• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Social Welfare

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

निराशेतून आशेचा किरण: एकत्रितपणे प्रयत्न करून आत्महत्यांना प्रतिबंध करणे

Posted On: 09 SEP 2025 7:06PM

नवी दिल्‍ली, 9 सप्‍टेंबर 2025

 

महत्त्वाचे मुद्दे

  • जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन(10 सप्टेंबर): जागतिक स्तरावर हा दिवस जनजागृती निर्माण करण्यासाठी,परानुभूती विकसित करण्यासाठी आणि आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी, सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पाळला जातो.
  • आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी भारताने आखलेली पहिली राष्ट्रीय रणनीती (2022): या बहु-क्षेत्रीय कृतीद्वारे 2030 पर्यंत आत्महत्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर 10% ने कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
  • राष्ट्रीय उपक्रम: टेलि-मानस (टेलीफोनवरून मानसिक आरोग्य सहाय्य आणि विविध राज्यांतून त्यांच्या जाळ्याचा{नेटवर्किंग}) विस्तार, डीएमएचपी (जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रम), आरकेएसके (राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रम), आणि मनोदर्पण सारखे कार्यक्रम हेल्पलाइनला, समुदाय जागरूकता उपक्रमांना आणि शाळा-आधारित समर्थनाला मजबूत करतात.

 

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणजे काय?

2003 पासून आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटनेद्वारे (IASP) जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पाळला जातो, ज्याचे सह-प्रायोजकत्व जागतिक आरोग्य संघटना (WHO) घेते. हा दिवस सरकार, संघटना आणि जनतेला एकाच संदेशाविषयी एकत्रित करतो, तो म्हणजे: आत्महत्येला प्रतिबंध करता येतो. आत्महत्येकडे पहायचा दृष्टिकोन बदलणे ही ,जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची त्रैवार्षिक वर्षांची (2024-2026) संकल्पना आहे. ही संकल्पना आपल्या सर्वांना आत्महत्या संदर्भात हानिकारक आख्यायिकांना आव्हान देण्याचे, कलंक कमी करण्याचे आणि आत्महत्येबद्दल, सहानुभूती बाळगत खुल्या संभाषणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करते.

या दिवसाचे महत्त्व अधिक आहे कारण,दरवर्षी जगभरात 7,27,000 हून अधिक लोक आत्महत्या करतात (2021 ची आकडेवारी), आणि प्रत्येक मृत्यूपूर्वी अंदाजे 20 वेळा आत्महत्येचे प्रयत्न केले जातात. 2021 मध्ये, जागतिक स्तरावर 15-29 वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण होते, ज्यामुळे व्यापक हस्तक्षेप करणाऱ्या धोरणांची तातडीची गरज अधोरेखित होते.

 

भारतातील आत्महत्या: तीव्रता, कल आणि प्रमुख लोकसंख्याशास्त्रीय अनुमान

दरवर्षी जगभरात होणाऱ्या महिलांच्या आत्महत्यांपैकी एक तृतीयांश महिलांच्या तर एक चतुर्थांश पुरुषांच्या आत्महत्या भारतात होतात. भारतात दरवर्षी सरासरी 100,000 हून अधिक लोक आत्महत्येमुळे जीव गमावतात. याची कारणे पुढीलप्रमाणे:

  • एकूण प्रमाण: भारतात, राष्ट्रीय गुन्हे नोंद निदेशालयाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, 2017 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 9.9 वरून 2022 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 12.4 पर्यंत आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने आणि चिंताजनक रित्या वाढलेले आहे.
  • भौगोलिक फरक: आत्महत्येचे प्रमाण राज्यांनुसार वेगवेगळे आहे, बिहारमध्ये प्रति 100,000 लोकसंख्येमागे 0.6, सिक्कीममध्ये प्रति 100,000 लोकसंख्येमागे 43.1 पर्यंत,तर दक्षिणेकडील विजयवाडा (प्रति 100,000 लोकसंख्येमागे 42.6) आणि कोल्लम (प्रति100,000 लोकसंख्येमागे ४२.५) या शहरांमध्ये 2022 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे नोंदवले गेले.

  

 

दिल्ली मेट्रोने 2024 मधे आयोजित केलेल्या मोहिमेअंतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पाळण्यात आला.

2024 मध्ये, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त एक विशेष जागरूकता मोहीम सुरू केली. मानसिक आरोग्याच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या व्यक्तींविषयी अधिक समज, सहानुभूती बाळंतपणे आणि त्यांना आधार देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

मोहिमेचा एक भाग म्हणून, डीएमआरसीने दिल्लीतील प्रमुख मेट्रो स्थानकांवर,आशा आणि जीवनात धैर्य आणि चिकाटी वाढविण्याचे संदेश देणारी भित्तिपत्रके आणि डिजिटल फलक लावले होते. मानसिक आरोग्याविषयीची आस्था बाळगून सामाजिक माध्यमांवरही खुली चर्चा होत ही मोहीम अधिकच विस्तारली.

दृकश्राव्य आणि डिजिटल दोन्ही माध्यमांद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचत, 2024 च्या मोहिमेने मानसिक आरोग्याच्या महत्त्वाला आधार देणारे वातावरण निर्माण करण्याची आणि जागरूकता पसरवण्याची डीएमआरसीची वचनबद्धता आणखी बळकट केली.

 

मनोदर्पण उपक्रम

मनोदर्पण हा आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि भावनिक कल्याणासाठी मानसिक-सामाजिक आधार प्रदान करणारा शिक्षण मंत्रालयाचा (पूर्वीच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा) एक देशव्यापी उपक्रम आहे.

या उपक्रमाचे प्रमुख घटक पुढे दिले आहेत:

  • वेब पोर्टल: संसाधने, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, भित्तिपत्रके, व्हिडिओज आणि मानसिक आरोग्यासाठी टिप्स.
  • 24×7 टोल-फ्री हेल्पलाइन (8448440632): प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांकडून फोनवरून-समुपदेशन.
  • समुपदेशक सूची: शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील समुपदेशकांचा राष्ट्रीय डेटाबेस.
  • प्रकाशने: चिकाटी आणि जीवन कौशल्ये निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकात उपयुक्त पडणाऱ्या कौशल्यांचे मार्गदर्शनपर पुस्तक.
  • परस्परसंवादी मंच: मानसिक आधारासाठी ऑनलाइन साधने, चॅटबॉट्स आणि ॲप्स

 

तुम्ही कशी मदत करू शकता

पुढे जाण्याचा मार्ग

भारत विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या प्रतिबंधक क्षेत्रात काम करत आहे. 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाचे (NSPS) उद्दिष्ट 2030 पर्यंत आत्महत्या मृत्युदर 10% ने कमी करणे आहे. प्रवेश वाढविण्यासाठी, टेली-मानस हेल्पलाइन आता 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 53 कक्ष चालवते, ज्यामध्ये दहा लाखांहून अधिक फोनकॉल्स हाताळले जातात, तर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत (DMHP) 767 जिल्ह्यांतील समुदायांची- संकटकाळात काळजी घेतली जाते. भारतातील एम्स (AIIMS) उत्कृष्टता केंद्रे आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील क्षमता विकसित करण्यासोबतच 1.78 लाखांहून अधिक आयुष्यमान आरोग्य मंदिरांमधून मानसिक आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आला आहे. युवावर्गासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), शालेय आरोग्य कल्याण आणि उपक्रम आणि मनोदर्पण उपक्रम शाळा आणि समाजांत महत्त्वपूर्ण आधार देतात.सर्व मिळून असे प्रयत्न मानसिक आरोग्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आत्महत्यांना प्रतिबंध करता भारताच्या समग्र,बहुस्तरीय दृष्टिकोनाला अधोरेखित करतात.

 

संदर्भ

पत्र सूचना कार्यालय (PIB)

शिक्षण मंत्रालय

दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयुक्तालय

आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संस्था

जागतिक आरोग्य संघटना

 

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

(Backgrounder ID: 155887) आगंतुक पटल : 26
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate