• Sitemap
  • Advance Search
Rural Prosperity

राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेड (National Co-operative Exports Limited - NCEL)

"भारताची सहकार शक्ती आता जागतिक बाजारपेठांमध्ये"

Posted On: 26 SEP 2025 10:20AM

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2025

 

प्रमुख मुद्दे
  • ऑगस्ट 2025 पर्यंत NCEL ने एकूण 11,034 सहकारी संस्थांना सदस्यत्व प्रदान केले आहे.
  • ऑगस्ट 2025 पर्यंत, NCEL ने तांदूळ, ताजे लाल कांदे, साखर, बाळांसाठी अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, मसाले आणि चहा सह 5,403.01 कोटी रुपये किमतीच्या 13.49 लाख मेट्रिक टन (LMT) हून अधिक  कृषी वस्तूंची निर्यात केली आहे.
  • 2024-25 साठी 4,283 कोटी रुपये उलाढाल असलेल्या NCEL ने 122 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला.
  • NCEL ने कृषी वस्तूंच्या  निर्यातचा  जागतिक स्तरावर 28 देशांमध्ये विस्तार केला आहे.

 

 प्रस्तावना  

राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेड (नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड) ही निर्यातीसाठी समर्पित असलेली राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्यीय सहकारी संस्था आहे. परदेशी बाजारपेठांमध्ये भारतातील संपूर्ण सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी ही एक छत्र संस्था (अम्ब्रेला बॉडी) आहे.

NCEL ला केंद्र सरकारने मान्यता दिली आणि 25 जानेवारी 2023 रोजी मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटिज ॲक्ट, 2002 या बहुराज्यीय सहकार संस्था कायद्या अंतर्गत औपचारिकपणे ती नोंदणीकृत करण्यात आली.

(मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटिज ॲक्ट-2002, एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवतो. तो सदस्यांना स्वेच्छेने सहकारी संस्था स्थापन करण्याची परवानगी देतो आणि त्या लोकशाही मार्गाने कार्य करतील याची खात्री देतो. हा कायदा स्वयं-मदत (self-help), परस्पर मदत (mutual aid) आणि सदस्यांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणाला प्रोत्साहन देतो. तसेच, तो सहकारी संस्थांना कार्यात्मक स्वायत्तता प्रदान करतो आणि संबंधित बाबींची पूर्तता करतो.)

NCEL ला 5 अग्रगण्य सहकारी संस्थांनी प्रवर्तित केले आहे –भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड-IFFCO), कृषक भारती सहकारी मर्यादित (कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड-KRIBHCO), राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (नॅशनल ग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड-NAFED), गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ मर्यादित (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन-GCMMF–अमूल) आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-NCDC).

प्रत्येक प्रवर्तक संस्थेने 100 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. त्यामुळे एकूण भरणा केलेले भांडवल 500 कोटी रुपये आहे. अधिकृत समभागीय भांडवल 2,000 कोटी रुपये आहे. सहकारी उत्पादनांना जागतिक बाजारपेठा उपलब्ध करुन देऊन, NCEL "मेक इन इंडिया" संकल्पनेला समर्थन देते, बाजार दुवे मजबूत करते (उत्पादक आणि बाजार यांच्यातील संबंध अधिक दृढ आणि परिणामकारक बनवते).आणि सहकार क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करते.

 यांनी प्रवर्तित केले 

स्रोत: राष्ट्रीय सहकार निर्यात मर्यादीत

NCEL चा उद्देश भारतीय सहकारी संस्थांकडील अतिरिक्त उत्पादने जागतिक बाजारपेठांमध्ये घेऊन जाणे आहे. यामुळे चांगली मागणी आणि वाजवी किमतीची हमी मिळते. ही संस्था, खरेदी, साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग, प्रमाणीकरण आणि विपणन हाताळून निर्यातीस पाठबळ देते. यासोबतच NCEL, वित्त व्यवस्थापन करते, तांत्रिक मार्गदर्शन देते, कौशल्ये विकसित करते, बाजार चातुर्य तयार करते आणि सदस्यांना सरकारी योजनांशी जोडते. अशा प्रकारे सहकारी संस्थांची क्षमता मजबूत होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांची उपस्थिती वाढते. “सहकार से समृद्धी” या मार्गदर्शक दृष्टीकोनाखाली स्थानिक उत्पादने आणि कौशल्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये पोहोचवून, NCEL द्वारे सहकार मॉडेल, राष्ट्रीय स्तरावर वाढवले गेले आहे.

 

आरंभ ते परिणाम

राष्ट्रीय सहकार निर्यात मर्यादित (NCEL)

  • NCEL ने 11,034 सहकारी संस्थांना सदस्यत्व प्रदान केले.
  • निर्यात - 5403.01 कोटी रुपये किमतीच्या 13.49 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त कृषी उत्पादने .
  • 28 देशापर्यंत निर्यात वाढवली.
  • निव्वळ नफा - 2024-25 साठी 4,283 कोटी रुपयांच्या उलाढालीसह 122 कोटी रुपये.
  • 2023-24 दरम्यान सदस्य सहकारी संस्थांना 20% लाभांश दिला

स्रोत : सहकार मंत्रालय

 

फार थोड्या कालावधीत, NCEL ने लक्षणीय परिणाम दिले आहेत.

ऑगस्ट 2025 पर्यंत, 10,793 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) आणि इतर सहकारी संस्थांसह 11,034 सहकारी संस्थांना सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे.

(प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS - Primary Agricultural Credit Societies) या गावपातळीवरील सहकारी संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवतात, परतफेड वसूल करतात आणि वितरण तसेच विपणन कार्यांना पाठबळ देतात.)

ज्या सहकारी संस्थांना सदस्यत्व देण्यात आले आहे, त्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

अनुक्रमांक

सहकारी संस्थांचे प्रकार संख्या

1.

PACS आणि इतर प्राथमिक सहकारी संस्था

10793

2.

तहसील/जिल्हा स्तरावरील सहकारी संस्था

216

3.

बहु-राज्यीय सहकारी संस्था 

10

4.

राज्य स्तरावरील सहकारी संस्था

10

5.

प्रवर्तक सहकारी संस्था / संघटना

5

  • As of August 2025, Exports through NCEL have already crossed 13.49 lakh metric tonnes (LMT) of agricultural commodities worth Rs.5,403.01 crore including rice, fresh red onion, sugar, baby food, processed food, spices and tea.

Export Summary for the year 2023-2025 (Till August)

S.No.

Year

Quantity (Lakh Metric Tonne)

Value (Rupees in crore)

1.

2023-24

2.66

1,113.13

2.

2024-25

10.83

4,283.56

3.

2025 – Till August

0.00798

6.32

4.

Total

13.49

5,403.01

  • NCEL ने बासमती आणि बिगर-बासमती तांदूळ, सागरी उत्पादने (विशेषतः कोळंबी/shrimp), भरड धान्य, गहू, फळे आणि भाज्या, प्राणी उत्पादने, मसाले आणि बागायती उत्पादने, अशा प्रमुख उत्पादनांची 28 देशांमध्ये आपली निर्यात वाढवली आहे.
  • 2024-25 साठी 4,283 कोटी रुपयांच्या उलाढालीसह NCEL ने 122 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला.
  • 2023-24 दरम्यान, NCEL ने आपल्या सदस्य सहकारी संस्थांना 20% लाभांश दिला. ही कामगिरी, भारतातील सहकार चळवळीला जागतिक शक्तीमध्ये परिवर्तित करण्याची क्षमता, NCEL मध्ये असल्याचे अधोरेखित करते.
  • NCEL ने सेनेगल इंडोनेशिया आणि नेपाळमधील 61 आयातदारांशी सामंजस्य करार देखील केले आहेत.

 

NCEL ची उद्दिष्टे आणि प्रमुख लक्ष्य

NCEL ची उद्दिष्टे

  • दर्जा, मानकीकरण आणि प्रमाणीकरण सुधारून, सहकारी उत्पादने आणि सेवांना चांगल्या किमती मिळवून देणे.
  • निर्यातीसाठी पायाभूत सुविधा तयार करणे, आवश्यक परवानग्यांची हमी देणे आणि बाजार दुवे मजबूत करणे.
  • डेटाबेस (माहितीचा तपशील) तयार करणे, बाजारपेठेचा अभ्यास करणे आणि निर्यात-संबंधित सल्ला प्रदान करणे.
  • सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण , जागरूकता कार्यक्रम आणि क्षमता-निर्मिती यांचे आयोजन करणे.
  • आर्थिक सहाय्य प्रदान करणे, निधीची व्यवस्था करणे आणि नवंउद्योग (स्टार्ट-अप्स) उभारण्यासाठी, सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे.
  • जागतिक संधी शोधण्यासाठी आयोजित केलेल्या परदेश दौऱ्यां करता, व्यावसायिक शिष्टमंडळांना सुविधा पुरवणे (Facilitate).
  • सहकारी संस्थांना विविध सरकारी योजना, अनुदाने, कर्जसुविधा आणि तांत्रिक मदत यांचा अधिक लाभ मिळावा यासाठी सरकारी विभागांशी संवाद आणि समन्वय वाढवणे.
  • सहकारी निर्यात क्षेत्रातील आव्हानांवर मात करणे.

स्रोत: सहकार मंत्रालय

 

प्रमुख लक्ष्य :

  • सहकारी निर्यातीसाठी, मुख्य समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून कार्य करणे आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संस्थांसोबत सामंजस्य करार करणे.
  • मूल्यवर्धन (value additio), साठवण , बांधणी (पॅकेजिंग) आणि वाहतूक अशा माध्यमातून हितधारकांना (स्टेकहोल्डर्स) जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात/ भागांसाठी रोजगार (rural jobs) निर्माण करणे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित किमतींवर, कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे.
  • सहकारी संस्थांसाठी बाजार अभ्यास, सल्ला, प्रशिक्षण, प्रमाणीकरण सहाय्य (certification support), मालपुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) आणि पायाभूत सुविधा प्रदान करणे.
  • सहकारी उत्पादनांची जागतिक स्थाननिर्धारण (global positioning) मजबूत करण्यासाठी ज्ञानकोष (knowledge base) तयार करणे आणि उत्पादन ओळख (ब्रँडिंग), चिन्हांकन (लेबलिंग) आणि आवरण बांधणी (पॅकेजिंग) यांच्यात सुधारणा करणे.

 

 NCEL ची पोहोच आणि बाजार उपस्थिती वाढवण्यासाठी धोरणे 

निर्यात लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने, NCEL आपली बाजारपेठेतील स्थान भक्कम करण्यासाठी अनेक धोरणे अवलंबत आहे.

  • राज्याच्या प्रमुख समन्वय संस्थांसोबत (नोडल एजन्सीज) सामंजस्य करार केले आणि PACS म्हणजे Primary Agricultural Credit Society अर्थात प्राथमिक कृषी कर्ज संस्थाशी जोडण्यासाठी व्यावसाय नियोजन तयार केले.
  • निर्यातीसाठी, शेतकरी आणि सहकारी संस्थांना तयार करण्याकरता, कृषी उत्पादन कार्यशाळांची मालिका (कमोडिटी सेमिनार सीरिज) सुरू केली, ज्यात पहिली कार्यशाळा जुलै 2025 मध्ये मध्य प्रदेशात आयोजित करण्यात आली.
  • विशिष्ट उत्पादनांसाठी धोरणे आखताना, नोडल एजन्सीज, सहकारी संस्था, निबंधक (रजिस्ट्रार) कार्यालये आणि इतर संबंधित पक्षांसह संपूर्ण सरकारी यंत्रणेचा समन्वय साधला.
  • समाज माध्यमे, विपणन साधने (marketing tools) आणि जागरूकता मोहिमांमधून ब्रँडिंग आणि डिजिटल पोहोच मजबूत केली.
  • PACS मधून सदस्यत्व वाढवण्यासाठी बीपीओ आऊटरीच प्रोग्राम (BPO - Business Process Outsourcing - Outreach Programme) हा व्यवसाय प्रक्रियेसाठी बाह्य सेवा (आउटसोर्सिंग) - पोहोच कार्यक्रम सुरू केला.
  • (Nukkad Natak) कार्यक्रमांद्वारे, तसेच संकेतस्थळे (वेबसाइट) आणि व्हॉट्स द्वारे 10 भाषांमध्ये सामायिक केलेल्या बहुभाषिक डिजिटल वृत्तपत्रिकांद्वारे (digital newsletter) सहभाग वाढवला.

 

 NCEL साठी भविष्यातील दिशा (Future Directions for NCEL) 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी NCEL ला सहकारी साखर कारखान्यांमधून साखरेसाठी, त्रिपुरातील सुगंधी तांदळासाठी, सेंद्रिय कापूस आणि भरड धान्यांसाठी नवीन निर्यात संधी शोधण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी, आखाती देशांमध्ये ताजा भाजीपाला आणि बटाट्याच्या विशेष वाणांची (special potato varieties) निर्यात करण्यासाठी मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी (partnerships) करण्याची क्षमता देखील अधोरेखित केली.

NCEL साठी 2 लाख कोटी रुपये मूल्याच्या निर्यातीचे एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले गेले आहे. शाह यांनी सर्व सहकारी संस्थांची निर्यात, NCEL द्वारे केली जावी, जेणेकरून सुमारे 20,000–30,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि निव्वळ नफा यांचा लाभ सहकारी संस्थांनाही परत मिळू शकेल, असे निर्देश दिले.

त्यांनी डाळींच्या आयातीसाठी, आफ्रिका आणि म्यानमारमध्ये (ब्रम्हदेश), NCEL ची कार्यालये स्थापन करण्याची आणि जागतिक मागणी ओळखण्यासाठी आणि त्यांची पुरवठा क्षमता प्रदर्शित करण्यासाठी समर्पित संकेतस्थळ (dedicated website) विकसित करण्याची सूचना देखील, त्यांनी सहकार संस्थांच्या सदस्यांना केली.

 

 निष्कर्ष  

राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (NCEL-नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड), ही संस्था भारतातील सहकार क्षेत्रासाठी एका नवीन युगाचे प्रतिनिधित्व करते. केवळ दोन वर्षांमध्ये, या संस्थेने सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, लाखो मेट्रिक टन उत्पादनांची निर्यात केली आहे आणि सदस्यांना नफ्यात वाटेकरी केले आहे. पुढील टप्प्यात निर्यातीचे प्रमाण वाढवणे, कृषी उत्पादन आणि विपणन यांच्या अनुषंगाने एकत्रित विचार करण्यासाठी उत्पादनांचा तयार केलेला एक संच (commodity basket) वैविध्यपूर्ण करणे आणि जगभरातील भागीदारी सखोल करणे यांचा समावेश असेल. सरकारी पाठबळ आणि या संस्थेच्या प्रवर्तकांनी तयार केलेल्या मजबूत पायामुळे, NCEL भारतातील सहकारी संस्थांचा जागतिक चेहरा सज्ज आहे.

 

संदर्भ

राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (National Co-operative Exports Limited)

सहकार मंत्रालय

पत्र सूचना कार्यालयाचे अधिकृत बातमीपत्रक( PIB Press Release)

राज्यसभा

उत्तम कारभाराचे राष्ट्रीय केंद्र (National Centre for Good Governance)

पीडीएफ पाहण्यासाठी ही कळ दाबा

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/आशुतोष सावे/दर्शना राणे

(Explainer ID: 156016) आगंतुक पटल : 53
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , हिन्दी
National Portal Of India
STQC Certificate