावरण
परिवहन (वाहतूक)
ग्रामीण विकास
स्मार्ट शहरे
कायदा आणि न्याय
YUVAi (Youth for Unnati with AI): हा एक मोफत राष्ट्रीय अभ्यासक्रम आहे जो एआय साक्षरतेला एक मुख्य जीवन कौशल्य बनवतो ज्याचा उद्देश 1 कोटी नागरिकांना मूलभूत कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांनी सक्षम करणे आहे. हा अभ्यासक्रम 11 भाषांमध्ये (आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू) उपलब्ध आहे. फ्युचरस्किल्स प्राइम, आयजीओटीकर्मायोगी, दीक्षा आणि इतर लोकप्रिय एज्युकेशन-टेक पोर्टल सारख्या आघाडीच्या शिक्षण प्लॅटफॉर्मवर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग (एआय आणि सीटी): कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग (एआय आणि सीटी) हे भविष्यासाठी सज्ज करणाऱ्या शिक्षणाचे आवश्यक घटक आहेत. ते शिकणे, विचार करणे आणि शिकवणे या संकल्पनेला बळकटी देतात आणि हळूहळू "सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता" या संकल्पनेला चालना देतात. हा उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराकडे जाणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो, कारण ही तंत्रज्ञान पायाभूत स्तरापासून, म्हणजेच इयत्ता तिसरीपासून, सेंद्रिय पद्धतीने अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहे.
फ्यूचरस्किल्स प्राइम इनिशिएटिव्ह: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नॅसकॉम यांच्यातील सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानातील व्यावसायिकांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे उपक्रम राष्ट्रीय व्यावसायिक मानके (NOS) आणि राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) यांच्याशी सुसंगत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नियोक्त्यांकडून अत्यंत मूल्यवान अशी मागणी असलेली कौशल्ये आत्मसात करता येतात. 25.3 लाखांहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी आणि 3000 हून अधिक अभ्यासक्रमांद्वारे हे व्यासपीठ थेट कार्यबल परिवर्तनात योगदान देत आहे, यामुळे विविध क्षेत्रांमध्ये रोजगारक्षमता आणि उत्पादकता वाढत आहे.
इंडियाएआय फ्यूचरस्किल्स: इंडियाएआय मिशन (2024) अंतर्गत सुरू केलेला हा उपक्रम, पदवीपूर्व ते डॉक्टरेट अभ्यासापर्यंत अनेक शैक्षणिक स्तरांवर लक्ष्यित उपाययोजनांद्वारे एआय-कुशल व्यावसायिकांची एक मजबूत परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या प्रमुख घटकांमध्ये पदवी, दुहेरी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप कार्यक्रम, एआय आणि डेटा लॅबची स्थापना आणि विशेष कौशल्य-वर्धन अभ्यासक्रमांचा विकास यांचा समावेश आहे.
डिसेंबर 2025 पर्यंत, सरकार 500 पीएचडी संशोधक, 5,000 पदव्युत्तर आणि 8,000 पदवी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित कामासाठी मदत करत आहे. एआय, डेटा क्युरेशन, अॅनोटेशन, क्लीनिंग आणि अप्लाइड डेटा सायन्समध्ये अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी एनआयईएलआयटी द्वारे श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांमध्ये 27 इंडियाएआय डेटा आणि एआय लॅब्स स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच, 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 174 आयटीआय आणि पॉलिटेक्निकना अतिरिक्त इंडियाएआय डेटा आणि एआय लॅब्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
स्किल इंडिया डिजिटल हब (सिद्ध): एमएसडीईने स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच) देखील सुरू केले, जे कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म असून ज्यामध्ये परिचयात्मक कार्यक्रमांपासून ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सर्व प्रवीणता स्तरांवर विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी एआय आणि मशीन लर्निंग कोर्ससाठी विविध निवड आहे.
भविष्यासाठी तयार आणि समावेशक कार्यबलाकडे
भारत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परिवर्तनात आघाडीवर असून यामुळे तंत्रज्ञान उत्पादकता, नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते आहे. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, तरुण कर्मचारी वर्ग आणि प्रगतीशील धोरणांमुळे समावेशक विकासाकरिता वापर करण्यासाठी देश चांगल्या स्थितीत आहे. सरकारचा हा एकात्मिक दृष्टिकोन एआय रोजगारक्षमता वाढवतो आणि कौशल्यातील दरी भरून काढणे शक्य बनवतो. तंत्रज्ञान आणि समावेशकता यांचा समतोल राखत भारत एक सक्षम लवचिक आणि भविष्यात हिमुख कार्य बल घडवत आहे.
References
Competition Commission of India
https://www.cci.gov.in/economics-research/market-studies/details/47/0
Niti Aayog
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2177440
https://niti.gov.in/sites/default/files/2025-09/AI-for-Viksit-Bharat-the-opportunity-for-accelerated-economic-growth.pdf
https://niti.gov.in/sites/default/files/2025-10/Roadmap_On_AI_for_Inclusive_Societal_Development.pdf
https://niti.gov.in/sites/default/files/2025-10/Roadmap_for_Job_Creation_in_the_AI_Economy.pdf
https://www.niti.gov.in/sites/default/files/2023-03/National-Strategy-for-Artificial-Intelligence.pdf
International Monetary Fund
https://www.imf.org/en/Blogs/Articles/2024/01/14/ai-will-transform-the-global-economy-lets-make-sure-it-benefits-humanity
https://www.imf.org/en/blogs/articles/2026/01/14/new-skills-and-ai-are-reshaping-the-future-of-work
PHD Chamber of Commerce and Industry
https://www.phdcci.in/wp-content/uploads/2024/04/Viksit-Bharat@2047-A-Blueprint-of-Micro-and-Macro-Economic-Dynamics.pdf
International Labour Organisation
https://www.ilo.org/media/38031/download
Ministry of Information & Broadcasting
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx/pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=2082144
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2216958®=3&lang=1
DD News
https://ddnews.gov.in/en/centre-boosts-internet-connectivity-across-india-under-digital-india-initiative/
Department for Promotion of Industry and Internal Trade
https://www.startupindia.gov.in/content/sih/en/Prabhaav.html
World Bank
https://openknowledge.worldbank.org/server/api/core/bitstreams/39588063-e63b-4350-ba39-ccf329143a65/content
https://blogs.worldbank.org/en/endpovertyinsouthasia/labor-market-implications-of-ai-adoption-in-south-asia-in-five-c
Economic Survey
https://www.indiabudget.gov.in/budget2025-26/economicsurvey/doc/eschapter/echap13.pdf https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/doc/eschapter/echap14.pdf
Ministry of Finance
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2098048
Indian Council for Research on International Economic Relations
https://icrier.org/pdf/ES/ES-Implications_of_AI_on_the_Indian_Economy.pdf
Ministry of Electronics and Information Technology
https://www.digitalindia.gov.in/initiative/national-program-on-artificial-intelligence/
https://bhashini.gov.in/
https://www.futureskillsprime.in/
https://indiaai.gov.in/hub/indiaai-futureskills
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2206767®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2214120®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2198216®=3&lang=1
Ministry of Education
https://ai-for-all.in/#/home
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2184211®=3&lang=1
Ministry of Skill Development and Entrepreneurship
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2150228
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2204136®=3&lang=1
Ministry of Labour and Employment
https://sansad.in/getFile/annex/268/AU3299_IiQ1Vk.pdf?source=pqars
President of India
https://presidentofindia.nic.in/press_releases/president-india-launches-skillthenation-ai-challenge-and-virtually-inaugurates-ignou
Prime Minister’s Office
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2212390®=3&lang=1
Others
https://www.nber.org/papers/w31161
https://x.com/JM_Scindia/status/2012015160781914541?utm
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2209737&lang=1®=3
https://hai.stanford.edu/assets/files/hai_ai_index_report_2025.pdf
https://hai.stanford.edu/ai-index/global-vibrancy-tool
https://oxfordinsights.com/wp-content/uploads/2026/01/Government-AI-Readiness-Report-2025-1.pdf
https://cat.eto.tech/?expanded=Summary-metrics
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=157247&ModuleId=3®=3&lang=1
Click here to see PDF
***
नेहा कुलकर्णी / शैलेश पाटील /राज दळेकर / श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 157603)
आगंतुक पटल : 29
Provide suggestions / comments