Social Welfare
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025
भारताच्या युवा खेळाडूंची विक्रमी कामगिरी
Posted On:
26 NOV 2025 10:50AM
|
मुख्य मुद्दे
|
-
2025 आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत विक्रमी 48 पदके (13 सुवर्ण, 18 रौप्य, 17 कांस्य) जिंकली आणि 45 देशांमध्ये 6वे स्थान मिळवले.
-
महिला खेळाडूंची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती (122 विरुद्ध 107) आणि त्यांनी भारताच्या एकूण पदकांपैकी निम्म्याहून अधिक पदकांमध्ये योगदान दिले, ज्यात जवळपास 69.23% सुवर्ण पदके समाविष्ट आहेत.
-
मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग), कुस्ती आणि कबड्डी या खेळांनी भारताच्या यशात मोठा वाटा उचलला; कबड्डीने सुवर्ण पदकासह पदार्पण केले, तसेच वेटलिफ्टिंगमध्ये जागतिक युवा विक्रम प्रस्थापित झाला.
|
आशियाई युवा क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ आणि प्रगती
ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा,आशियाई क्रीडा प्रतिभावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतून खेळण्यास सहाय्य करतात आणि मोठ्या स्पर्धांकडे वळण्यासाठी एक पूर्वतयारी म्हणूनही काम करतात. 2010 च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या सिंगापूरच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नातून या स्पर्धांचा जन्म झाला. या स्पर्धेची संकल्पना केवळ एक क्रीडा स्पर्धा म्हणून नव्हे, तर युवा विकास, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी एक व्यापक व्यासपीठ म्हणून मांडण्यात आली होती.
2008 मध्ये, ओसीएच्या कार्यकारी मंडळाने प्रथम आयोजित केलेल्या स्पर्धेचे यजमानपद सिंगापूरला देण्यची सर्वानुमते मंजुरी दिली आणि 6 एप्रिल 2008 रोजी सर्व 45 सदस्य राष्ट्रांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.[1] यामुळे, विशेष करून 14 ते 18 वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या विविध-क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली.[२]
भारतासाठी, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा या केवळ एका खंडातील क्रीडा स्पर्धा इतक्याच पुरेशा नसून त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत; त्या आपल्या देशाची युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची आणि भविष्यातील ऑलिम्पिक विजेत्यांसाठी एक मजबूत पाया तयार करण्याची वचनबद्धता दर्शवतात.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रगतीचा मागोवा
या खेळांच्या तीन आवृत्त्यांमधील भारताचा प्रवास हा पद्धतशीर सुधारणा, वाढीव सहाय्यक संरचना आणि तळागाळातील क्रीडा विकासाच्या सरकारी उपक्रमांचा परिवर्तनकारी प्रभाव यांची एक प्रभावी कहाणी सांगतो.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा: सिंगापूर 2009 (29 जून - 7 जुलै, 2009)
सिंगापूरमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धांत संपूर्ण आशियातील तरुण खेळाडू एकत्र आले होते, ज्याचे वर्णन युवा, क्रीडा आणि शिक्षणाचा उत्सव असे केले गेले. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या मते, या खेळांमध्ये 9 विविध खेळांमधील 90 हून अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये 1,321 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता.[3]
सिंगापूरमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने पदार्पणातच पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 11 पदके जिंकली –. या कामगिरीमुळे भारत एकूण पदकतालिकेत अकराव्या स्थानावर राहिला, ही एक सन्मानजनक कामगिरी होती, ज्यामुळे युवा क्रीडा क्षेत्रात देशाला विशेष अस्तित्व प्राप्त झाले.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा: नानजिंग, चीन 2013 (16 ऑगस्ट - 24 ऑगस्ट, 2013)
चीनमधील नानजिंग येथे झालेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी या स्पर्धेची व्याप्ती आणि प्रमाण यांत लक्षणीय वाढ झाली. या क्रीडा स्पर्धेत 2,314 खेळाडूंनी 16 खेळांमधील 122 स्पर्धांमध्ये भाग घेतला.[4]
दुसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने विविध खेळांमध्ये सर्वांगीण कामगिरी करत आपली एक दमदार छाप उमटवली.
भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण 14 पदके जिंकली आणि पदकतालिकेत दहावे स्थान पटकावले.
चीनमधील नानजिंग येथे झालेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी या स्पर्धेची व्याप्ती आणि प्रमाण यांत लक्षणीय वाढ झाली. या क्रीडा स्पर्धेत 2,314 खेळाडूंनी 16 खेळांमधील 122 स्पर्धांमध्ये भाग घेतला.
दुसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने विविध खेळांमध्ये सर्वांगीण कामगिरी करत आपली एक दमदार छाप उमटवली.
2013 या वर्षीच्या स्पर्धेतील खेळांनी भारताच्या विस्तारणाऱ्या आणि अधिकाधिक वैविध्यपूर्ण प्रतिभेला अधोरेखित केले,कारण यावेळी तरुण खेळाडूंनी नवनवीन क्रीडा प्रकारांमध्ये प्रवेश केला आणि आशियाई स्तरावर अधिक उत्तम स्पर्धात्मक कामगिरी केली.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा: मनामा, बहरीन 2025 (22 ऑक्टोबर - r 31, ऑक्टोबर, 2025)
दोन दशकांहून अधिक काळानंतर, आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने दिमाखदार यश मिळवले. या स्पर्धेत आशियाई खंडातील सर्व 45 देशांमधील 4,000 हून अधिक युवा खेळाडू 26 खेळांमध्ये सहभागी झाले होते.
एक ऐतिहासिक विक्रम करत, भारताने 2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली, 48 पदके जिंकून (13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 कांस्य) एकूण पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले.
90 अधिकाऱ्यांसह,229 खेळाडूंच्या (107 पुरुष आणि 122 महिला) भारतीय तुकडीने युवा क्रीडा क्षेत्रातील देशाची वाढती सर्वसमावेशकता दर्शविली.
2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने विविध खेळांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.
बीच रेसलिंग मध्ये तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह देशाने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर कुस्तीमध्ये एकूण पदकांमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली.
सुवर्णपदकांच्या बाबतीत भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकत मुष्टीयुध्दात (बॉक्सिंग) भारत सर्वात अधिक यशस्वी ठरला,
कबड्डीमध्ये, मुलांचे आणि मुलींचे दोन्ही संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिले आणि या खेळाच्या क्रीडा स्पर्धेतील या पहिल्याच सहभागात त्यात सुवर्णपदके पटकावली.
एकूणच, भारताची 48 पदकांची कमाई ही 2009 यावर्षीच्या पदकतालिकेच्या चौपट आणि 2013 यावर्षीच्या संख्येच्या तिप्पटपेक्षा जास्त होती, ज्यामुळे आशियातील प्रमुख क्रीडास्पर्धांतील देशाचे स्थान अधिक मजबूत झाले आणि मनामा 2025 हे वर्ष भारताच्या युवा क्रीडा प्रवासातील एक निर्णायक अध्याय लिहिणारे वर्ष ठरले.

आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025: स्त्री-पुरुष खेळाडू समानता आणि सहभाग
या वर्षीच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या सहभागाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे संघातील स्त्री-पुरुष खेळाडूंचा समान सहभाग. 229 खेळाडूंपैकी 122 महिला आणि 107 पुरुष होते.हे , प्रमुख आंतरराष्ट्रीय बहुविध-क्रीडा स्पर्धेत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. यातून देशातील तरुण महिला खेळाडूंचा वाढता समावेश आणि सक्षमीकरण अधोरेखित झाले.
|
श्रेणी
|
सुवर्ण
|
रौप्य
|
कांस्य
|
एकूण
|
एकूण पदकांची टक्केवारी
|
|
मुली
|
9
|
11
|
6
|
26
|
54.17%
|
|
मुले
|
4
|
7
|
8
|
19
|
39.58%
|
|
मिश्र
|
0
|
0
|
3
|
3
|
6.25%
|
भारताने जिंकलेल्या एकूण पदकांपैकी निम्म्याहून अधिक पदके आणि विशेषकरून सुवर्णपदकांचा त्याहूनही मोठा वाटा (69.23%) महिला खेळाडूंचा होता. हा उल्लेखनीय कल भारतातील महिला खेळाडूंची वाढती शक्ती अधोरेखित करतो, जी तळागाळातील स्तरावरील सातत्यपूर्ण संधी आणि सुनियोजित पाठिंब्यामुळे जोपासली गेली आहे.
अभिप्राय: पदक जिंकणाऱ्या 77 खेळाडूंपैकी 46 महिला आणि 31 पुरुष होते.
अधिकृत मान्यता आणि पाठिंबा
या वर्षीच्या भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला सर्वोच्च स्तरावरून व्यापक मान्यता मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमूचे अभिनंदन करताना म्हटले,:
"आमच्या तरुण खेळाडूंनी 2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत, तब्बल 48 पदके जिंकून इतिहास रचला आहे. या चमूचे अभिनंदन. त्यांची जिद्द, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम यातून स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा."[५]
भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्यासाठी भरीव रोख रकमेची बक्षिसे जाहीर केली.
-
सुवर्णपदक विजेते - प्रत्येकी 5 लाख रुपये
-
रौप्यपदक विजेते - प्रत्येकी 3 लाख रुपये
-
कांस्यपदक विजेते - प्रत्येकी 2 लाख रुपये
-
चौथ्या स्थानावर आलेले खेळाडू - प्रत्येकी 50 हजार रुपये
-
पदक विजेत्या खेळाडूंचे प्रशिक्षक - प्रत्येकी 1 लाख रुपये
-
मुलांचे आणि मुलींचे दोन्ही कबड्डी संघ - त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ प्रत्येकी 10 लाख रुपये.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी.टी. उषा म्हणाल्या:
"तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आमच्या युवा खेळाडूंनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेला खूप अभिमान आहे. त्यांची ही कामगिरी भारतीय खेळाचे भविष्य आणि आपल्या तरुणांमध्ये असलेल्या क्षमतेचे प्रतिबिंब दर्शवित आहे. या उदयोन्मुख प्रतिभेला जोपासण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास आयओए पूर्णपणे कटिबद्ध आहे."[6]
निष्कर्ष
2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने 48 पदके जिंकून आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, आणि 2009 आणि 2013 वर्षाच्या पूर्वीच्या कामगिरीला मागे टाकले. ही केवळ आकडेवारीतील वाढ नाही, तर हे युवा क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षणाची गुणवत्ता, खेळाडूंना मिळणारा पाठिंबा आणि स्पर्धात्मक मानसिकतेमधील पद्धतशीर बदलाचे प्रतिबिंब आहे.
यापुढील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2029 मध्ये उझबेकिस्तानमध्ये होणार आहेत. भारताची वाटचाल पाहता, सततची सुधारणा केवळ शक्यच नाही, तर संभाव्यही आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे 'खेलो इंडिया' आणि 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) डेव्हलपमेंट' यांसारखे उपक्रम, तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघांने घेतलेल्या सहभागाद्वारे सर्वसमावेशक सरकारी पाठिंब्यामुळे असे वातावरण निर्माण झाले आहे,जे शाश्वत उत्कृष्ट कामगिरीसाठी अनुकूल आहे.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025
***
NehaKulkarni/SamapadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 156771)
आगंतुक पटल : 18
Provide suggestions / comments