Technology
इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी
257.77 कोटींच्या गुंतवणुकीसह, या निधीने देशभरातील 128 स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे.
Posted On:
15 NOV 2025 10:21AM

प्रस्तावना
अलिकडच्या वर्षांत, सरकारच्या विविध उपक्रमांमुळे आणि औद्योगिक सुधारणांमुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. वेगवान तांत्रिक बदल आणि नवोन्मेषाने वैशिष्ट्यपूर्ण असलेले हे क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आणि उत्पादनासाठी क्षेत्रात भारत हळूहळू जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.
ही गती अधिक मजबूत करण्यासाठी आणि एक सक्षम नवोन्मेष परिसंस्था विकसित करण्यासाठी, भारत सरकारने 15 फेब्रुवारी 2016 रोजी इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी (EDF) सुरू केला. या निधीचा उद्देश इलेक्ट्रॉनिक्स, नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास आणि उद्योजकतेला चालना देणे हा आहे.

इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी हा 'फंड ऑफ फंड्स' म्हणून कार्य करतो. तो व्यावसायिकरित्या व्यवस्थापित 'डॉटर फंड्स'मध्ये गुंतवणूक करतो. यामध्ये प्रारंभिक टप्प्यातील एंजल आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सचा समावेश आहे. हे 'डॉटर फंड्स' पुढे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्टार्टअप्स आणि कंपन्यांना जोखीम भांडवल पुरवतात. या प्रक्रियेमुळे देशांतर्गत नवोन्मेष, उत्पादन डिझाइन आणि बौद्धिक संपदा निर्मितीला प्रोत्साहन देणारी एक स्वयंपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था निर्माण करण्यात इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि संशोधनासाठी एक मजबूत पाया तयार करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी ची स्थापना करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्टार्टअप्स आणि कंपन्यांना जोखीम भांडवल पुरवणाऱ्या निधींना पाठिंबा देऊन संपूर्ण परिसंस्था अधिक मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
प्रमुख उद्दिष्टांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
नवोन्मेष तसेच संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे: बाजाराभिमुख आणि उद्योग-नेतृत्वाखालील नावीन्यपूर्णतेला पाठिंबा देऊन इलेक्ट्रॉनिक्स, नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासाला चालना देणे.
'डॉटर फंड्स'ना पाठिंबा देणे: प्रारंभिक टप्प्यातील एंजल फंड्स आणि व्हेंचर कॅपिटल फंड्स यासारख्या व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित डॉक्टर फंड्स मध्ये गुंतवणूक करणे जे पुढे स्टार्टर्स आणि तंत्रज्ञान उपक्रमांना भांडवल उपलब्ध करून देतात.
उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देणे: देशांतर्गत नवीन उत्पादने, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांना पाठिंबा देऊन उद्योजकतेला चालना देणे.
देशांतर्गत डिझाइन क्षमता मजबूत करणे: इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाइन आणि उत्पादन (ESDM) क्षेत्रात भारताची स्वदेशी डिझाइन आणि विकास क्षमता वाढवणे.
राष्ट्रीय बौद्धिक संपदा संसाधन दुवा तयार करणे: प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये बौद्धिक संपदेचा एक मजबूत आधार तयार करणे आणि भारतात नवोन्मेषाच्या मालकीला प्रोत्साहन देणे.
धोरणात्मक अधिग्रहणांना चालना देणे : ज्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, अशा परदेशी तंत्रज्ञान आणि कंपन्यांचे अधिग्रहण करणे शक्य करणे, जेणेकरून आत्मनिर्भरतेला चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
निधीची प्रमुख कार्यात्मक वैशिष्ट्ये
इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंड (EDF) हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये कार्यक्षम गुंतवणूक आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेल्या लवचिक आणि व्यावसायिकरित्या व्यवस्थापित संरचनेद्वारे कार्य करतो. त्याच्या या कार्यप्रणालीमुळे पारदर्शकता, बाजार संवेदनशीलता आणि निधीचे धोरणात्मक वाटप सुनिश्चित करते.


या योजनेअंतर्गत समर्थित प्रत्येक डॉटर फंडाला भारतात नोंदणी करणे आणि SEBI (पर्यायी गुंतवणूक निधी) नियम, 2012 अंतर्गत श्रेणी I किंवा श्रेणी II AIFs म्हणून सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे सर्व सहभागी निधी एका सु-परिभाषित नियामक चौकटीत कार्य करत राहतात, तसेच संशोधन, उद्योजकता आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्याच्या इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंडच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत राहतात.
मुख्य वैशिष्ट्ये:
- इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंड, डॉटर फंडमध्ये गैर-विशेष आधारावर सहभागी होतो, ज्यामुळे संपूर्ण उद्योगात व्यापक सहकार्य आणि सहभाग शक्य होतो.
- डॉटर फंडाच्या एकूण निधीमधील इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी चा वाटा बाजारातील गरजा आणि इलेक्ट्रॉनिक्स विकास निधीच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निधीचे व्यवस्थापन करण्याच्या गुंतवणूक व्यवस्थापकाच्या क्षमतेनुसार निश्चित केला जातो.
- इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी सामान्यतः प्रत्येक डॉटर फंडमध्ये अल्पसंख्याक सहभाग ठेवतो, ज्यामुळे अधिक खाजगी गुंतवणूकीला आणि व्यावसायिक निधी व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळते.
- डॉटर फंडांच्या गुंतवणूक व्यवस्थापकांना निधी उभारणी, गुंतवणूक करणे आणि पोर्टफोलिओच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी लवचिकता आणि स्वायत्तता दिली जाते.
- इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित परिसंस्थेच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी चा सहभाग उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्वसमावेशक क्षेत्रीय व्याप्ती सुनिश्चित होते.
- डॉटर फंडांची अंतिम निवड गुंतवणूक व्यवस्थापकाद्वारे तपशीलवार योग्य तपासणीनंतर केली जाते.
उपलब्धी आणि परिणाम
इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंडाने (EDF) भारताच्या नवोपक्रम परिसंस्थेचे संगोपन करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी ने त्याच्या योगदानकर्त्यांकडून एकूण 216.33 कोटी रुपये निधी जमा केला आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मिळालेल्या 210.33 कोटी रुपयांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंडाद्वारे समर्थित स्टार्टअप्स इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), रोबोटिक्स, ड्रोन, स्वयंचलित वाहने, आरोग्य तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. यामुळे भारताला प्रगत तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून स्थान मिळत आहे.
|
S. No.
|
Name of Daughter Fund
|
Amount Invested by EDF (₹ crore)
|
Daughter Fund Investment (₹ crore)
|
Total No. of Startups Funded
|
|
1
|
Unicorn India Ventures Trust
|
15.82
|
63.64
|
17
|
|
2
|
Aaruha Technology Fund - 1
|
6.75
|
26.22
|
13
|
|
3
|
Endiya Seed Co-creation Fund
|
30.00
|
137.03
|
12
|
|
4
|
Karsemven Fund
|
24.00
|
83.43
|
17
|
|
5
|
pi Ventures Fund 1
|
15.00
|
186.53
|
15
|
|
6
|
YourNest India VC Fund II
|
43.15
|
185.54
|
19
|
|
7
|
Ventureast Proactive Fund - II
|
97.75
|
425.7
|
18
|
|
8
|
Exfinity Technology Fund Series II
|
25.30
|
227.68
|
17
|
|
Total
|
|
257.77
|
1335.77
|
128
|
- इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी ने आठ डॉटर फंडांमध्ये 257.77 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या डॉटर फंड्सनी 128 स्टार्टअप्स आणि उद्योगांमध्ये 1,335.77 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे.
- या समर्थित स्टार्टअप्सनी उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये 23,600 पेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत.
- समर्थित स्टार्टअप्सद्वारे एकूण 368 बौद्धिक संपदा (IPs) तयार किंवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
- 128 समर्थित स्टार्टअप्सपैकी, डॉटर फंड्सनी 37 गुंतवणुकींमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
- गुंतवणुकीतून पूर्णपणे बाहेर पडणे आणि अंशतः बाहेर पडण्याद्वारे इलेक्ट्रॉनिक्स विकास निधी ला मिळालेला एकूण परतावा 173.88 कोटी रुपये आहे.
निष्कर्ष
इलेक्ट्रॉनिक्स विकास निधीने भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जोखीम भांडवलाची उपलब्धता करून देऊन, या निधीने प्रगत तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे तसेच देशांतर्गत डिझाइन आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या विस्ताराला हातभार लावला आहे. निधीच्या पारदर्शक आणि व्यावसायिक व्यवस्थापन प्रणालीमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून देशात एका चैतन्यमय, आत्मनिर्भर इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेची भक्कम पायाभरणी झाली आहे.
संदर्भ
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय:
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
***
हर्षल अकुडे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 156595)
आगंतुक पटल : 43
Provide suggestions / comments