• Sitemap
  • Advance Search
Economy

भारत-ईएफटीए व्यापार करार : 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांची मोठी संधी

Posted On: 11 OCT 2025 12:15PM

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2025

 

महत्त्वाच्या गोष्टी

  • भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेने (ईएफटीए) 10 मार्च 2024 रोजी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) वर स्वाक्षरी केली. हा करार 1 ऑक्टोबर 2025 रोजी लागू झाला, जो चार विकसित युरोपीय राष्ट्रांसोबत भारताचा पहिलाच मुक्त व्यापार करार होता.
  • टीईपीए अंतर्गत 15 वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शवली असून, कोणत्याही भारतीय मुक्त व्यापार करारात अशा प्रकारचा पहिलाच बंधनकारक संकल्प आहे.
  • या करारानुसार ईएफटीएच्या अधिकारीक सीमा शुल्क यादीत 92.2% उत्पादने समाविष्ट (भारताच्या 99.6% निर्यातीचे प्रतिनिधीत्व) आहेत, यात भारताच्या सीमा शुल्क सुचीतील 82.7% (ईएफटीएच्या निर्यातीच्या 95.3%) उत्पादने समाविष्ट आहेत, ज्यामुळे दुग्धव्यवसाय, सोया, कोळसा आणि शेती यासारख्या प्रमुख क्षेत्रांचे संरक्षण होईल.
  • हा करार बाजारपेठेची उपलब्धता वाढवतो, उत्पादन आणि नवोन्मेषाला चालना तसेच तंत्रज्ञान आणि शाश्वत क्षेत्रातील सहकार्याला बळकटी देतो.
  • डिजिटल डिलिव्हरी, व्यावसायिक उपस्थिती आणि व्यावसायिक गतिशीलता तसेच नर्सिंग, अकाउंटन्सी आणि आर्किटेक्चर यासारख्या क्षेत्रात परस्पर मान्यता करारांच्या (एमआरए) माध्यमातून महत्वपूर्ण फायदे मिळणार आहेत.

 

भारत-युरोप आर्थिक संबंधातील एक निर्णायक क्षण

युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) म्हणजे काय?

ईएफटीए ही आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंडची आंतरसरकारी संघटना आहे. 1960 मध्ये तत्कालीन 7 सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या सदस्यांमधील मुक्त व्यापार आणि आर्थिक एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची स्थापना केली होती. युरोपमधील 3 आर्थिक समूहांपैकी (इतर 2 समूह - युरोपीय संघ आणि युनायटेड किंगडम) ईएफटीए हा एक महत्त्वाचा आर्थिक समूह आहे.

नवी दिल्ली येथे 10 मार्च 2024 रोजी, स्वाक्षरी झालेली भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) 1 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात आला, जो भारताच्या विदेशी व्यापार धोरणात एक निर्णायक क्षण आहे.

युरोपातील चार विकसित देश - स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टाईन यांच्यासोबत करण्यात आलेला भारताचा हा पहिला मुक्त व्यापार करार आहे. हा करार व्याप्ती आणि उद्दिष्टांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. भारताच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाशी आणि ईएफटीए च्या वैविध्यपूर्ण, सक्षम भागीदारीच्या शोधाशी हा करार धोरणात्मकदृष्ट्या जोडलेला आहे.

या करारात 14 प्रकरणे आहेत. ही प्रकरणे वस्तूंची बाजारपेठत पोहोच, उत्पत्तीचे नियम, व्यापार सुविधा, व्यापार सुधार, स्वच्छता आणि फायटोसॅनिटरी उपाय, व्यापारातील तांत्रिक अडथळे, गुंतवणूक प्रोत्साहन, सेवा, बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार आणि शाश्वत विकास तसेच इतर कायदेशीर आणि परस्पर प्रतिस्पर्धा घटवण्याच्या तरतुदी यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात.

या कराराचा मुख्य उद्देश, पुढील पंधरा वर्षांमध्ये भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणे. ज्यामुळे हा करार देशाच्या आर्थिक इतिहासातील सर्वात दूरदृष्टी असलेल्या व्यापार भागीदारींपैकी एक म्हणून ओळखला जातो.

A map of different countries/regions with different flagsAI-generated content may be incorrect.

 

टीईपीए म्हणजे काय?

टीईपीए (व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार) हा एक आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी करार आहे, ज्यात भारताने स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही मुक्त व्यापार करारात (FTA) प्रथमच गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवरील बंधनकारक वचनबद्धता समाविष्ट करतो.

 

टीईपीएची प्रमुख वैशिष्ट्ये

उद्देशासह गुंतवणूक

अनुच्छेद 7.1 अंतर्गत, ईएफटीए च्या 4 सदस्य देशांनी पहिल्या 10 वर्षांत भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांत अतिरिक्त 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे वचन दिले आहे.

पोर्टफोलिओ प्रवाहाच्या विपरीत, या गुंतवणुकीचा कालावधी दीर्घकालीन असून उत्पादन, नवोन्मेष आणि संशोधनावर केंद्रित आहेत. कालांतराने, या गुंताणुकीमधून दहा लाख थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि भारतातील कुशल कामगार तसेच युरोपच्या तंत्रज्ञान परिसंस्थांमध्ये सखोल संबंध निर्माण होण्यास मदत होईल.

गुंतवणूक सुलभीकरणासाठी, फेब्रुवारी 2025 पासून कार्यरत असलेला समर्पित भारत-ईएफटीए डेस्क, संभाव्य गुंतवणूकदारांसाठी एकल-खिडकी व्यासपीठ म्हणून काम करतो. जो नवीकरणीय ऊर्जा, जीवन विज्ञान, अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित करतो, सोबतच संयुक्त उपक्रम आणि लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहकार्याला प्रोत्साहन देतो.

संतुलित बाजारपेठ प्रवेश

टीईपीए हा महत्वाकांक्षा आणि विवेक यांच्यात संतुलन साधतो. ईएफटीए ने 92.2% शुल्क सीमेवर आयात कर सवलती दिल्या आहेत, यात भारताच्या 99.6% निर्यात समाविष्ट आहे. यामुळे सर्व बिगर-कृषी वस्तू आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने सवलतीच्या कक्षेत येतील.

प्रत्युत्तरादाखल भारतानेही कठोर सुरक्षा उपायांसह 82.7% शुल्क सीमेवर प्रवेश वाढवला आहे, जो ईएफटीए निर्यातीच्या 95.3% आहे. ईएफटीए मधून होणाऱ्या आयातीपैकी 80% पेक्षा अधिक सोने आहे, जिथे प्रभावी शुल्कात कोणतेही बदल केलेले नाही.

दुग्धशाळा, सोया, कोळसा, औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे आणि निवडक अन्न उत्पादने यासारख्या संवेदनशील क्षेत्रांना या यादीतून वगळण्यात आले आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसारख्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत उत्पादनांसाठी, दर कपात 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने केली जाते, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांना स्पर्धेत उतरण्यापूर्वी बळकट होण्यासाठी वेळ मिळतो.

सेवा आणि कुशल प्रतिभेसाठी प्रवेशद्वार

भारताच्या सकल मूल्यवर्धित (जीव्हीए) मध्ये सेवांचे योगदान 55% पेक्षा अधिक आहे. टीईपीए ज्ञान आणि डिजिटल सेवांमध्ये पुढील पिढीच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

भारताने 105 उप-क्षेत्रांमध्ये बांधिलकी दर्शविली आहे, तर ईएफटीए च्या प्रस्तावात स्वित्झर्लंडमधील 128, नॉर्वेमधील 114, आइसलँडमधील 110 आणि लिकटेंस्टीनमधील 107 क्षेत्रांना व्यापण्यात आले आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवा, शिक्षण, माध्यम, सांस्कृतिक आणि व्यावसायिक सेवा यासारखे भारताचे प्रमुख सामर्थ्य क्षेत्र समाविष्ट आहेत.

टीईपीए चा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे नर्सिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी आणि आर्किटेक्चर सारख्या व्यवसायांमध्ये परस्पर मान्यता करार (एमआरए) समाविष्ट करणे, जे व्यावसायिक गतिशीलता सुलभ करण्याकडे एक पाऊल आहे.

टीईपीए मुळे माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवा, सांस्कृतिक आणि मनोरंजन सेवा, शिक्षण आणि दृकश्राव्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या सेवा निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ईएफटीए च्या सेवा क्षेत्रातील बांधीलकीमुळे खालील प्रकारे वाढीव बाजारपेठ प्रवेश प्रदान करतात:

पद्धत 1: डिजिटल माध्यमातून सेवांचे वितरण

पद्धत 3: व्यावसायिक उपस्थिती

पद्धत 4: कुशल व्यावसायिकांच्या प्रवेशासाठी आणि तात्पुरत्या वास्तव्याबाबत अधिक निश्चितता

बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर), नवोन्मेष आणि विश्वास

टीईपीए मधील बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) तरतुदी टीआरआयपीएस अंतर्गत बांधिलकेची खात्री करतात, सार्वजनिक आरोग्य आणि जेनेरिक औषधांवरील भारताची लवचिकता जपून उच्च पातळीचे संरक्षण सुनिश्चित करतात.

जागतिक नवोन्मेष केंद्र असलेल्या स्वित्झर्लंडसाठी, आयपीआर अध्याय भारताच्या नियामक सामर्थ्यावरील त्यांचा विश्वास प्रतिबिंबित करते. त्याचवेळी ‘पेटंट एव्हरग्रीनिंग’ विरुद्ध भारताने केलेल्या सुरक्षा व्यवस्थांमुळे परवडणारी औषधे उपलब्ध राहतात. नवोन्मेष आणि समावेशन यांच्यातील समतोल हा टीईपीए ला विश्वासावर आधारित सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण बनवते.

शाश्वत आणि समावेशक विकास

टीईपीए शाश्वत विकास, समावेशक वाढ, सामाजिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यांना प्राधान्य देते. या करारामुळे व्यापार प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता, सुलभीकरण, सुसंवाद, मानकीकरण आणि सातत्य वाढेल.

 

क्षेत्रीय संधी: जिथे होईल लाभ

भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) विविध उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध करुन देतो. ईएफटीए ने 92% शुल्क सीमांचा समावेश असल्याने यंत्रसामग्री, सेंद्रिय रसायने, वस्त्रोद्योग आणि प्रक्रिया केलेले अन्न यासारख्या क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांना ईएफटीए बाजारपेठांमध्ये अधिक चांगला प्रवेश मिळेल. यामुळे भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढेल, अनुपालन खर्च कमी होईल आणि भारतीय उत्पादनांसाठी बाजारपेठेत प्रवेश वाढेल अशी अपेक्षा आहे.

कृषी आणि संबंधित उत्पादने

2024-25 च्या आर्थिक वर्षात भारताची ईएफटीए ला होणारी निर्यात, ज्याचे मूल्य 72.37 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, त्यात ग्वार गम, प्रक्रिया केलेल्या भाज्या, बासमती तांदूळ, कडधान्य, फळे आणि द्राक्षे यांचा समावेश आहे.

टीईपीए या श्रेणींमध्ये, विशेषतः स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या दोन देशात या श्रेणीत सीमा शुल्क कमी केले आहे. हे दोन्ही देशांचा ईएफटीए द्वारे भारताच्या कृषी-व्यापारात 99% पेक्षा वाटा आहे.

COUNTRY-SPECIFIC GAINS

EFTA Nations

Products / HS Codes

Tariff Concessions / Opportunities

Switzerland

Food Preparations

Tariffs up to 127.5 CHF/100 kg eliminated; scope for Indian exports

Confectionery, Biscuits

Duty cuts create opportunities in processed foods

Fresh Grapes

Tariffs up to 272 CHF/100 kg eliminated

Nuts & Seeds, Fresh Vegetables

Zero tariffs post FTA, boosting competitiveness

Norway

Food Preparations, Condiments

Duty-free access on several tariff lines

Rice

Tariff reductions (non-feed purposes) open new markets

Processed Vegetables & Fruits

Duty-free access on selected lines

Biscuits, Malt Extracts, Beverages

Tariff relief improves access for Indian brands

Iceland

Processed Foods

High MFN tariffs (up to 97 ISK/kg) cut to zero

Chocolate & Confectionery

Duties eliminated; strong potential for processed food exports

Fresh/Chilled Vegetables

Tariff elimination

कॉफी आणि चहा

ईएफटीए देश एकत्रितपणे 17.5 कोटी अमेरिकन डॉलर्स किंमतीची कॉफी आयात करतात, जी जागतिक व्यापाराच्या जवळजवळ 3% आहे.

कॉफीच्या सर्व श्रेणींवर शून्य शुल्क लागू झाल्याने भारतीय उत्पादकांना स्वित्झर्लंड आणि नॉर्वे सारख्या प्रीमियम बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाला. हे देश सावलीत पिकवलेल्या आणि हाताने तोडलेल्या भारतीय कॉफीसाठी आदर्श ठिकाणे आहेत.

चहासाठी, ईएफटीए ची बाजारपेठ लहान असली तरीही उच्च मूल्याची आहे (वार्षिक ~3 दशलक्ष किलो) यातही फायदे दिसून आले आहेत, 2024-25 मध्ये भारताचा चहा निर्यात महसूल प्रति किलो 6.77 अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढला आहे, जो मागील वर्षी प्रति किलो 5.93 अमेरिकन डॉलर्स होता.

सागरी उत्पादने

टीईपीए अंतर्गत, भारतीय सागरी उत्पादनांना ईएफटीए देशांमध्ये महत्त्वपूर्ण शुल्क सवलती मिळतील:

COUNTRY-WISE MARKET BENEFITS

Norway

Exemption of duty of up to 13.16% on fish and shrimp feed, making Indian products more competitive and enhancing exports of feed and raw materials.

Iceland

Tariff elimination of up to 10% on frozen, prepared and preserved shrimps, prawns, squid and cuttlefish, along with reductions of up to 55% on fish feed.

Switzerland

Zero duty on fats and oils of fish (excluding liver oil).

भारत- ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. जो चार विकसित युरोपीय राष्ट्रांसोबत भारताचा पहिला मुक्त व्यापार करार असून पुढील 15 वर्षांत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणुक आणि 10 लाख थेट रोजगार निर्मितीची बांधिलकी या मधून मिळते. हा करार वस्तू आणि सेवा क्षेत्रातील बाजारपेठेमध्ये प्रवेश वाढवतो, बौद्धिक संपदा अधिकारांना बळकटी देतो तसेच शाश्वत आणि समावेशक विकासाला प्रोत्साहन देतो, तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांना पुढे नेतो.

औद्योगिक आणि उत्पादन नफा

2024-25 या आर्थिक वर्षात ईएफटीए ला भारताच्या अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 31.5 अमेरिकन डॉलर्स होती, जी वर्षानुवर्षे 18% वाढली आहे. या करारामुळे इलेक्ट्रिक यंत्रसामग्री, तांबे उत्पादने, ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि अचूक अभियांत्रिकी उत्पादनासाठी बाजारपेठेतील प्रवेश आणखी विस्तारित झाला आहे.

13 कोटी अमेरिकन डॉलर्स किंमतीचे वस्त्रोद्योग आणि पोशाख क्षेत्र तसेच चामडे आणि पादत्राणे उद्योगांना शुल्क स्थिरता आणि मानकांच्या सुलभीकरणाचा फायदा होईल, तर क्रीडा सामग्री आणि खेळण्यांना शून्य-शुल्क प्रवेश आणि मानकांच्या परस्पर मान्यतेचा मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

रत्ने आणि दागिन्यांसाठी, टीईपीए ईएफटीए मध्ये शुल्कमुक्त प्रवेश स्थिर करते, ज्यामुळे हिरे, सोने आणि रंगीत रत्नांच्या निर्यातदारांसाठी दीर्घकालीन निश्चितता निर्माण होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर

100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक वचनबद्धतेसह आणि उच्च-उत्पन्न असलेल्या युरोपियन बाजारपेठांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळाल्याने, टीईपीए भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला विशेषतः जागतिक स्तरावर विस्तार करू इच्छिणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि मूळ उपकरण निर्मात्यांसाठी एक धोरणात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

COUNTRY-WISE MARKET POTENTIAL

Switzerland

Medical electronics (diagnostic devices, wearables), smart sensors and embedded systems, secure communication modules (for fintech and banking).

Strategic edge: Leverage TEPA’s IPR chapter to protect proprietary technology.

Norway

EV components and battery management systems, marine electronics (navigation, sonar, IoT buoys), smart grid and energy monitoring devices.

Strategic edge: Align with Norway’s climate-tech goals and public procurement channels.

Iceland

Compact medical devices and diagnostics, smart home and energy-efficient electronics, educational tech hardware (tablets, sensors).

Strategic edge: Target niche distributors and public health initiatives

Liechtenstein

Industrial control systems, secure embedded electronics for banking, high-precision components for OEMs.

Strategic edge: Position India as a reliable EMS partner for European OEMs.

रसायने, प्लास्टिक आणि संबंधित उत्पादने

ईएफटीए ने भारताच्या 95% रासायनिक निर्यातीवर शून्य किंवा कमी केलेले शुल्क मंजूर केले आहे, ज्यामुळे मुक्त व्यापार करार पूर्वी लागू असलेले शुल्क 54% पर्यंत कमी झाले आहे.

निर्यात 4.9 कोटी अमेरिकन डॉलर्स वरून 6.5 ते 7 कोटी अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, विशेषतः पाळीव प्राण्यांचे अन्न, रबर, सिरेमिक्स आणि काचेच्या वस्तूंमध्ये.

प्लास्टिक आणि लाखे पासून तयार उत्पादनांसाठी, टीईपीए उच्च-मूल्य असलेल्या युरोपियन बाजारपेठांमध्ये विविधीकरण करण्यास सक्षम करते, ज्यामुळे अमेरिकेसारख्या भरमसाठ आयात शुल्क असलेल्या ठिकाणांवरील अवलंबित्व कमी होते.

 

परस्पर विश्वासात रुजलेली भागीदारी

भारतासाठी, टीईपीए हा केवळ व्यापार करार नाही, तर तो पारदर्शकता, नियम-आधारित व्यापार आणि नवोन्मेषाला महत्त्व देणाऱ्या समान विचारसरणीच्या अर्थव्यवस्थांसोबतचा एक धोरणात्मक विश्वासाचा दुवा आहे.

हा व्यापार उदारीकरणाचा एक परिपक्व दृष्टिकोन देखील प्रदर्शित करते, ज्यात जागतिक पुरवठा साखळींमध्ये भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून सादर करताना देशांतर्गत हितांचे रक्षणही केले जाते.

गुंतवणूक, रोजगार, तंत्रज्ञान आणि शाश्वततेची दारे उघडत, टीईपीए आधुनिक आर्थिक भागीदारीचे महत्वाकांक्षी, संतुलित आणि भविष्याभिमुख सार मांडतो.

 

निष्कर्ष

भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) एक ऐतिहासिक टप्पा दर्शवितो, जो चार विकसित युरोपीय राष्ट्रांसह भारताचा पहिला मुक्त व्यापार करार आहे. तो पुढील 15 वर्षांत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणुक आणि 10 लाख थेट नोकऱ्यांच्या निर्मितीची मोठी संधी निर्माण करतो. या करारामुळे वस्तू आणि सेवा क्षेत्रासाठी बाजारपेठ उपलब्धता वाढते, बौद्धिक संपदा अधिकार बळकट होतात तसेच शाश्वत आणि समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळते, त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारतच्या उद्दिष्टांना बळकटी मिळते.

 

संदर्भ

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

पत्र सूचना कार्यालय

 

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नितीन फुल्‍लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

(Explainer ID: 156425) आगंतुक पटल : 56
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Nepali , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Kannada