Technology
संचार साथी अॅप: नागरिकांच्या हातात दूरसंचार सक्षमीकरण
पारदर्शक आणि सुरक्षित मोबाइल सेवा वाढविण्यासाठी जानेवारी 2025 मध्ये ॲपचा प्रारंभ
Posted On:
08 SEP 2025 2:44PM
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
|
महत्त्वाचे मुद्दे
- 17 जानेवारी 2025 रोजी प्रारंभ झाल्यापासून, ऑगस्ट 2025 पर्यंत संचार साथी मोबाईल अॅप 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले.
- संचार साथी लाईव्ह डॅशबोर्डवरून 37.28 लाखांहून अधिक चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल डिव्हाइस यशस्वीरित्या ब्लॉक करण्यात आले आहेत आणि 22.76 लाखांहून अधिक डिव्हाइसेस शोधण्यात आले आहेत.
|
संचार साथी मोबाईल अॅप: भारतातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना योग्य वेळी उत्तर
एक अब्जाहून अधिक ग्राहकांसह, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे दूरसंचार क्षेत्र म्हणून उदयास आला आहे. मोबाइल फोन आता बँकिंग, मनोरंजन, ई-लर्निंग, आरोग्यसेवा आणि शासकीय सेवांसाठी महत्त्वाचे माध्यम म्हणून काम करतात, त्यामुळे मुळे मोबाइल सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे.
वाढत्या सायबर धोक्यांमुळे मोबाईल वापरकर्त्यांचे संरक्षण करणे ही राष्ट्रीय चिंतेची बाब बनली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) अर्थात भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 15,92,917 सायबर गुन्ह्याच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या, 2024 मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढून त्या 20,41,360 वर पोहोचल्या. केवळ राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल वरच 2024 मध्ये 1,23,672 डिजिटल अटक घोटाळे आणि संबंधित सायबर गुन्हे नोंदवले गेले, तर फेब्रुवारी 2025 पर्यंत 17,718 नवी प्रकरणे समोर आली आहेत.
या वाढत्या धोक्यांना लक्षात घेत, दूरसंचार विभागाने (DoT) संचार साथी मोबाइल ॲप सादर केले - हे एक नागरिक-केंद्रित साधन जे मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्याची क्षमता थेट वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देते. हे ॲप विद्यमान संचार साथी पोर्टलला पूरक असून वापरकर्त्यांना ओळख चोरी, बनावट केवायसी, मोबाईल चोरी, बँकिंग फसवणूक आणि इतर सायबर जोखमींपासून सोयीस्कर, सतत आणि तात्काळ संरक्षण देते.

या सक्रिय उपक्रमाने आधीच आधीच उल्लेखनीय परिणाम साधले आहेत: 3 कोटींहून अधिक बनावट मोबाइल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत, 3.19 लाख डिव्हाइस ब्लॉक करण्यात आले आहेत, 16.97 लाख व्हॉट्सॲप अकाउंट बंद करण्यात आले आहेत आणि बल्क एसएमएस पाठविणाऱ्या 20,000 हून अधिक जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे दूरसंचार-संबंधित फसवणुकीला लक्षणीयरीत्या आळा बसला आहे आणि देशभरातील वापरकर्त्यांची सुरक्षा वाढली आहे.
नागरिकांना वापरण्यास सोपी साधने आणि महत्त्वाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये रिअल-टाइम प्रवेश देत सक्षम करून, संचार साथी मोबाइल ॲप भारतातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांना योग्य वेळी आणि प्रभावी उत्तर देणारा उपक्रम ठरला आहे.

हे ॲप्लिकेशन हिंदी आणि इतर 21 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ते समावेशक आणि देशभरातील नागरिकांसाठी सुलभ बनले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे ॲप लाँच झाल्यापासून 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

संचार साथी द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या नागरिक-केंद्रित सेवा
संचार साथी मोबाइल ॲप पोर्टलच्या सर्व नागरिक-केंद्रित सेवा थेट वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर आणते, ज्यामध्ये सुरक्षा, पडताळणी आणि फसवणूक-तक्रार नोंदणी यासारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

संचार साथी ॲपमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:
चक्षू - हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना संशयस्पद फसवणूक करणारे कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश याबाबत तक्रार करण्यास सक्षम करते - विशेषतः केवायसी-अपडेटिंग घोटाळे. या सक्रिय तक्रार प्रणालीमुळे दूरसंचार विभागाला बनावट केवायसी आणि ओळख चोरीच्या प्रकरणांवर देखरेख करण्यास आणि जलद कारवाई करण्यास मदत होते आणि नागरिकांना अनावश्यक व्यावसायिक संदेश (UCC) नोंदवण्यास प्रोत्साहित केले जाते.

आयएमईआय ट्रॅकिंग आणि ब्लॉकिंग - हे फिचर भारतात कुठेही हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोन शोधण्याची आणि ब्लॉक करण्याची सुविधा प्रदान करते. ते चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या डिव्हाइसेसचा शोध घेण्यात पोलिस अधिकाऱ्यांना मदत करते, बनावट फोन काळ्या बाजारात जाण्यापासून रोखते आणि डिव्हाइस क्लोनिंगच्या प्रयत्नांना ब्लॉक करते.
आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे - मोबाइल कनेक्शनची संख्या पडताळणी करण्याचा पर्याय. वापर करताना त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन नोंदवलेले आहेत हे पाण्याची सुविधा मिळते आणि जर कोणी बनावट केवायसी तपशीलांचा वापर करून संशयास्पद कनेक्शन घेतल्याचे आढळले तर वापरकर्ता त्वरित तक्रार करू शकतो आणि तो नंबर ब्लॉक करू शकतो.
- आपल्या मोबाईल हँडसेटची वास्तविकता जाणून घेणे (नो युवर मोबाइल हँडसेट) - खरेदी केलेले मोबाइल डिव्हाइस खरे आहे की नाही हे पडताळण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करते.
- भारतीय नंबरसह आंतरराष्ट्रीय कॉल्सची तक्रार करणे - या फीचर द्वारे नागरिक +91 (देश कोड नंतर 10 अंकी नंबर) ने सुरू होणारे पण प्रत्यक्षात परदेशातून केलेले कॉल रिपोर्ट करू शकतात. अशा प्रकारचे कॉल बेकायदेशीर परदेशी दूरसंचार सेटअप मधून केलेली असतात.
- तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याला जाणून घ्या - वापरकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रातील वायरलाइन इंटरनेट सेवा प्रदात्यांचे तपशील तपासू देते. वापरकर्ता पिन कोड, पत्ता किंवा आयएसपीचे नाव टाकून ही माहिती सहज पाहू शकतो.
हा उपक्रम नागरिकांना त्यांची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी आणि टेलिकॉम फसवणुकीचा सामना करण्यासाठी सक्षम करून दूरसंचार सुरक्षा मजबूत करतो. संचार साथी वापरकर्त्यांना एका बटणाच्या क्लिकवर स्पॅम आणि फसव्या कॉल आणि संदेशांची तक्रार करण्यास सक्षम करून ट्रायच्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन्स (TCCCPR) च्या अंमलबजावणीला देखील पाठिंबा देतो.
|
सायबर गुन्हे म्हणजे “कोणताही बेकायदेशीर कृत्ये जिथे संगणक, संदेश उपकरण किंवा संगणक नेटवर्कचा वापर गुन्हा करण्यासाठी किंवा गुन्हा सुलभ करण्यासाठी केला जातो”.
|
वापरकर्ता सक्षमीकरण
संचार साथी उपक्रम हा जन भागिदारी - म्हणजेच प्रशासनात लोकांचा सहभाग - याचे उत्तम उदाहरण आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यात वापरकर्त्याकडून आलेले अहवाल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दूरसंचार विभाग या अहवालांवर जलदगतीने कारवाई करत राहतो आणि पोर्टलवरील डॅशबोर्ड द्वारे नागरिकांना पारदर्शक माहिती दिली जाते.
गोपनीयता आणि सुरक्षा
हे ॲप वापरकर्त्याचा डेटा आणि गोपनीयतेचे संरक्षण करताना दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे ॲप माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा) चे पूर्ण पालन करते, जो सायबर गुन्हे, ई-कॉमर्स, सुरक्षित डेटा प्रसारण आणि डेटा गोपनीयतेचे नियमन करणारा भारताचा प्रमुख कायदा आहे. हे कायदेशीर चौकटीत हॅकिंग आणि डेटा चोरी यासारख्या गुन्ह्यांची व्याख्या आणि दंड निश्चित केलेला आहे.
संचार साथी वापरकर्त्याच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेली किमान वैयक्तिक माहिती गोळा करते. हे ॲप प्लॅटफॉर्म व्यावसायिक मार्केटिंगसाठी प्रोफाइल तयार करत नाही किंवा ते तृतीय पक्षांसोबत वापरकर्ता डेटा शेअर करत नाही. कायदेशीररित्या आवश्यक असल्यास डेटा शेअरिंग कायद्याच्या अंमलबजावणीपुरते मर्यादित आहे, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश आणि डेटाच्या गैरवापरापासून वापरकर्त्यांना संरक्षण मिळते.

प्लॅटफॉर्मच्या गोपनीयता पद्धती डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 (डीपीडीपी कायदा) शी पूर्णपणे सुसंगत आहेत. हा कायदा वैयक्तिक नियंत्रण, पारदर्शकता आणि जबाबदारीवर भर देते. संचार साथी ॲप केवळ कायदेशीर उद्देशांसाठीच डेटा संकलन मर्यादित करते, किमान माहितीच नोंदवते, आणि स्पष्ट संमती यंत्रणा लागू करते.
निष्कर्ष
संचार साथी ॲप भारताच्या वाढत्या दूरसंचार परिसंस्थेला सुरक्षित करण्यासाठी एक शक्तिशाली आणि प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहे. हरवलेले हँडसेट ब्लॉक करणे, फसवणूक नोंदवणे, मोबाइल कनेक्शनची पडताळणी करणे आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे रक्षण करणे यासारख्या सेवा एकत्रित करून, ते नागरिकांना त्यांची डिजिटल ओळख सहजतेने संरक्षित करण्यास सक्षम करते. त्याची अनेक भाषांमधील उपलब्धता, सायबर कायद्यांशी सुसंगती आणि मजबूत गोपनीयता सुरक्षा उपाय यामुळे हे ॲप समावेशक, विश्वासार्ह आणि नागरिक केंद्रित बनले आहे. जसजसे हे ॲप स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे तसे संचार साथी ॲप केवळ दूरसंचार फसवणूक कमी करत नाही तर डिजिटल आत्मविश्वास वाढवत आहे आणि भारतातील मोबाइल वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित, नागरिक-केंद्रित भविष्य घडवत आहे.
संदर्भ
दूरसंचार मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गृहमंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
(Explainer ID: 155885)
आगंतुक पटल : 49
Provide suggestions / comments