• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Rural Prosperity

पीएम विश्वकर्मा योजना : परंपरेचा सन्मान, विकासाला शक्ती

कारागिरांना ओळख, कौशल्यात वाढ, पत आणि बाजारपेठेशी मेळ

Posted On: 16 SEP 2025 4:36PM

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2025

 

मुख्य गोष्टी

  • गेल्या दोन वर्षात जवळपास 30 लाख कारागीर आणि हस्तकला व्यावसायिक यांनी पी एम विश्वकर्मा योजनेत नोंदणी केली.
  • सर्वसाधारण 26 लाख कारागीर आणि हस्तकला व्यवसायिक यांनी कौशल्य पडताळणी करून घेतली तर त्यांच्यापैकी 86% जणांनी त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केले.
  • या योजनेच्या अंतर्गत सर्वात जास्त नोंदणी राजमिस्त्री (गवंडी) या व्यवसायाची झालेली आहे.

 

प्रस्तावना

अमरावतीमधील खानपुर या एका शांत गावात प्रतीक प्रकाश राव जामदकर हा गवंडी रहात होता. त्याच्याजवळ स्वतःची अशी काहीच ओळख नव्हती. आपल्या कामासाठी आवश्यक ती हत्यारेही त्याच्याजवळ नव्हती आणि त्याचे हातातील प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी त्याला झगडावे लागत होते आणि त्यामुळेच त्याच्या रोजगारावर थेट परिणाम होत होता. त्याच्या गावात पीएम विश्वकर्मा योजना सुरू झाली आणि त्याचे जीवन बदलूनच गेले. त्याला एक लाखाचे कर्ज मिळाले त्यातून त्याने नवीन, अधिक चांगली हत्यारे विकत घेतली. त्यामुळे त्याला त्याची कामे वेळेवर पूर्ण करता येऊ लागली. या योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्याला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेता आली. या योजनेतून त्याला मिळालेले ओळखपत्र आणि प्रमाणपत्र यामुळे त्याची प्रतिष्ठा आणि ओळख वाढली परिणामी त्याचा स्वाभिमानही जागृत झाला.

प्रतीकसारखे अनेक कारागीर आणि हस्तकला व्यवसाय त्यांची मुळे अजूनही टिकवून आहेत. त्यांचे कौशल्य किंवा त्यांचे व्यवसाय हे पारंपारिक प्रशिक्षणाच्या गुरु- शिष्य पद्धततून त्यांच्याकडे आले आहेत. अभिमान आणि सन्मान यांच्यासह ही परंपरा चालू ठेवावी असे त्यांना वाटत असते. हे कारागीर आणि हस्तकला व्यवसायिक भारतात विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात.‌ हे अगदी प्राथमिक स्तरावरचे काम हाताने आणि हाताने वापरण्यात येणाऱ्या हत्यारांनी करत असतात. जग कितीही पुढे गेले आणि तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी त्यांचे काम आणि आवश्यकता कायमच टिकून राहणार आहे. बरेचदा अशी माणसे स्वयंरोजगार करत असली तरी ती अर्थव्यवस्थेच्या व संघटित क्षेत्रात मोडतात. ही माणसे सुतार, लोहार, कुंभार, धोबी अशासारखे व्यवसाय करत असतात.

 

तुम्हाला माहित आहे का?

पीएम विश्वकर्मा योजना ही 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा दिवस या दिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली. या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या कालावधीसाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही अशा कारागीर आणि हस्तकला व्यावसायिकांना त्यांची कौशल्यवृद्धी करता यावी तसेच त्यांची उत्पादने व सेवा सर्वदूर पोहोचावे, परिणामी त्यांचे जीवन उन्नत व्हावे या उद्देशाने सुरू झाली. कारागीर तसेच हस्तकला व्यवसायिकांना त्यांच्या संबंधीत व्यवसायांमध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वांकष सहकार्य पुरवता यावे हे या योजनेचे लक्ष्य आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात व्यवसाय वाढावा हे या योजनेचे उद्दिष्ट तर आहेच याशिवाय महिला सक्षमीकरण, परिघावरचे किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय दिव्यांग पारलैंगिक भारतातील ईशान्येकडील राज्यांचे नागरिक, द्वीप समूह किंवा डोंगराळ प्रदेशातील नागरिकांकडे विशेष लक्ष पुरवण्यावर या योजनेचा भर आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्य विकास आणि नवोद्योजकता मंत्रालय तसेच अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील आर्थिक सेवा विभाग यांनी एकत्रितपणे ही योजना सुरू केली. योजनेचा प्रभाव प्रत्येक जिल्ह्यात वाढत राहावा यासाठी जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिट सुरू केले. या योजनेच्या लाभांबद्दल जनजागृती निर्माण करणे हा या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापनाचा उद्देश आहे. याशिवाय प्रशिक्षणाची तारीख, बॅचच्या वेळा, प्रशिक्षण केंद्रांची ठिकाणे, संबंधितांशी समन्वय या बाबींची माहिती विश्वकर्मांना देण्याचे काम त्यांच्याकडे आहे. एवढेच नाही तर प्रशिक्षण केंद्रांमधून दिले जाणारे प्रशिक्षण हे प्रशिक्षणाच्या नियमावलीशी निगडित आणि सुसंगत असल्याची खात्री करून घेण्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिट केंद्रांवर नियमितपणे नजर ठेवतात. देशामध्ये जुलै 2025 पर्यंत देशातील एकूण 618 जिल्ह्यांमध्ये मिळून 497 जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिट नेमली गेली आहेत.

मंत्रालय आणि जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिट्सच्या सहाय्याने ही योजना कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण आधुनिक साधने आणि विनातारण कर्ज घेण्यासाठी संधी देते याशिवाय डिजिटल व्यवहारांसाठी लाभारूपी प्रोत्साहन देते. यातून या कारागिरांना विश्वकर्मा म्हणून ओळखले जावे हा हेतू साध्य होतो. ही योजना कारागिरांना त्यांच्या उत्पादनाची क्षमता, दर्जा वाढवण्यासाठी प्रोत्साहन देते तसेच ब्रँडचे प्रमोशन आणि तो बाजारपेठाशी जोडला जावा यावर भर देऊन वाढीच्या संधी सुद्धा देते.‌

 

कोणाला अर्ज करता येईल? विश्वकर्मा योजना पात्रतेच्या अटींची माहिती

विशिष्ट कारागीराण पर्यंत योजनेचे लाभ पोहोचावेत यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेने ठराविक पात्रता निकष लावले आहेत. ज्या व्यक्ती आपल्या वाढवडीलांकडून आलेल्या पारंपारिक कौशल्ये आणि हाताने केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कुशल असतात अशा व्यक्तींसाठी ही योजना आहे.

 

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थी होण्यासाठी पात्रतेच्या अटी:

  • व्यक्ती हातांनी आणि हातांनी वापरण्याची साधने वापरून काम करणारा असावा
  • तो या योजनेत उल्लेख असलेल्या आणि कुटुंबावर आधारित असलेल्या 18 उद्योगांपैकी एखादा उद्योग करत असावा
  • तो असंघटित क्षेत्रातला किंवा स्वयंरोजगार क्षेत्रातला असावा.
  • नोंदणीच्या दिवशी त्याचे वय किमान 18 वर्षाचे हवे
  • गेल्या पाच वर्षात केंद्र किंवा राज्य सरकार कडून स्वरोजगार किंवा व्यवसायवृऋद्धीसाठी अशाच प्रकारच्या कर्जाधारित योजनेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसावेही योजना प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच सदस्यापुरती मर्यादित असेल. कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि अविवाहित मुले, ही कुटुंबाची व्याख्या. व्यक्ती/कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नसावा.

प्रत्येक विश्वकर्माचे बायोमेट्रिक्स वापरून आधार प्रमाणीकरणाच्या माध्यमातून नोंदणी व्हावी म्हणून सरकारने विशिष्ट पद्धत ठरवून दिली आहे. सर्वसाधारण सेवा केंद्रातील प्रतिनिधी ही पद्धत वापरून पोर्टलवर कारागीर आणि हस्तव्यवसायिकांची नोंदणी या योजनेत करून देतात.

 

छोट्या कारागिरांना मोठा लाभ

पीएम विश्वकर्मा योजनेने छोट्या कारागिरांना एका छताखाली आणले आहे आणि त्यांना अधिकृत मान्यता देऊन बळ दिले आहे. यामधून आर्थिक सहाय्य कौशल्य वृद्धी या सगळ्यावर भर देऊन त्यांना जागतिक बाजारपेठेशी संलग्न करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून वर्षानुवर्षाच्या आपल्या पारंपारिक कला आणि ज्ञानाचे जतन करतानाच नवीन स्पर्धात्मक जगात सुद्धा चमकू लागतील.

अधिकृत मान्यता :- कारागीर आणि हस्तव्यवसायिकांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल. त्यातून त्यांना त्यांच्या कामाची ओळख मिळेल तसेच त्यांच्या पारंपारिक उद्योगाचा स्वीकार होईल.

कौशल्य विकास: विश्वकर्मांच्या क्षमता वाढविण्यासाठी आणि त्यांना आधुनिक साधने व यंत्रसामग्रीची माहिती करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. या प्रशिक्षणात प्रत्येक कारागीर आणि हस्तशिल्पकारास दररोज ₹500 इतकी मानधनरक्कम दिली जाते.

सामग्रीसाठी प्रोत्साहन अनुदान:- कारागीर आणि हस्तव्यवसायिकांना आपल्या उद्योगासाठी उत्तम दर्जाची साधने खरेदी करता यावीत यासाठी सरकार त्यांना ई-व्हाऊचर या माध्यमातून 15000 रुपयांचे अनुदान देते. यामुळे लाभार्थींना आधुनिक उपकरणे मिळतात ज्यातून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊ शकते. या सामग्री प्रोत्साहन अनुदानासोबत साधनांच्या माहितीची टूल किट मॅन्युअलसुद्धा दिली जातात. ज्यामुळे त्यांना स्वतःच्या कारागिरीला अधिक वरच्या दर्जावर नेऊ शकतील अशी उपकरणे आणि आवश्यक त्या साधनांची सर्वांकष यादी मिळते.

कर्जासाठी सहाय्य : या योजनेअंतर्गत विश्वकर्मांना सहाय्य करण्यासाठी विनातारण व्यवसाय विकास कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही कर्जाऊ रक्कम त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक व्याज आकारणाऱ्या आणि कुठलेही बंधन न पाळणाऱ्या सावकारांच्या अवलंबनापासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडते.

हप्ता

कर्जाची रक्कम

कर्ज फेडीसाठी कालावधी

अट

पहिला

₹ 1 लाख

18 महिने

  • प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे.

दुसरा

₹ 2 लाख

30 महिने

  • कर्जाचा पहिला हप्ता मिळाला आहे.
  • कर्जाचे खाते व्यवस्थित राखले आहे.
  • व्यवसायात डिजिटल देवघेव स्वीकारली आहे किंवा आधुनिक प्रशिक्षण घेतले आहे.

 

व्याजाचा सवलतीचा दर 8 टक्के ठेवला आहे, जो कारागीर आणि हस्त व्यवसायिकांना केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्यातशमुळे 5% पडतो त्यामुळे लाभार्थ्यांना एकंदरीत कर्जाची रक्कम फायदेशीर होते‌.

डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन रक्कम: विश्वकर्मांना डिजिटल व्यवहारांविषयी विश्वास वाढवा वाढीला लागावा म्हणून प्रत्येक डिजिटल व्यवहाराच्या मागे एक रुपया त्यांना दिला जातो महिन्याभरात जास्तीत जास्त 100 पर्यंतच्या ई-व्यवहारांना ही प्रोत्साहन रक्कम मिळते. यामध्ये डिजिटल मिळकत किंवा खर्च हे दोन्ही गोष्टी व्यवहार म्हणून स्वीकारल्या जातात. या प्रोत्साहन अनुदानामुळे ते देशातील डिजिटल सुधारणांसाठी तयार होतात आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये UPI किंवा QR कोड या मार्फत रक्कम चुकती करणाऱ्या शहरी ग्राहक वाढतात. त्याचप्रमाणे रोख रकमेवरचे अवलंबित्व कमी होते.

बाजारपेठेचे सहाय्य :-कारागिरांना बाजारपेठेचे सहाय्य पुढील मार्गाने मिळते

  • दर्जाचे प्रमाणपत्र
  • जत्रा प्रदर्शन किंवा व्यापारी शो मधून बाजारपेठेची बंध तयार होतात.
  • त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग आणि प्रचार, जाहिरात, प्रसिद्धी तसेच त्यांना GeM सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जोडणे आणि इतर विपणन उपक्रम राबविणे.
  • यामुळे त्यांना ग्राहकांचा व्यापक आधार मिळतो, त्यांच्या ब्रँडची ओळख निर्माण होते आणि सांस्कृतिक मान्यता मिळते.

वरील लाभांव्यतिरिक्त, कारागिरांना उद्योजक म्हणून उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म (Udyam Assist Platform) वर नोंदणी करताना देखील मदत केली जाते. हा प्लॅटफॉर्म सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSME) विकसित केलेली ऑनलाइन प्रणाली आहे, ज्याद्वारे अनौपचारिक सूक्ष्म उद्योगांची नोंदणी केली जाते आणि त्यांना उद्यम नोंदणी क्रमांक तसेच प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

कौशल्याचे यशात परिवर्तन : विश्वकर्मा प्रभाव

पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कारागिरांना पाठिंबा देणाऱ्या तसेच बळ देणाऱ्या सरकारने बदल घडवून आणण्यासाठी उचललेले पाऊल आहे. दोन वर्षांपूर्वी लागू झालेली ही योजना पाच वर्षात 30लाख प्रस्तावित लाभार्थी मिळवण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. ऑगस्ट 2025 रोजी यामध्ये 30 लाख कारागीर तसेच हस्तव्यवसायिकांनी नोंदणी केली होती याशिवाय 26 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी कौशल्य पडताळणी पूर्ण केली होती आणि त्यापैकी 86% नी त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले होते.

कुशल कामगारांना त्यांना थेट सुसज्ज करण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सामग्री प्रोत्साहन अनुदान म्हणून 23 लाख ई व्हाउचर दिली गेली.

व्यवसाय विकासासाठी सहाय्य म्हणून 4.5 लाख कर्जे मंजूर करण्यात आली आणि दोन्ही हप्ते धरून ₹ 41,188 कोटी मूल्यांचे कर्ज दिले गेले.

पीएम विश्वकर्मा योजना ही देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश सारख्या दक्षिणेकडची राज्ये ते राजस्थान किंवा महाराष्ट्रासारख्या पश्चिमेकडील राज्ये येथे मोठ्या संख्येने असलेल्या पारंपारिक कारागिरांच्या पोटापाण्याची काळजी घेत आहे. या योजनेने विविध उद्योगांमध्ये विश्वकर्मांना उदाहरणार्थ राज मिस्त्री म्हणजे गवंडी, शिंपी, फुलांचे हार बनवणारे, सुतार, पादत्राणे तयार करणारे अशा सर्वांना सामावून घेतले आहे. या योजने ते पारंपारिक व्यवसाय म्हणून सर्वात जास्त नोंदणी राजमिस्त्री या व्यवसायातून झाली आहे.

सर्वात जास्त नोंदणी झालेली राज्ये

सर्वात जास्त नोंदणी झालेले व्यवसाय

कर्नाटक

राजमिस्त्री (गवंडी)

महाराष्ट्र

शिंपी

मध्य प्रदेश

फुलांचे हार तयार करणारे

राजस्थान

सुतार

आंध्र प्रदेश

पादत्राणे तयार करणारे

 

बदलांचे ध्वनीचित्र :- खऱ्या खुऱ्या गोष्टी

 

अजय प्रकाश विश्वकर्मा हा उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या दरेखू गावातील सुतार तो त्याच्या मुळांना धरून आहे आणि त्याचा वाडवडिलांपासून चालत आलेला पारंपारिक व्यवसाय त्याने सुरू ठेवला आहे. आधुनिक साधने विकत घेऊन आपला व्यवसाय वाढवावा असे त्याचे स्वप्न होते परंतु स्थानिक कर्ज पुरवठादार आकारात असलेल्या कर्जाचा 15% ते 20 % व्याजदर या स्वप्नाला सत्यात येऊ देत नव्हता. तेव्हा त्याच्या जीवनात पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रवेश झाला आणि त्याला पाच टक्के व्याज दराने कर्ज मिळाले ज्यातून त्याने आधुनिक साधने विकत घेतली. त्याला ओळखपत्र, प्रमाणपत्र मिळाले तसेच छात्रवृत्तिसह पाच दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा मिळाले.

 

आसाम मध्ये नागाव येथे असलेली रशिदा खातून ही स्त्री चटया बनवते आणि आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने काम करत छोटासा व्यवसाय सांभाळत आहे पीएम विश्वकर्मा योजनेतून तिला सात दिवसांचे प्रशिक्षण आणि एक लाख रुपयांचे कर्ज मिळाले ज्यामुळे तिला तिच्या कामात वाढ करता आली. आता कर्जाचे दोन हप्ते मिळाले आहेत आणि एक अजून येणे बाकी आहे. तिचा व्यवसाय हळूहळू वाढताना दिसत आहे. या योजनेमुळे तिच्या रोजगारातच वाढ झाली असे नव्हे तर तिच्या कुटुंबाला राहण्यासाठी घर , सुरक्षा आणि सन्मान मिळाला आहे.

 

बिहार येथील समस्तीपुर मध्ये सियाराम ठाकूर हा केश करताना कार त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत होता तो गेल्या 30 वर्षापासून या व्यवसायात आहे आणि ठीक ठिकाणी सायकलवर फिरवून तो काम शोधतो. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्याला केस कापणे आणि मसाज यासारख्या आधुनिक सलोन कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले आणि त्याला त्याचे स्वतःचे दुकान सुरू करता आले. या योजनेआधी घर खर्च चालवणे आणि मुलांना शिक्षण देणे यासाठी किती कष्ट करावे लागत होते ते त्याची बायको नूतनदेवी आठवून सांगते. आज सियाराम दिवसभरात पाचशे ते हजार रुपयांपर्यंत कमाई करतो आणि त्याला आपण स्थिर झाल्याची तसेच कुटुंबाला अधिक चांगले आयुष्य दिल्याची खात्री आहे.

 

आपल्याला भाग्य लाभले आहे अशी भावना असलेले हे लाभार्थी जीवन बदलणारी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहेत.

 

निष्कर्ष

पीएम विश्वकर्मा योजनेने कौशल्य असलेल्या लाभार्थ्यांना मान्यता, कौशल्य विकासाची संधी, कर्जाची सोय आणि विक्रीचे मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडे असलेली कौशल्ये आणि भावी संधी यांचा मेळ घालून दिला. या योजनेत असलेल्या सुविधाच्या व्याप्तीमुळे ही योजना देशाच्या विविध भागात राज्यांमध्ये पोहोचली असून 18 वेगवेगळ्या पारंपारिक व्यवसायांना मान्यता देणारी ही योजना आशादायक यश मिळवत आहे. कारागिरांचे उद्योजकांमध्ये रूपांतर तसेच त्यांना जागतिक मंच उपलब्ध करून देणे यामुळे हे विश्वकर्मा साथीदार आपल्या सामाजिक-आर्थिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.

 

संदर्भ

PMO

PM Vishwakarma YouTube Channel

Ministry of Micro, Small, and Medium Enterprises

Ministry of Skill Development and Entrepreneurship

Click here to see pdf

 

* * *

नेहा कुलकर्णी/विजया सहजराव/दर्शना राणे

(Explainer ID: 155956) आगंतुक पटल : 42
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Bengali
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate