• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

भारताच्या शाही साम्रांज्यांचे संग्रहालय

जिथे राजेशाही वारसा सजीव होतो

Posted On: 31 OCT 2025 12:09PM

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2025

 

मुख्य मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातच्या एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भारताच्या शाही राज्यांच्या संग्रहालयाची पायाभरणी केली.
  • भावी पिढ्यांना एकता आणि त्यागाच्या कालातीत भावनेने प्रेरणा देणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे.
  • सुमारे 367 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या संग्रहालयात चार विषय-आधारित दालने असतील.
  • हे संग्रहालय एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ पाच एकर जमिनीवर बांधले जाणार आहे.

 

प्रस्तावना

राष्ट्रीय एकता दिनाच्या पूर्वसंध्येला, आपल्या सामायिक वारशाविषयी आदर आणि एकतेच्या वचनबद्धतेसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या शाही साम्राज्यांच्या संग्रहालयाची पायाभरणी केली. हे संग्रहालय सन्मान आणि वारशाचे प्रतिक असून ते सुमारे 367 कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे.

भारताच्या शाही साम्राज्यांचे संग्रहालय हे भारताच्या राजेशाही वारशाचा उत्सव साजरा करणारे एक राष्ट्रीय भांडार म्हणून काम करेल. या संग्रहालयात अनेक राजघराण्यांची आणि संस्थानांची राजचिन्हे, कलाकृती, वस्त्रे, हस्तलिखिते, चित्रे आणि अभिलेखीय सामग्रीचे विविध दालनांमध्ये प्रदर्शन करून भारताच्या शाही वारशाचा गौरव केला जाईल.

  • हे संग्रहालय एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ पाच एकर जमिनीवर उभारले जाईल.
  • चार विषय-आधारित दालनांद्वारे अभ्यागतांना ऐतिहासिक कलाकृती, दस्तऐवज आणि डिजिटल सामग्रीच्या माध्यमातून एक संवादात्मक अनुभव मिळेल.
  • भूतकाळाची स्मृती जतन करण्यासोबतच, एकता आणि त्यागाच्या कालातीत भावनेने भावी पिढ्यांना प्रेरणा देणे हा या संग्रहालयाचे उद्दिष्ट आहे.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, भारतीय उपखंडात ब्रिटिशांच्या थेट प्रशासनाखालील प्रदेशासह 550 हून अधिक संस्थाने आणि राज्ये अस्तित्वात होती. या संस्थानांचे भारतीय संघराज्यात राजकीय विलीनीकरण हे स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण उपलब्धींपैकी एक मानले जाते.

  • तत्कालीन उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली, संस्थानिकांच्या शासकांना विलीनीकरण कराराद्वारे भारतात सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.
  • 1949 पर्यंत, जवळजवळ सर्व संस्थाने भारतीय संघराज्यात सामील झाली होती, ज्यामुळे एकात्म आणि सार्वभौम प्रजासत्ताकाचा पाया घातला गेला.
  • हे शांततापूर्ण विलीनीकरण भारताच्या मुत्सद्देगिरी, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेचे प्रतिक आहे.

 

उद्दिष्ट्ये

संग्रहालयाचा हा उपक्रम खालील प्रमुख उद्दिष्टांसह संकल्पित करण्यात आला आहे:

  • भारताच्या राजेशाही आणि संस्थानांच्या समृद्ध वारशाचे दस्तऐवजीकरण करुन तो प्रदर्शित करणे.
  • भारताच्या शाही परंपरा, देशाची एकता आणि सांस्कृतिक ओळखीसाठी त्यांचे योगदान दर्शवणाऱ्या कलाकृती आणि अभिलेखागार सामग्रीचे जतन करणे.
  • भारताच्या राजेशाही परंपरांचे तसेच देशाची एकता आणि सांस्कृतिक ओळख कायम राखण्यात राजेशाही परंपरांनी दिलेल्या योगदानाचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृती आणि अभिलेखागार सामग्री जतन करणे.
  • एकीकरणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेबाबत, संस्थानांच्या योगदानाबद्दल आणि भारताच्या शासनप्रणाली व सांस्कृतिक एकतेच्या उत्क्रांतीबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि त्यांना त्यात सहभागी करून घेणे.
  • भारताच्या राजेशाही आणि लोकशाही वारशावरील संशोधन, जतन आणि सार्वजनिक शिक्षणाचे केंद्र म्हणून कार्य करणे.

 

प्रमुख रचना वैशिष्ट्ये

हे संग्रहालय अभ्यागतांना विविध आकर्षक वैशिष्ट्ये अनुभवण्याची संधी प्रदान करेल.

  • राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 पासून प्रेरित होऊन, या संग्रहालयात परस्परसंवादी आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी एक समर्पित दालन असेल, ज्यामुळे अभ्यागतांना इतिहास अधिक आकर्षक आणि मनोरंजक पद्धतीने अनुभवता येईल.
  • संग्रहालयाची वास्तुरचना नैसर्गिक परिसराशी सुसंगत राहील अशा प्रकारे तयार केली आहे. जलाशय, कारंजे, अंगण आणि बागा हे त्याचे मुख्य संरचनात्मक घटक आहेत.
  • अभ्यागत शाही बागांपासून प्रेरित असणाऱ्या परिसरातून प्रवेश करतील, ज्यामुळे आतील भव्यतेची पूर्वकल्पना मिळेल.
  • भेटीचा समारोप म्युझियम कॅफे येथे होतो, जिथे पर्यटक आपल्या अनुभवावर चिंतन करत शाही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.

चार विषयांवर आधारित दालनांमध्ये विभागलेले हे संग्रहालय ऐतिहासिक कलाकृती, दस्तऐवज आणि डिजिटल सामग्रीच्या माध्यमातून अभ्यागतांना एक समृद्ध आणि परस्परसंवादी अनुभव प्रदान करेल.

दालनांचे विहंगावलोकन

  • दालन 1: अभिमुखता गॅलरी – चित्रफिती आणि दृकश्राव्य कथांच्या माध्यमातून राजेशाही आणि संग्रहालयाच्या संकल्पनेची ओळख करून देणारे प्रारंभिक दालन.
  • दालन 2: “सिंहासन आणि राज्य” – यामध्ये शाही कुटुंबे, त्यांची शासनप्रणाली, परंपरा, कल्याणकारी धोरणे आणि त्यांच्या मनात असणारे प्रजेबद्दलचे त्यांचे प्रेम प्रदर्शित केले जाईल.
  • दृश्यावलोकन कक्ष आणि डेक – हे विश्रांती आणि दृश्यावलोकनासाठी राखीव असणारी ही जागा, जिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नर्मदा नदीचे विहंगम दृश्य पाहता येईल.
  • दालन 3: “भारताच्या एकीकरणाची गाथा” – यामध्ये भारताच्या राजकीय एकीकरणाशी संबंधित घटना आणि दस्तऐवज दर्शविले जातील.
  • दालन 4: “एकता सभागृह” – यामध्ये सर्व संस्थानांची चिन्हे आणि राजमुद्रा प्रदर्शित केल्या जातील, ज्यामुळे भारताच्या एकतेसाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाचा सन्मान केला जाईल.

 

 

निष्कर्ष

संस्थानांचे एकीकरण ही स्वतंत्र भारताची एक उल्लेखनीय उपलब्धी आहे, जी विविधतेतील एकता आणि राष्ट्रीय विजयाचे प्रतीक आहे. प्रस्तावित 'रॉयल किंगडम ऑफ इंडिया' संग्रहालय या ऐतिहासिक प्रक्रियेचा गौरव करेल. हे प्रस्तावित संग्रहालय भारताच्या शाही वारशाचे जतन करेल तसेच सांस्कृतिक आणि राजकीय ओळख घडवण्यात या संस्थानांची भूमिका अधोरेखित करेल. वारसा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा संगम साधणारे हे संग्रहालय भारताच्या राजेशाही भूतकाळाचे एक जिवंत भांडार म्हणून काम करेल, तसेच एका एकसंध, सर्वसमावेशक आणि सांस्कृतिकदृष्ट्या चैतन्यपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाला बळकटी देईल.

 

संदर्भ

 

पीडीएफ पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Explainer ID: 156657) आगंतुक पटल : 16
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , हिन्दी , Nepali , Bengali , Assamese , Kannada , Malayalam
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate