Social Welfare
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा अभियान (पीएम- एबीएचआयएम)
साथीच्या रोगांसाठी सज्ज आरोग्यसेवा पायाभूत सुविधांची उभारणी
Posted On:
24 OCT 2025 2:30PM
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2025
महत्त्वाचे मुद्दे
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा अभियान (पीएम- एबीएचआयएम) या योजनेअंतर्गत 64,180 कोटी रुपये (2021-26) इतका निधी भारताच्या आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी तसेच साथीच्या रोगांना रोखण्याची सज्जता आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता विकसित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
- ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या या मोहिमे अंतर्गत देशभरातील प्राथमिक ते तृतीयक स्तरावरील आरोग्य सुविधांचे उन्नतीकरण करण्यात येत आहे, ज्यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर (एएएम), प्रयोगशाळा, अति दक्षता विभाग आणि रोग नियंत्रण प्रणालीचा समावेश आहे.
- हे अभियान सार्वत्रिक आरोग्य कवच साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टांना पुढे नेते आणि शाश्वत विकास उद्दिष्ट 3 (एसडीजी-3) शी सुसंगत आहे.
प्रस्तावना
कोविड-19 साथीच्या काळात, - चाचणी, रुग्ण शोधणे, देखरेख, उद्रेक व्यवस्थापन, अतिदक्षता सेवा आणि इतर सार्वजनिक आरोग्य सेवा यांना जास्त मागणी होती. या काळात भारताच्या आरोग्यवस्थेला प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक स्तरावर अधिक मजबूत बनवण्याची आवश्यकता स्पष्ट झाली, जेणेकरून भविष्यातील साथीचे रोग, आपत्कालीन परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्याच्या बदलत्या प्रवृत्तींना प्रभावी प्रतिसाद देता येईल.
|
जागतिक आरोग्य संघटनेचा साथीच्या रोगांबाबत करार
- मे 2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सदस्य राष्ट्रांनी कोविड-19 च्या संदर्भात तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर जगातील पहिला साथीचा करार स्वीकारला. हा करार साथीच्या रोगांचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसादामध्ये समन्वय बळकट करण्यासाठी तसेच लसी, निदान साधने आणि उपचारांची न्याय उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
- या ठरावात अंमलबजावणीच्या दिशेने पुढील पावले मांडण्यात आली आहेत – आंतर शासकीय कार्यगट (IGWG) द्वारे पॅथोजन एक्सेस अँड बेनिफिट शेयरिंग (PABS) प्रणाली स्थापित करण्यासाठी एक परिशिष्ट तयार करणे समाविष्ट आहे. जागतिक आरोग्य सभेने हा करार मंजूर केल्यानंतर आणि किमान 60 देशांनी मान्यता दिल्यानंतर, हा करार अंमलात येईल.
- सदस्य राष्ट्रांनी आंतर शासकीय कार्यगटाला (IGWG) पुढील कार्यासाठी ही निर्देश दिले आहेत - साथीच्या रोगांचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसादासाठी वित्तीय यंत्रणा तयार करणे. तसेच, जागतिक पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स नेटवर्क (GSCL) उभारणे जेणेकरून महामारीच्या काळात आरोग्य विषयक वस्तू आणि औषधांची वेळेत तसेच स्वस्त दरात उपलब्धता सुनिश्चित होईल. हा करार आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांशी सुसंगत आहे ज्यामध्ये गेल्यावर्षी जागतिक उद्रेक शोध आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे.
|
25 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झालेले प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा अभियान (पीएम- एबीएचआयएम) आरोग्य, संशोधन आणि देखरेख क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीवर लक्ष केंद्रित करते. 2021-26 या कालावधीत 64,180 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ही योजना - प्राथमिक आरोग्य सेवा संस्थांचा विस्तार आणि बळकटीकरण, रोग नियंत्रण आणि देखरेख प्रणालींचा विस्तार, आरोग्य संशोधनाला पाठबळ देणे आणि साथीच्या रोग रोखण्यासाठी सज्जता निर्माण करण्याचे काम करते. तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरे, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि अतिदक्षता सुविधा केंद्र उभारून सार्वत्रिक आरोग्य कवच आणि आरोग्यदायी भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याकडे वाटचाल करते.
धोरणात्मक आराखडा
पीएम- एबीएचआयएम, हा भारताच्या आरोग्य व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक व्यापक धोरणात्मक उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 वर आधारित आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच आयुष्मान भारत योजना यांच्याशी एकरूप होऊन भारताची आरोग्य व्यवस्था बळकट करतो. हे भारत सरकारचे प्रमुख आरोग्य उपक्रम आहेत आणि या तीनही योजना स्वतंत्र असल्या तरी त्यांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे सर्वांसाठी सुलभ परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
धोरणाचा पाया: राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017
राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 मध्ये समुदाय आधारित आरोग्य प्रणालींच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. या धोरणानुसार प्रशिक्षित प्रथम प्रतिसादक हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि समुदाय आधारित संघटनांसोबत काम करून आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन स्थितीसाठी सज्जता निर्माण करतात.
2005 मध्ये सुरू झालेले राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) - हे समुदायाच्या मालकीच्या आणि विकेंद्रिकृत आरोग्य प्रणाली निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. ज्याद्वारे सर्वसामान्य दुर्बल आणि वंचित वर्गाला परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देता येतात. या अभियानामुळे माता आणि बाल आरोग्य, रोग निर्मूलन आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. विशेषतः कोविड-19 साथीच्या काळात राष्ट्रीय आरोग्य अभियानाने देशभरात आरोग्य सेवा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाने समुदाय-आधारित आरोग्यसेवा पुरवठ्याचा पाया रचला होता, तर 2017 च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाने या प्राधान्यांना बळकटी दिली आणि आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिशा दिली, ज्यावर आधारित पीएम- एबीएचआयएम आता पुढील कार्य करत आहे.
आयुष्मान भारत योजना
2018 मध्ये सुरू करण्यात आलेली, आयुष्मान भारत योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानावर आधारित असून देशभरात प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी चार प्रमुख स्तंभांवर उभी आहे:
- आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)
- आयुष्मान आरोग्य मंदिरे (AAM)
- आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)
- पीएम-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM- ABHIM)

आयुष्मान भारत योजना प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक अशा तिन्ही स्तरांवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे.
पीएम- एबीएचआयएम : प्रमुख उद्दिष्टे आणि घटक
2021 मध्ये सुरू झालेले, प्रधानमंत्री-आयुष्मान भारत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा अभियान (पीएम- एबीएचआयएम) हे भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी एक आहे ज्याचा उद्देश एक मजबूत, सुलभ आणि स्वावलंबी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विकसित करणे, हा आहे.
या अभियानाचा भर ग्राम पातळीपासून जिल्हास्तरापर्यंतच्या आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर आहे, यासाठी पुढील सुविधा उभारण्यात येत आहेत तर काहींचे उन्नतीकरण करण्यात येत आहे - प्रत्येक जिल्ह्यात आयुष्मान आरोग्य मंदिरे (एएएम), ब्लॉक सार्वजनिक आरोग्य केंद्र, एकात्मिक जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि अतिदक्षता रुग्णालय, या सर्व सुविधा एकत्रितपणे सेवा पुरवठ्यातील तफावत भरून काढतात, तसेच समुदायांच्या जवळच प्राथमिक दुय्यम आणि अतिदक्षता सेवा उपलब्ध करून देतात.
याशिवाय, पीएम- एबीएचआयएम अंतर्गत साथीचे रोग आणि आपत्कालीन सज्जता याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी एक माहिती तंत्रज्ञान -सक्षम, रिअल-टाइम रोग देखरेख प्रणालीचा विकास केला जात आहे, जी ब्लॉक, जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रयोगशाळांना एकत्र जोडते. या नेटवर्कद्वारे रोगांचे लवकर निदान तपासणी आणि प्रतिबंधात्मक कृती अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येतील.
याव्यतिरिक्त, हे अभियान विशेष करुन कोविड-19 आणि इतर संसर्गजन्य रोगासंदर्भात आरोग्य संशोधन, नवोन्मेषाला प्रोत्साहन देते. यामध्ये ‘एक आरोग्य’ दृष्टिकोन पुढे नेण्यात आले आहे, जे मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याच्या परस्परावलंबनाला ओळखते.
हा उपक्रम ग्रामीण तसेच शहरी भागांमधील आरोग्य विषयक पायाभूत सुविधातील महत्त्वपूर्ण तुटवडा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करतो. झोपडपट्टी आणि अल्पसेवित शहरी भागात आरोग्य आणि कल्याण केंद्रे (AAM) स्थापन करून आणि उप-केंद्रांना आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये (AAM) रूपांतरित करून शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील गंभीर पोकळी भरून काढण्याचे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
एकत्रितपणे, पीएम- एबीएचआयएम सर्व नागरिकांसाठी समान आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करताना भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यास सक्षम असलेल्या मजबूत आरोग्य परिसंस्थेची कल्पना करते.

2030 पर्यंत संसर्गजन्य रोगांच्या साथीचे उच्चाटन करणे, सार्वत्रिक आरोग्य संरक्षण साध्य करणे तसेच सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारी औषधे आणि लसी उपलब्ध करून देणे ही शाश्वत विकास ध्येय 3 (SDGs) ची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. भारत सरकार या उद्दिष्टांना पाठिंबा देते.

पीएम- एबीएचआयएम: प्रमुख उद्देश
प्रधानमंत्री-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियाना अंतर्गत वित्तीय वर्ष 2021- 22 ते 2025 - 26 दरम्यान, आरोग्य सेवा पायाभूत सुविधांना सर्व स्तरांवर बळकट करण्यासाठी केंद्र प्रायोजित योजना (CSS) अंतर्गत मोठी प्रगती साधण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत योजने (सीएसएस) घटकांतर्गत देखील लक्षणीय प्रगती झाली आहे, जी आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान सर्व स्तरांवर आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करते.
ताज्या आकडेवारीनुसार, 17,788 इमारत विरहित उप-आरोग्य केंद्राचे आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये (एएएम) श्रेणीसुधार करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. तसेच झोपडपट्टी आणि वंचित शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा वाढविण्यासाठी 11,024 शहरी आयुष्मान आरोग्य केंद्र (यू-एएएम) स्थापन करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, ब्लॉक-स्तरीय आरोग्य प्रशासन आणि सेवा वितरणाला चालना देण्यासाठी 3,382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य केंद्र (बीपीएचयू) स्थापन करण्यात येत आहेत, तर निदान आणि देखरेख क्षमता वाढविण्यासाठी 730 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (आयपीएचएल) प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे विकसित केल्या जात आहेत. तृतीयक सेवा मजबूत करण्यासाठी, पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये 602 अतिदक्षता रुग्णालय विभाग (CCB) स्थापन केले जात आहेत.
एकूण, या उपक्रमांसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 32,928.82 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 9,519 आयुष्मान आरोग्य केंद्र, 5,456 शहरी आयुष्मान आरोग्य केंद्र, 2,151 सार्वजनिक आरोग्य केंद्र, 744 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 621 अतिदक्षता रुग्णालय विभाग यांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम एकत्रितपणे एक मजबूत, द्विकेंद्रिकृत आणि सहज उपलब्ध सार्वजनिक आरोग्य नेटवर निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे, ज्यामुळे देशभरात वेळेवर आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
संसाधनाचे वाटप
पीएम- एबीएचआयएम अंतर्गत संसाधनांच्या वाटपाचे आर्थिक वर्षनिहाय विभाजन (कोटी रुपयांमध्ये) खालीलप्रमाणे आहे:
|
Component type
|
2021-22
|
2022-23
|
2023-24
|
2024-25
|
2025-26
|
Total
|
|
Centrally Sponsored Scheme (CSS)
|
|
Central Share
|
2412.91
|
3942.80
|
3361.67
|
4495.12
|
7914.89
|
22127.39
|
|
State Share
|
1388.16
|
2276.34
|
1962.40
|
2655.64
|
4522.42
|
12804.95
|
|
15th FC share
|
2026.98
|
2965.34
|
4000.04
|
4743.88
|
5536.19
|
19272.43
|
|
Sub-total of CSS Components
|
5828.04
|
9184.48
|
9324.11
|
11894.64
|
17973.50
|
54204.78
|
|
CS components
|
3327.92
|
1280.61
|
1691.69
|
1656.65
|
1382.89
|
9339.78
|
|
Grand Total
|
9155.97
|
10465.09
|
11015.80
|
13551.30
|
19356.40
|
63544.56
|
|
Grand Total with M&E and PMC @1% of scheme
|
|
|
64180
|
निष्कर्ष
आरंभ झाल्यानंतरच्या चार वर्षात, पीएम- एबीएचआयएम अभियानाने भारतातील आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. साथीच्या रोगांना रोखण्याची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतांना बळकटी देण्यासाठी या योजनेअंतर्गत 64,180 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्राथमिक ते तृतीयक स्तरांवरील आरोग्य सेवा उन्नत करून तसेच देखरेख आणि निरिक्षण प्रणाली अधिक सक्षम बनवून, या योजनेने देशात अधिक मजबूत आणि सज्ज आरोग्य सेवा प्रणाली तयार केली आहे. भारत सार्वत्रिक आरोग्य संरक्षण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट 3 साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आयुष्मान भारत उपक्रमांशी एकत्रित आणि जागतिक आरोग्य चौकटीची सुसंगत असा पीएम- एबीएचआयएम चा समुदाय केंद्रित दृष्टिकोन देशाला भविष्यातील संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्याचे प्रभावीपणे संरक्षण करण्यास अधिक सक्षम बनवतो.
संदर्भ
पत्र सूचना कार्यालय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
इतर
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 156422)
आगंतुक पटल : 84
Provide suggestions / comments