• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

काशी तमिळ संगमम् 4.0

ज्ञान परंपरा, संस्कृती आणि समुदायाची करत आहे गुंफण

Posted On: 01 DEC 2025 7:00PM

प्रमुख वैशिष्ट्ये

  • काशी तमिळ संगमम् 4.0 ची सुरुवात 2 डिसेंबर 2025 पासून होत आहे, तमिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक आणि नागरीकरणातील नाते पुढे नेण्याचा हा उपक्रम आहे.
  • चला तमिळ शिकूया- तमिळ कर्कलाम या संकल्पनेवर या वेळच्या कार्यक्रमाचा भर आहे, ज्यामुळे तमिळ भाषा अध्ययन आणि भाषिक एकता संगमम् च्या केंद्रस्थानी असेल.
  • मुख्य कार्यक्रमांमध्ये तमिळ कर्कळम (वाराणसीतील शाळांमध्ये तमिळ शिकवणे), तमिळ कर्पोम (काशी भागातील 300 विद्यार्थ्यांसाठी तमिळ शिकण्याचे अभ्यास दौरे), आणि संत अगस्त्य वाहन मोहीम ( तेनकाशीपासून काशीपर्यंतचा नागरी मार्गाचा माग काढणे) यांचा समावेश आहे.
  • या वर्षीच्या संगममची रामेश्वरम येथे एका भव्य सोहळ्याने सांगता होईल, ज्यामुळे काशी ते तमिळनाडूपर्यंतची सांस्कृतिक कमान प्रतीकात्मक पद्धतीने पूर्ण होईल.

 

एका जुन्या बंधनाची पुन्हा गुंफण: काशी तमिळ संगमम म्हणजे काय?

काशी तमिळ संगमम हा शतकानुशतके भारतीयांच्या कल्पनेत जिवंत असलेल्या संबंधाचा एक उत्सव आहे. असंख्य यात्रेकरू, विद्वान आणि साधकांसाठी, तमिळनाडू आणि काशी यांच्या दरम्यानचा प्रवास कधीही केवळ भौतिक मार्गक्रमण नव्हते—तो कल्पना, तत्त्वज्ञान, भाषा आणि जिवंत परंपरांचा एक प्रवाह होता. संगमम याच भावनेतून प्रेरणा घेऊन एक असे बंधन जिवंत करत आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या भारताच्या सांस्कृतिक परिदृश्याला शांतपणे आकार दिला आहे.

संपूर्ण देशात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (आझादी का अमृत महोत्सव) साजरा होत असताना, म्हणजे जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा विचार करत होता आणि आपल्या नागरी वारशाच्या खोलीचा पुन्हा शोध घेत होता—त्या काळात, 2022 मध्ये हा संगम सुरू करण्यात आला. देशाला जोडणारे सांस्कृतिक सातत्य पुन्हा एकदा दृढ करण्याच्या उद्देशाने हा संगम पुढे आला. आत्मपरीक्षण करण्याच्या आणि भारताच्या कालातीत सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्याच्या याच भावनेतून, काशी तमिळ संगमाने शतकानुशतके आध्यात्मिक विचार, कलात्मक अभिव्यक्ती आणि विद्वत्तापूर्ण देवाणघेवाणीला मार्गदर्शन करणाऱ्या एका प्राचीन नात्यावर प्रकाश टाकण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आहे.

हा उपक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' या तत्त्वज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे, जे लोकांना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीपलीकडील समृद्धी समजून घेण्यास आणि तिचे कौतुक करण्यास प्रोत्साहित करते. शिक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ हे प्रमुख ज्ञान भागीदार म्हणून काम करत आहेत, तसेच रेल्वे, संस्कृती, पर्यटन, वस्त्रोद्योग, युवक व्यवहार आणि क्रीडा यांसह दहा मंत्रालये आणि उत्तर प्रदेश सरकारचा सहभाग यात आहे. काशी तमिळ संगमम या दोन प्रदेशांमधील विद्यार्थी, कारागीर, विद्वान, आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि सांस्कृतिक कलाकारांना एकत्र आणतो, ज्यामुळे त्यांच्यात कल्पना, सांस्कृतिक पद्धती आणि पारंपारिक ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होते. संगमाच्या प्रत्येक आवृत्तीत तमिळनाडूमधील विद्यार्थी, शिक्षक, कारागीर, विद्वान, आध्यात्मिक नेते आणि सांस्कृतिक कलाकार एका आठवड्यासाठी ते दहा दिवसांसाठी काशीला भेट देतात, या दरम्यान त्यांनी काशीतील मंदिरे, तमिळ संबंध असलेले सर्व केंद्र आणि अयोध्या व प्रयागराजसारख्या शेजारच्या भागांना भेटी दिल्या. त्यांनी परिसंवाद, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेतला, जिथे त्यांनी त्यांच्या काशीतील समकक्षांशी संवाद साधला.

काशी तमिळ संगमम 4.0: 'तमिळ कर्कळम' – चला तमिळ शिकूया

काशी तमिळ संगमम 4.0 या वाढत्या सांस्कृतिक संगमातील पुढील अध्याय आहे, जो आपली व्याप्ती आणि महत्त्वाकांक्षा दोन्ही वाढवत आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणाऱ्या या आवृत्तीत मागील संगमांचे सार कायम ठेवण्यात आले आहे, तसेच भाषिक शिक्षण आणि शैक्षणिक देवाणघेवाणीवर अधिक भर देण्यात आला आहे. या उत्सवाची सांगता रामेश्वरम येथे एका भव्य सोहळ्याने होईल, ज्यामुळे उत्तर भारतातील सर्वात पवित्र केंद्रांपैकी एक असलेल्या काशीपासून तमिळ आध्यात्मिक वारशाच्या सर्वात पूजनीय स्थळापर्यंतचा प्रवास प्रतीकात्मकपणे पूर्ण होईल. उत्तर-ते-दक्षिणेचा हा प्रवास संगमाच्या मूळ भावनेचे प्रतिबिंब आहे: दोन चैतन्यमय सांस्कृतिक भूभागांमधील एक सेतू आहे.

काशी तमिळ संगमम 4.0 चा गाभा त्याच्या "चला तमिळ शिकूया – तमिळ कर्कळम" या संकल्पनेत दडलेला आहे. ही आवृत्ती तमिळ भाषेच्या शिक्षणाला आपल्या दृष्टीच्या केंद्रस्थानी ठेवते, या विश्वासाला पुढे नेते की सर्व भारतीय भाषा एका सामायिक 'भारतीय भाषा' कुटुंबाचा भाग आहेत. ही संकल्पना एक साधा पण शक्तिशाली संदेश देते: भाषिक विविधता सांस्कृतिक एकतेला बळकट करते. या वर्षीच्या आवृत्तीत भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण आणि युवा सहभाग यावर भर देत, शिक्षणाचे अधिक मजबूत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काशी प्रदेशातील विद्यार्थ्यांना तमिळ भाषेत स्वतःला पूर्णपणे सामावून घेण्याची आणि तमिळनाडूचा समृद्ध वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी निर्माण करून, हा संगम सांस्कृतिक एकतेची कल्पना केवळ प्रतीकात्मकतेच्या पलीकडे घेऊन जातो.

या विस्तारित दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, तमिळनाडूमधील सात व्यापक श्रेणींमधील (विद्यार्थी, शिक्षक, लेखक आणि माध्यम व्यावसायिक, कृषी आणि संबंधित क्षेत्रातील लोक, व्यावसायिक आणि कारागीर, महिला आणि आध्यात्मिक विद्वान) 1400 हून अधिक प्रतिनिधी काशीतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. त्यांचा सहभाग हे सुनिश्चित करतो की या संकल्पनेचा भाव समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे काशी तमिळ संगमम 4.0 समावेशक आणि दूरगामी परिणाम करणारा ठरेल.

काशी तमिळ संगमम 4.0: मुख्य उपक्रम

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना तमिळ शिकवणे – चला तमिळ शिकूया – तमिळ कर्कळम

या आवृत्तीचा एक मध्यवर्ती उपक्रम म्हणजे, विशेषतः काशी प्रदेशात, तमिळ शिक्षणाची रचनाबद्ध ओळख करून देणे हा आहे.

50 हिंदी भाषिक तमिळ शिक्षक, ज्यात डीबीएचपीएस (DBHPS) प्रचारकांचा समावेश आहे, 2 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025पर्यंत वाराणसीतील 50 शाळांमध्ये तैनात केले जातील.

उत्तर प्रदेशात येण्यापूर्वी त्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) येथे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रत्येक शिक्षक 30 विद्यार्थ्यांच्या तुकड्यांसाठी मूलभूत संभाषण, उच्चार आणि वर्णमाला यांना सामावून घेणारे अल्प-मुदतीचे तमिळ बोलीभाषेचे मॉड्यूल आयोजित करेल.

एकूण, या उपक्रमातून 1,500 विद्यार्थी प्राथमिक तमिळ शिकतील.

बीएचयूचा (BHU) तमिळ विभाग, सीआयआयएल म्हैसूर, आयआरसीटीसी आणि वाराणसी प्रशासन समन्वय आणि लॉजिस्टिक्ससाठी पाठिंबा देत आहेत.

हा उपक्रम तमिळनाडूच्या बाहेर तमिळ शिक्षण वाढवण्यासाठी आणि भाषिक समावेशकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवतो.

तमिळनाडूला भेट देताना तमिळ शिका – अभ्यास दौरा कार्यक्रम

उत्तर प्रदेशातील तमिळ शिक्षणासाठी पूरक पाठबळ म्हणजे, काशी प्रदेशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावरील शैक्षणिक अनुभूती आहे.

  • उत्तर प्रदेशातील 300 कॉलेज विद्यार्थी तमिळ भाषा शिकण्यासाठी 10 तुकड्यांमध्ये तमिळनाडूला भेट देतील.
  • ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) चेन्नई येथे एका अभिमुखता कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यानंतर राज्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये तमिळ भाषा वर्ग आणि सांस्कृतिक सत्रांचे आयोजन केले जाईल.
  • प्रत्येक संस्था विद्यार्थ्यांची यजमान बनेल, विषय समन्वयक प्रदान करेल आणि ऐतिहासिक तमिळ-काशी संबंधांशी संबंधित स्थळांसाठी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करेल.
  • सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

संस्थांची यादी :

तुकडी क्रमांक

संस्थेचे नाव

1 आणि 2

आयआयटी मद्रास (विद्यार्थ्यांच्या 2 तुकड्या)

3

सेंट्रल युनिव्हर्सिटी, पॉन्डिचेरी

4

गांधीग्राम ग्रामीण संस्था, मानित विद्यापीठ, दिंडीगुल

5

भारतीय विद्या भवन

6

श्री शंकरा कला आणि विज्ञान महाविद्यालय, एनाथूर, कांचीपुरम

7

श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाविद्यालय, कांचीपुरम

8

कोंगूनाडू कला आणि विज्ञान महाविद्यालय, कोईम्बतूर

9

शास्त्र युनिव्हर्सिटी, तंजावूर

10

गणाधिपती तुलसी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय (GTEC), वेल्लोर

उत्तर भारतातील युवा अध्ययनकर्त्यांना तमिळ भाषा, वारसा आणि समकालीन सांस्कृतिक चालीरिती यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल हे हा कार्यक्रम सुनिश्चित करतो.

ऋषी अगस्त्य वाहन मोहीम ( SAVE)

ऋषी अगस्त्य वाहन मोहीम ( SAVE) हा काशी तामिळ संगमम 4.0 मधील सर्वात जास्त प्रतीकात्मक उपक्रम आहे, जो तामिळ व भारतीय परंपरेत खोलवर रुजलेला एक सांस्कृतिक मार्ग पुनरुज्जीवित करत आहे.

  • ही मोहीम तामिळनाडूतील तेनकाशी येथून 2 डिसेंबर 2025 रोजी सुरु होईल व 10 डिसेंबर 2025 रोजी काशी येथे पोचेल.
  • ऋषी अगस्त्य यांनी वाटचाल केलेल्या मार्गावरून ही यात्रा मोहीम जाणार असून याद्वारे भारतीय ज्ञान प्रणालीतील तामिळनाडूचे योगदान दिसून येईल.
  • पांडियन राजा आदी वीर पराक्रम पांडियन याने सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यासाठी व शिवमंदिर उभारण्यासाठी प्राचीन काळी उत्तरेकडे प्रवास केले होता आणि त्यामुळे या जागेचे नाव तेनकाशी म्हणजेच दक्षिण काशी असे पडले. या त्याच्या प्रवासाची आठवण जागी करण्यासाठी ही यात्रा मदत करते.
  • या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या चेर, चोल , पांड्य, पल्लव, चालुक्य आणि विजयनगर संस्कृतींशी असलेले प्राचीन सांस्कृतिक संबंध ही यात्रा-मोहीम अधोरेखित करते.
  • अभिजात तामिळ साहित्य, सिद्ध औषधी पद्धती, तसेच इतर अनेक सामायिक परंपरांबद्दल या यात्रेच्या माध्यमातून जागृती निर्माण व्हावी असा प्रयत्न आहे.

ही मोहीम तामिळनाडू आणि काशी यांच्यातील विचार, संस्कृती आणि आध्यात्मिक शिक्षणाच्या सखोल ऐतिहासिक प्रवाहाचे प्रतीक आहे.

काशी तमिळ संगमम चा प्रवास: 1.0 ते 4.0 पर्यंत

काशी तमिळ संगमम 2022 मध्ये स्थापन झाल्यापासून, तामिळनाडू आणि काशी यांच्यातील एक संरचित सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम म्हणून त्याचा विकास झाला आहे. प्रत्येक आवृत्तीमध्ये निवडक पथके , विषयानुरूप महत्वाची क्षेत्रे निवडणे, शैक्षणिक संवाद आणि वारसा अनुभवांद्वारे त्याची व्याप्ती वाढवली आहे, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सभ्यता संबंध सातत्याने मजबूत होत आहेत.

काशी तमिळ संगमम 1.0 (नोव्हेंबर - डिसेंबर 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2022 मध्ये काशी तमिळ संगममच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन झाले, या मुळे एका सांस्कृतिक सेतूचा पाया रचला गेला जो पुढील आवृत्त्यांद्वारे मजबूत होत राहिला. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान झालेल्या पहिल्या आवृत्तीने तामिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक बंध मोठ्या, अभ्यासपूर्ण स्वरूपात सार्वजनिक केंद्रस्थानी आणला.

प्रमुख मुद्दे:

  • तामिळनाडूतील 12 विविध गटांमधील 2500+ सहभागी - विद्यार्थी, शिक्षक, कारागीर, शेतकरी, लेखक, आध्यात्मिक नेते, व्यावसायिक आणि सांस्कृतिक अभ्यासक.
  • वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या यांचा समावेश असलेली आठ दिवसांची योजनाबद्ध यात्रा.
  • प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थळांना भेटी: काशी विश्वनाथ मंदिर, केदार घाट, सारनाथ आणि काशीमधील तमिळ वारसा दर्शवणारी ठिकाणे.
  • महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या पिढीजात घराला भेट आणि शहरातील तमिळ भाषिक समुदायांशी संवाद.
  • बनारस हिंदू विद्यापीठात तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील कलाकारांचा समावेश असलेले दैनिक सांस्कृतिक कार्यक्रम.
  • हातमाग, हस्तकला, ओडीओपी अर्थात एक जिल्हा एक उत्पादन, पुस्तके आणि पारंपारिक पाककृती प्रदर्शित करणारे प्रदर्शन.
  • शैक्षणिक सत्रे, व्याख्यान-प्रात्यक्षिके आणि तामिळनाडू आणि काशीमधील ऐतिहासिक व साहित्यिक संबंधांचा वेध घेणारी चर्चासत्रे .

या उद्घाटन आवृत्तीने संगममचे प्रारूप स्थापित केले - वारसा, संस्कृती, अभ्यासपूर्ण चर्चा आणि थेट देवाणघेवाणीद्वारे लोकांना एकत्र आणणे - आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांसाठी एक मजबूत पायाभरणी केली.

 

काशी तमिळ संगमम 2.0 (डिसेंबर 2023)

17 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान वाराणसीतील नमो घाट येथे आयोजित काशी तमिळ संगमम च्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये पहिल्या वर्षात झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रमाण आणि आवाका वाढला.

 

काशी तामिळ संगम 2.0 मधील प्रमुख घडामोडी :

  • तामिळनाडूतील सात विविध श्रेणींमधील 1,435 प्रतिनिधींनी वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या यासारख्या प्रमुख स्थळांच्या आठ दिवसांच्या सहलींमध्ये भाग घेतला. यात काशी विश्वनाथ मंदिर, सारनाथ आणि सुब्रमण्यम भारती यांचे घर यासारख्या प्रमुख आध्यात्मिक आणि तमिळ-वारसा स्थळांना भेटी देण्यात आल्या.
  • या आवृत्तीत माननीय पंतप्रधानांच्या भाषणाचे पहिलेच रिअल-टाइम अर्थात त्वरित तमिळ भाषांतर सादर करण्यात आले, ज्यामुळे प्रतिनिधींशी अखंड संवाद साधता आला.
  • नमो घाट येथील दैनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही राज्यांमधील शास्त्रीय कला, लोककला तसेच आधुनिक कलात्मक सादरीकरणे करण्यात आली. त्याशिवाय सात विषयांवर आधारित शैक्षणिक सत्रे, तसेच विशेष अगस्त्य जयंती सत्राचे आयोजन केले गेले.
  • हातमाग, हस्तकला, ODOP उत्पादने, पुस्तके आणि प्रादेशिक पाककृतींचा समावेश असलेल्या या प्रमुख प्रदर्शनात 2 लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली तसेच ₹22 लाखांची विक्री झाली .
  • 8.5 कोटी नागरिकांपर्यंत (Brand24) पोचलेल्या या मोहिमेच्या माहितीमुळे तसेच अधिकृत KTS सोशल मीडिया हँडलवर 2.5 लाख संवादांसह 80 लाख नागरिकांशी झालेल्या संपर्कामुळे उल्लेखनीय डिजिटल फूटप्रिंट तयार झाले.

 

 

काशी तमिळ संगम 3.0 (फेब्रुवारी 2025)

15 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित काशी तमिळ संगममच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये तमिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक आदानप्रदान अधिक सखोल घडून आले .

केटीएस 3.0 मधील प्रमुख घडामोडी:

ऋषी अगस्त्यर यांचे साहित्य, भाषाशास्त्र, तत्वज्ञान आणि भारतीय ज्ञान परंपरांमध्ये योगदान अधोरेखित करणारे प्रदर्शन आणि चर्चा.

प्रयागराज येथील महाकुंभ मेळा 2025 आणि नव्याने उद्घाटन झालेल्या राम मंदिरासह वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येतील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी, ज्यामुळे प्रतिनिधींना एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव मिळाला .

भारतीय ज्ञान परंपरांवर भर देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत, प्राचीन तमिळ ज्ञान प्रणालींना आधुनिक संशोधन, नवोपक्रम आणि समकालीन शिक्षणाशी जोडणाऱ्या कार्यशाळा, चर्चासत्रे आणि आंतरविद्याशाखीय सत्रे.

विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कारागीर, उद्योजक, महिला समूह, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे प्रचारक आणि युवा नवोन्मेषक - या विविध गटांच्या सहभागामुळे अर्थपूर्ण आंतर-प्रादेशिक देवाणघेवाण आणि परस्पर संबंध अधिक दृढ झाले.

परंपरा आणि आधुनिकता एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून KTS 3.0 ने संगमम ची भूमिका अधिक बळकट केली. नवीन माहिती , परस्पर संवाद आणि सामायिक सांस्कृतिक अनुभवाद्वारे तामिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक सातत्य अधिक प्रभावी केले.

काशी तामिळ बंध मजबूत करणे : एक चिरस्थायी सांस्कृतिक सातत्य

काशी तमिळ संगममने त्याच्या चार आवृत्त्यांमध्ये दाखवून दिले आहे की जेव्हा सांस्कृतिक देवाणघेवाण प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असते तेव्हा ती खरोखरच परिवर्तनकारी ठरते. प्रत्येक आवृत्तीने या प्रवासात एक वेगळा आयाम जोडला आहे: KTS 1.0 मधील मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण , KTS 2.0 मधील मोठा व विषयानुरूप लोकसहभाग आणि KTS 3.0 चा ज्ञान-केंद्रित, ऋषी अगस्त्यर-केंद्रित दृष्टिकोन . KTS 4.0 मधून, तमिळ भाषा शिक्षणाला अग्रभागी ठेवून, तमिळ करकलम, तमिळ कार्पोम आणि योजनाबद्ध अभ्यास दौऱ्यांद्वारे परस्पर भाषिक सहभाग वृद्धिंगत करून एक नवीन पल्ला गाठला जाईल.

एकत्रितपणे, या आवृत्त्या सांगतात की संगमम आता केवळ स्मृती जपणारा कार्यक्रम राहिला नाही, तर त्या पलीकडे जाऊन एक सातत्यपूर्ण सांस्कृतिक मार्ग प्रशस्त करत आहे. येणारे प्रतिनिधी दर वर्षी काशीच्या घाट आणि मंदिरांमध्ये तमिळ वारसा पुन्हा शोधतात; उत्तर प्रदेशातील विद्यार्थी तामिळनाडूचा प्रत्यक्ष अनुभव घेतात; शिक्षक नवीन शिकणाऱ्यांना तमिळ भाषेची ओळख करून देतात; आणि दोन्ही प्रदेशातील समुदाय साहित्य, हस्तकला, पाककृती आणि सामायिक आध्यात्मिक परंपरांद्वारे एकमेकांशी जोडले जातात.

हा एकत्रित प्रवास 'एक भारत श्रेष्ठ भारता'च्या मुख्य तत्वाचे प्रतिबिंब आहे. या उपक्रमाद्वारे एकमेकांच्या भाषा, परंपरा आणि दृष्टिकोनांशी परिचय वाढून राष्ट्रीय एकता मजबूत होते. ऋषी अगस्त्य वाहन मोहिमेसारख्या उपक्रमांद्वारे पुनर्जीवित केलेल्या प्राचीन संबंधांचा पुनर्शोध घेण्यात येतो. शाळा, विद्यापीठे आणि सांस्कृतिक स्थळांच्या माध्यमातून सतत होणाऱ्या ज्ञानसंपादनातून या मोहिमेत वर्षभर भाषिक व सांस्कृतिक देवाणघेवाण आणि युवक सहभागावर ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा प्रभाव दर्शवते.

काशी तमिळ संगमम 4.0 च्या कार्यक्रमात नवीन भाषिक आणि शैक्षणिक केंद्रबिंदू तयार होत आहेत. सातत्यपूर्ण संवादातून सांस्कृतिक स्पष्टता निर्माण होते, हे यातून स्पष्ट होते. वारशाचे संगोपन करून, भाषा शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि लोकांमध्ये अर्थपूर्ण संपर्क सक्षम करून, संगमम आज एक चिरस्थायी सांस्कृतिक सातत्य म्हणून उभा आहे - तामिळनाडू आणि काशीमधील कालातीत संबंध अधिक दृढ करत आहे आणि सामायिक सभ्यता अनुभवाद्वारे भारताची एकता समृद्ध करत आहे.

संदर्भ

https://kashitamil.iitm.ac.in/home

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2192810

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2187556

https://x.com/PIB_India/status/1992118405592441194

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1980376

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/feb/doc2025214502301.pdf

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/jun/doc202562561301.pdf

https://blogs.pib.gov.in/blogsdescrI.aspx?feaaid=81

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2192810#:~:text=Sage%20Agasthya%20Vehicle%20Expedition%20from,Kashi%20on%2010th%20December%202025.

https://kashitamil.bhu.edu.in/index.html

https://www.pmindia.gov.in/en/image-gallery/

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

(Backgrounder ID: 156279) आगंतुक पटल : 8
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Kannada
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate