Social Welfare
भारत योग्य आहार घ्या : सर्वांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी आणि शाश्वत आहार
Posted On:
09 JUL 2025 11:20AM
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
| मुख्य निष्कर्ष |
- 6 जुलै 2025 पर्यंत, खाद्यान्न सुरक्षितता प्रशिक्षण आणि प्रमाणिकरणाअंतर्गत (FoSTaC) 12 लाखाहून अधिक खाद्यान्न व्यावसायिकांना (food handlers) प्रशिक्षण दिले गेले आहे. देशभरातील 284 ईट राईट स्टेशन्स अर्थात योग्य आहार स्थानके, 249 क्लीन स्ट्रीट फूड हब्स अर्थात स्वच्छ खाद्यान्न फेरीवाल्या केंद्रांना प्रमाणित केले गेले आहे.
- 6 जुलै 2025 पर्यंत, पुनर्वापरासाठीचे वापरात आणलेले 55 लाखांहून अधिक खाद्यतेल संकलित केले गेले, त्यापैकी 39 लाखा लिटर तेलाचे जैवडिझेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
- भारत योग्य आहार घ्याची संकल्पना आणि उपक्रमांची द रॉकफेलर फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे.
|
प्रस्तावना
"आपल्या क्षमता आणि प्रतिभेचा विकास करण्यासाठी, आपण सर्वप्रथम आपल्या तंदुरुस्ती आणि आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी मी दिलेला सल्ला तुम्हाला आठवतो का? आहारातील तेलाचे प्रमाण 10% ने कमी करा, अतिरिक्त वजन कमी करा. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त असाल, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुपरहिट व्हाल", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून 2025 रोजीच्या मन की बात मधून सांगितले होते.
पंतप्रधानांनी लोकांना आरोग्यदायी आहार पद्धती स्वीकारावी आणि आपल्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच आहाराशी संबंधित आरोग्य विषयक समस्यांवरचा उपाय म्हणून तेल आणि अपायकारक अन्नपदार्थांचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगानेच गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारद्वारा राबवले जात असलेले विविध उपक्रमांच्या माध्यमातून आहार विषयक सार्वजनिक आरोग्य परिसंस्थेत यशस्वीरित्या सुधारणा घडवून आणल्या जात आहेत.
भारत योग्य आहार घ्या (Eat Right India)
सात वर्षांपूर्वी, जुलै 2018 मध्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारत योग्य आहार घ्या हा उपक्रम सुरू केला. सुरक्षित, आरोग्यदायी आणि शाश्वत खाद्यान्न प्रक्रियेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत नियमन, क्षमता-निर्माण, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या आणि सक्षमीकरणासारख्या विविध उपयाययोजनांच्या माध्यमातून खाद्यान्न पिकांचे उत्पादन घेणे अथवा ते इतर मार्गांनी मिळवण्यापासून ते खाद्दान्न शिजवून लोकांच्या ताटात पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरील, लोकांच्या दैनंदिन अन्नसेवनाची गुणवत्ता वाढवली जात आहे.
ही मोहीम भारतासमोरील आहार विषयक आव्हानांच्या विविध पैलूंवर उपाययोजना राबवण्यासाठीच्या तीन मूलभूत स्तंभांवर आधारलेली आहे:

या विस्तृत उपक्रमाअंतर्गत अभिनव दृष्टिकोनातून राबवल्या जात असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांचा समावेष केला गेला आहे. जागतिक पातळीवर रॉकफेलर फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली आहे. भारतातील खाद्यान्न व्यवसाय उद्योग आणि ग्राहकांनी या योजना आणि सर्वोत्तम पद्धतींसह, खाद्यान्न पुरवठा करणाऱ्या ठिकाणांवरील तसेच रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेसाठी गुणांकन, खाद्यतेलाचा पुनर्वापर आणि खाद्यान्न पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांना चालकांना (food business operators) प्रशिक्षणासारख्या उपाययोजनांचा सहजतेने अवलंब केला आहे. भारत योग्य आहार घ्या हा उपक्रम सुरू झाल्यापासून, उत्तम सामुदायिक आरोग्याच्या दृष्टीने देशाच्या खाद्यान्न विषयक परिसंस्थेत आमूलाग्र परिवर्तन होत असल्याचे दिसून आले आहे.
उद्दिष्ट्ये आणि सुसंगता
आधुनिक जीवनशैलीमुळे आहार पद्धती आणि अन्न सेवन पद्धतींमध्ये महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. परिणामी, पोषण, जीवनशैली-संबंधित आरोग्यविषयक स्थिती आणि खाद्यान्न सुरक्षिततेशी संबंधित समस्यांकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. भारतात, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आरोग्य विषयक समस्यांचा मोठा वाटा हा आहार विषयक घटकांशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे.
आहार विषयक या बदलत्या सवयी आणि त्याला जोडूनच सध्याच्या खाद्यान्न विषयक परिसंस्थेतील, अन्न सुरक्षिततेचा मुद्दाही ठळकपणे समोर आला आहे. सूक्ष्मजीवांमुळे होणारं दूषितीकरण, आणि कीटकनाशके, अवजड धातू या आणि अशा घटकांच्या माध्यमातून निघणारे रासायनिक अवशेषांमुळे खाद्यान्नाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतात. गेल्या काही दशकांतील आग्नेय आशिया क्षेत्रातील प्रादेशिक आकडेवारी पाहिली तर त्यातून विशेषतः मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध यांसारख्या असुरक्षित गटांसाठी खाद्यान्न विषयक स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे महत्व त्यातून अधोरेखित झाले असल्याचे दिसून येते.
पोषण, जीवनशैली आणि खादान्न सुरक्षितता या सर्वांचा एकत्रित विचार करता, संतुलित आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि सर्वांसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण सकस आहाराला पाठबळ देणाऱ्या व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे महत्वाचे ठरते.
अनुषंगानेच उपाययोजना म्हणून, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारत योग्य आहार घ्या'हा एक व्यापक देशव्यापी उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे केवळ खाद्यान्न हे सुरक्षिततेच्या दष्टीनेच नव्हे, तर पौष्टिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाश्वत असेल याची सुनिश्चिती करता येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना माहितीच्या आधारे खाद्यान्नाची निवड करण्याकरता सक्षम बनवले जात असून, त्याचवेळी, खाद्यान्न उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांना आपापला दर्जा सुधारण्यासाठी आणि अपायकारक घटकांचा वापर कमी करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.
भारत योग्य आहार घ्या हा उपक्रम म्हणजे केवळ एक सरकारी मोहीम नसून, एक लोक-केंद्रित चळवळ बनू लागली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा, कामाची ठिकाणे, बाजारपेठा आणि विविध समुदाय एकत्रितपणे आरोग्यदायी खाण्याची सवयींना एका सामूहिक सवयीचे रुप देऊ लागले आहेत. केवळ नियमन करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट नाही, तर त्या ही पलिकडे जात मानसिकता, वर्तन आणि एकूणच खाद्यान्न विषयक संस्कृतीत परिवर्तन घडवून आणणे असे व्यापक उद्दिष्ट या उपक्रमाअंतर्गत समोर ठेवले गेले आहे. हा उपक्र म्हणजे प्रत्येक भारतीयाला केवळ पोट भरण्यापुरते नाही तर पौष्टिक आणि विश्वाने खाता येईल असा आहार मिळावा यादृष्टीने सुरू केलेला एक प्रवास आहे.
प्रमुख मोहिमा आणि उपक्रम
भारत योग्य आहार घ्या ही चळवळ ही, खाद्यान्न विषयक संपूर्ण व्यवस्थेच्या पैलुंना स्पर्ष करणाऱ्या एका त्रि-सूत्रीय रणनीतीच्या आधारे गुंफली गेली आहे. ही त्रिसूत्री म्हणजे पुरवठ्या संदर्भातील दर्जात सुधारणा, ग्राहकांचे माहितीच्या आधारे निवड करतायेण्यायोग्य सक्षमीकरण करणे आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणे.
|
पुरवठा विषयक (Supply Side)
पुरवठ्याच्या संदर्भाने विचार केला तर, खाद्यान्न सुरक्षितता प्रशिक्षण आणि प्रमाणिकरणासारख्या (FoSTaC) उपक्रमांच्या माध्यमातून खाद्यान्नाची हाताळणी करणाऱ्यांना स्वच्छता आणि सुरक्षितेविषयीचे आवश्यक प्रशिक्षण आणि माहिती दिली जाते. स्वच्छता गुणांकन, भारत योग्य आहार स्थानके आणि स्वच्छ खाद्यान्न फेरीवाला केंद्र (Clean Street Food Hubs) यांसारख्या प्रमाणन योजनांच्या माध्यमातून लहान विक्रेत्यांपासून ते मोठ्या आस्थापनांपर्यंतच्या खाद्यान्न उद्योग क्षेत्रातील व्यवसायांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, ऑडिट अर्थात परीक्षण करून घेण्यासाठी तसेच खाद्यान्न विषयक सुरक्षित कार्यपद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
|
|
मागणी विषयक (Demand Side)
या चळवळीअंतर्गत आज से थोडा कम अर्थात आजपासून थोडं कमी यांसारख्या मोहिमांच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवली जात आहे, मीठ, साखर आणि चरबीचे सेवन कमी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच आपल्या अन्न साखळीतून औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या अपायकारत मेद वगळण्याच्या उद्देशाने Trans Fat-Free India अर्थात अपायकारक मेद मुक्त भारत ही मोहीमही राबवली जात आहे. शाळांमध्ये योग्य आहार (Eat Right School) या मोहिमेतून शालेय अभ्यासक्रमांमध्ये पोषण आणि खाद्यान्न सुरक्षिततेविषयीच्या शिक्षणाचा अंतर्भाव केला गेला तर, कॅम्पसमधील योग्य आहार (Eat Right Campus) या मोहिमेद्वारा कामाची ठिकाणे, रुग्णालये, महाविद्यालये आणि तुरुंगांमध्ये स्वच्छता, पौष्टिक आहार आणि शाश्वततेच्या मानकांची पूर्तता केली जात असल्या किंवा नसल्याबद्दलचे प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली गेली. डार्ट बुक (DART Book) फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स (Food Safety Magic Box) आणि फूड सेफ्टी ऑन व्हील्स व्हॅन्स (Food Safety on Wheels vans) यांसारख्या प्रचार प्रसार मोहिमांच्या माध्यमातून लोकांना सामान्य भेसळ ओळखण्यासाठी तसेच दैनंदिन खाद्यान्न सुरक्षिततेविषयीची समजून घेण्यासाठी सहकार्य पुरवले जात आहे.
|
|
शाश्वतता विषयक उपक्रम
शाश्वतता हा या चळवळीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यान्न उद्योग क्षेत्रातील व्यवसायांना आणि संस्थांना पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंगकडे वळण्याला, एकदाच वापरून फेकून द्याव्या लागण्याऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याला आणि विशेषतः कॅम्पस आणि बाजारपेठांसारख्या सार्वजनिक ठिकाणी खाद्यान्न विषयक कचऱ्याचे जबाबदारपूर्वक व्यवस्थापन करण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सुरक्षित आणि पौष्टिक आहार (SNF) हा संदेश घरे, शाळा आणि कामाच्या ठिकाणी पोहोचवला जात आहे, संतुलित आहार आणि स्वयंपाक सुरक्षित कार्यपद्धतींबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी सोपे सोपे सल्ले दिले जात आहेत, यासोबतच खाद्यान्न भेसळीविरोधात किल्लेबंदी (Food Fortification) यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून मीठ, तेल, दूध आणि पीठ यांसारख्या सूक्ष्मपोषक - समृद्ध अशा प्रमुख खाद्यान्नांचा पुरस्कार केला जात आहे. घ मुख्य अन्नपदार्थांना समर्थन देतो, यामुळे लोकांमधील सुप्त कुपोषणाची (hidden hunger) समस्या दूर होण्यातही मोठी मदत होते आहे.
|
अलीकडील धोरणात्मक उपाययोजना आणि नवीन उपक्रम (2024 - 2025)
लठ्ठपणाला प्रतिबंध मोहीम (2025): केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी 7 जून 2025 रोजी अर्थात जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे औचित्य साधून, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI)ची लठ्ठपणाला प्रतिबंध (Stop Obesity) या मोहीमेचा प्रारंभ केला. या मोहिमेअंतर्गत आपल्या आहारात मीठ आणि तेलाचा वापर 10% ने कमी करण्याचे राष्ट्रव्यापी आवाहन केले गेले.
मायक्रोप्लास्टिक्स संशोधन उपक्रम (2024): भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मार्च 2024 मध्ये मायक्रो- आणि नॅनो-प्लास्टिक्स हे अन्न दूषितकरणारे उदयोजन्मुख घटक आहेत, (Micro-and Nano-Plastics as Emerging Food Contaminants) या संबंधीचा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) अखत्यारितील भारतीय विषशास्त्र संशोधन संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अखत्यारितील केंद्रीय मत्स्योत्पादन तंत्रज्ञान संस्था तसेच बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरु केला गेला. मानक कार्यपद्धतीचे स्थापन करणे आणि परिणामकारकतेविषयीचा माहितीसाठा (exposure data) तयार करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
'भारत योग्य आहार घ्या' चळवळीचे इतर प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे:
- योग्य आहार खाद्यान्न फेरीवाला केंद्रे (Eat Right Street Food Hub)
- योग्य आहार स्थानक (Eat Right Station)
- कॅम्पसमध्ये योग्य आहार
- योग्य आहार फळे आणि भाजीपाला बाजार
- योग्य आहार प्रार्थना स्थळे
- शाळांमध्ये योग्य आहार
- मेद, साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करणे
- 2022 पर्यंत अपायकारक मेद मुक्त भारत @75
- खाद्यान्न भेसळीविरोधात किल्लेबंदी (Fortification)
- स्वच्छताविषयक गुणांकन
- भेसळ प्रतिबंधक जैविक भारत
- अन्न वाचवा, अन्न वाटून घ्या
- सुरक्षित शाश्वत पॅकेजिंग
- वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर
योग्य आहार घ्या या चळवळी अंतर्गत राबवल्या जात असलेल्या इतर उपक्रमांमध्ये खाली नमूद उपक्रमांचा समावेश आहे.
घेतली गेलेली दखल आणि पुरस्कार
भारत योग्य आहार घ्या या उपक्रमाअंतर्गतची दूरदृष्टी, व्याप्ती आणि दृष्टिकोनासाठी, या उपक्रमाची या आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी दखल घेतली गेली आहे.
2050 पर्यंतच्या एका पुनरुत्पादक आणि सकस खाद्यान्न व्यवस्थेची संकल्पना मांडल्याबद्दल. रॉकफेलर फाउंडेशनने या मोहिमेची, फूड सिस्टीम्स व्हिजन प्राईझ साठी 2021 मधील दूरदृष्टीने आखलेल्या सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक म्हणून दखल घेतली आहे. या पुरस्कारासाठी 110 देशांतील 1300 हून अधिक उपक्रमांच्या प्रवेशिका आल्या होत्या, त्यातून या मोहीमेची निवड केली गेली होती. खाद्यान्न व्यवस्थेशी संबंधित जागतिक चर्चेला चालना देणे आणि समुदायांना त्यांच्या भविष्यासाठी कृती करण्यायोग्य योजना तयार करण्याच्यादृष्टीने सक्षम करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
स्कोच प्लॅटिनम पुरस्कार 2017 अंतर्गतही, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) भारतायी खाद्यान्न सामायिकरण आघाडीने (IFSA - Indian Food Sharing Alliance) खाद्यान्नविषयक कचरा कमी करण्यासोबतच, खाद्यान्नाची अतिरिक्तता आणि अन्न असुरक्षिततेमधील मोठी दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाधारीत उपाययोजनांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. या उपक्रमामुळे 50 दशलक्षापेक्षा जास्त जणांपर्यंत अन्नदान पोहचवणे शक्य झाले आहे.
भारतातून 2022 पर्यंत अपायकार मेदापासून मुक्त मिळवण्याच्या उद्देशाने 2022 मध्ये हार्ट अटॅक रिवाइंड ही मोहिम सुरू केली गेली. या मोहीमेच्या माध्यमातून 34.9 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून जागृती केली गेली. यासोबतच भारतातील भारतातील वनस्पती तूप उत्पादक अर्थात डालडा उत्पादक संघटना आणि इतर प्रमुख उद्योग संघटनांकडूनही वचनबद्धतेची हमी या मोहिमेअंतर्गत घेतली गेली आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने भारताचा अपायकारक मेदापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम कार्यपद्धती अमलात आणणाऱ्या जगभरातील 44 देशांमधली एक देश म्हणून विशेष उल्लेख केला आहे.
भागीदारांचा सहभाग
ईट राईट इंडिया मोहिमेचे यश हे अन्न सुरक्षा, पोष आणि शाश्वतता यांसाठी विविध भागीदारांना एकत्रित आणण्याच्या क्षमतेमध्ये आहे. कोणतीही एक संस्था एकट्याने व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणू शकत नाही हे लक्षात घेऊन या मोहिमेमध्ये संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज यांच्या सहयोगी दृष्टीकोनाचा स्वीकार करते. केंद्रीय मंत्रालये आणि राज्य प्राधिकरणांपासून ते खासगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था आणि नागरी समूह, यांसारख्या भागीदारांचे विस्तृत जाळे धोरणाचे कृतीत परिवर्तन करण्यासाठी एकत्रित विणले गेले आहे. या बहुस्तरीय सहभागामुळे केवळ मजबूत अंमलबजावणी सुनिश्चित होत नाही तर भारताच्या जटील आहार परिसंस्थेत सामायिक जबाबदारी आणि सामूहीक स्वामित्व देखील जपते.
1) संपूर्ण सरकार
2) खाजगी क्षेत्र सहभाग
3) सार्वजनिक- खाजगी भागीदारी
4) इतर संस्था
संपूर्ण सरकार गुंतवणूक: संपूर्ण सरकारचा सहभाग हा ईट राईट इंडिया मोहिमेचा कणा आहे. आय़ुषमान भारत, पोषण अभियान आणि स्वच्छ भारत मिश सारख्या प्रमुख कार्यक्रमांना, हा उपक्रम जोडण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAI ने आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, गृहनिर्माण आणि शहरी विकास आणि शिक्षण सारख्या प्रमुख मंत्रणालयांना एकत्र आणले आहे. राज्य आणि स्थानिक पातळ्यांवर, अन्न सुरक्षा विभाग आणि नगरपालिका संस्था, आहार केंद्र आणि नगरपालिका संस्थांमध्ये प्रमाणीकरण योजना, लेखापरीक्षण, समुदाय संपर्क लागू करतात.
भागीदारी आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी CSR अंतर्गत खाजगी क्षेत्र यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मोठ्या उत्पादकांपासून ते रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांपर्यंत खाद्य व्यावसायिकांशी नियंत्रित स्वयंसेवी सहकार्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि आवारात उत्पादनांमध्ये सुधारणा, स्वच्छता दर्जा सुधारणे आणि प्रमाणन यांना प्रोत्साहन मिळाले आहे. द कॉर्पोरेट फॉर ईट राईट इंडिया (C4ERI)या मंचामुळे खासगी संस्थांना पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि स्वस्थ भारत यात्रा सायक्लोथॉन सारख्या जनजागृती उपक्रमांना प्रोत्साहन देता येते.
सार्वजनिक- खासगी आणि तृतीय पक्षाच्या भागीदारीमुळे क्षमता आणि आवाका भक्कम होतो. 220 बाह्य प्रशिक्षण भागीदारांसह आणि 2000 हून अधिक प्रमाणित प्रशिक्षक FoSTaC रचना प्रदान करणे आणि फिरत्या प्रयोग शाळा (अन्नसुरक्षा ऑन व्हील्स) आणि राष्ट्रीय खाद्य परीक्षण प्रयोगशाळांसारख्या स्थिर प्रयोगशाळांच्या माध्यमातून खाद्यान्न परीक्षण करणाऱ्या प्रयोगशाळांच्या मदतीने, हा उपक्रम स्वच्छता निकषांना समर्थन देण्यासाठी लेखापरीक्षक आणि व्यावसायिक संस्था स्थापित करतो.
शैक्षणिक, नागरी समाज आणि विकास भागीदार हे तळागाळातील विकासावर प्रभाव टाकतात. विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्था अन्नसुरक्षा अधिकारी आणि ईट राईट स्कूल मॉड्यूलच्या अभ्यासक्रम विकासात योगदान देतात. बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था आणि ग्राहक समूह असुरक्षित समुदायांपर्यंत पोहोचण्यात मदत करतात तर विकाससंस्था तांत्रिक मार्गदर्शन आणि मूल्यांकन साधने देतात ज्यामधून सामायिक मालकी आणि दीर्घकालीन वर्तनात्मक बदल सक्षम करणारी सहभागी परिसंस्था निर्माण करतात.
राष्ट्रीय व जागतिक उद्धीष्टांप्रती सुसंगत
ईट राईट इंडिया पुढाकार हा दोन्ही भारताच्या राष्ट्रीय विकास प्राधान्यांशी आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दीष्टांतर्गत (SDGs) असलेल्या जागतिक वचनबद्धता या दोन्हींशी जुळवून घेणारा आगळा उपक्रम आहे. एकाकीपणे कार्यरत राहाण्यापेक्षा, आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि शाश्वत विकास यांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या विद्यमान सरकारी योजनांसाठी पूरक आणि बळकटी देणारा आहे.
अन्न सुरक्षा, पोषण जागृती आणि पर्यावरणीय जबाबदारी हे सर्व एकाच मोहिमेत एकत्रित आणत, ईट राईट इंडिया संपूर्ण सरकारच्या, संपूर्ण समाजाच्या व्यवस्था बदलाच्या दृष्टीकोनाला समर्थन देत अधिक निरोगी, लवचिक राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व मंत्रालये आणि क्षेत्रांना एकत्र आणते.
जागतिक स्तरावर, विविध शाश्वत विकास उद्दीष्टांमध्ये (SDGs) या उपक्रमाचे योगदान आहे.
SDG2: भूक
यामध्ये कुपोषणाकडे लक्ष दिले जाते आणि पोषणमूल्ययुक्त आणि निरोगी आहाराला प्रोत्साहन
SDG3: उत्तम आरोग्य आणि कल्याण
खाद्यान्ननिर्मित आजारआणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य आजारांचे ओझे कमी करणे
SDG 12: जबाबदार वापर आणि उत्पादन
खाद्यान्न कचरा कमी करणे, शाश्वत अन्न निवड आणि पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन देणे
SDG 17: उद्दीष्टांसाठी भागीदारी
सरकारी संस्था, खाद्यान्न व्यावसायिक, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज यांच्यातील सहकार्याला चालना देणे
राष्ट्रीय पातळीवर, ईट राईट इंडियाने विविध प्रमुख कार्यक्रमांच्या परिणामकारतेत वृद्धी केली आहे:
- आयुष्मान भारत योजना
- पोषण अभियान
- अँनिमियामुक्त भारत
- स्वच्छ भारत मिशन
निरोगी आहार आणि अन्न वातावरणाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देऊन आयुष्मान भारत योजनेशी (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) सुसंगत आहे.
समुदाय-आधारित पोषण प्रयत्नांना बळकटी देऊन आणि सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेला दूर करून पोषण अभियान आणि रक्तक्षय मुक्त भारत(अँनिमियामुक्त भारत) (महिला आणि बालविकास मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) यांना पूरक आहे.
सार्वजनिक संस्था आणि बाजारपेठांमध्ये स्वच्छ अन्न पद्धती आणि स्वच्छ, सुरक्षित खाण्याच्या जागांचा पुरस्कार करून हा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाच्या (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय) उद्दिष्टांना देखील समर्थन देतो.
सार्वजनिक आरोग्य, आहार नियमन, नागरी सहभाग आणि पर्यावरणीय उद्दीष्ट्ये एकत्र आणत ईट राईट इंडिया उपक्रम एक श्रेणीबद्ध आणि पुनरावृत्ती करण्यायोग्य आराखडा सादर करते. केवळ 2030 सालापर्यंतच्या उद्दीष्टाकडे वाटचाल करण्याच्या भारताच्या प्रवासाला पाठिंबा देत नाही तर इतर राष्ट्रांना निरोगी आणि अधिक आरोग्यदायी जीवनशैलीचा शोध घेण्यासाठी लक्षवेधी आराखडा प्रदान करते.
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
भारताच्या वैविध्यपूर्ण परिसंस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAIकडून अत्याधुनिक डिजीटल पायाभूत सुविधांचा वापर केला जातो. FoSCoS हा एक खिडकी डिजीटल मंच जगभरातल्या लाखो नोंदणीकृत व्यावसायिकांना परवाना, नोंदणी आणि सुलभ व्यवस्थापन प्रदान करतो. अन्न सुरक्षेसाठी फूड सेफ्टी कनेक्ट या मोबाईल अँपद्वारे निरीक्षक, ग्राहक आणि व्यवसाय यांना त्वरीत अहवाल देणे, अनुपालनाचा मागोवा आणि अभिप्राय जोडण्यासाठी तत्काळ परिसंस्था प्रदान करते. तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेव्यतिरिक्त हा उपक्रम ग्राहक आणि व्यवसायांपर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातील मानवी संपर्काचा वापर करतो.
दृष्टीकोन फूड सेफ्टी मित्र कार्यक्रमातून- डिजीटल मंचाद्वारे दुर्गम भागात पोहोचून शेवटच्या टोकापर्यंत अनुपालन सहाय्य पोहोचवण्यासाठी 62,000 हून अधिक लोकांची नोंदणी करणे. एलईडी स्क्रीनने सुसज्ज फिरत्या आहार चाचणी प्रयोगशाळा आणि स्थानिक प्रशिक्षण साधनांपासून ते FoSTaCप्रणालीपासून ते जैविक भारत पोर्टल (8 जुलैपर्यंत 1.4 दशलक्ष भेटींची नोंद)पर्यंत हा कार्यक्रम तांत्रिक साधनांचा मानव-केंद्रीत दृष्टीकोन दर्शवतो.
यशस्वी कामगिरी
ईट राईट इंडिया मोहिमेच्या प्रारंभापासून, ती जगातील सर्वात व्यापक अन्न सुरक्षा आणि पोषण पुढाकारांपैकी एक ठरली आहे. भक्कम संस्थांत्मक आराखडा आणि आंतरक्षेत्रीय सहकार्याच्या पाठिंब्यामुळे, या दृष्टीकोनाचे रुपांतर प्रत्यक्ष मोजता येणाऱ्या परिणामांमध्ये झाले आहे. संस्थात्मक आवार आणि रेल्वे स्थानकांचे 'ईट राईट' क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यापासून ते लाखो खाद्यान्न निर्मात्यांचे प्रशिक्षण, एकत्रित लोकसहभाग आणि रस्त्यावरील खाद्यान्न जागा आणि मंदीर इथे स्वच्छतेला प्रोत्साहन देणे इथपर्यंत, या पुढाकाराची व्याप्ती, नवोन्मेष आणि सार्वजनिक आरोग्याविषयी वचनबद्धता उल्लेखनीय आहे. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये विविध कार्यक्रमांतर्गत साध्य केलेले प्रमुख टप्पे लक्षात येतील.
|
पुढाकार
|
प्रमुख मानके
|
व्याप्ती व परिणाम
|
|
FoSTaC प्रशिक्षण आणि प्रमाणन
|
25 लाख खाद्यान्न निर्मात्यांचे प्रशिक्षण, 62,000 हून अधिक वापरकर्त्यांची फूड सेफ्टी मित्र कार्यक्रमासाठी नोंदणी
|
65,600 हून अधिक प्रशिक्षणांचे यशस्वी आयोजन, 247 प्रशिक्षण भागीदारांकडून आहार मूल्य साखळीत 25 हून अधिक अभ्यासक्रम सादर.
|
|
रस्त्यावरील स्वच्छ खाद्यान्न जागा
|
249 केंद्रांचे प्रमाणन
|
15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्याप्ती.
|
|
ईट राईट स्थानके
|
284 स्थानकांचे ईट राईट स्थानके प्रमाणन
|
मुंबई सेंट्रल (पहिले) आणि दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल स्थानंकांसह, 23 राज्यांतील स्थानके.
|
|
स्वच्छता मानांकन योजना
|
75,300 हून अधिक खाद्यान्न व्यवसाय संचालकांचे अर्ज त्यापैकी 69,700 हून अधिक पूर्ण.
|
विविध उपहारगृह आणि व्यवसाय यांचा सहभाग
|
|
अन्नसुधारणा (F+)
|
157 पोषणमूल्यवर्धित उत्पादनांची शिफारस
|
114 कंपन्यांचा सहभाग, त्यापैकी 47% सर्वोच्च दहा खाद्यतेल कंपन्या आणि 36.6% दुग्धोत्पादन व्यवसाय.
|
|
RUCO- तेलाचा पुनर्वापर पुढाकार
|
55 लाख लीटर वापरलेले खाद्यतेल एकत्रीकरण
|
39 लाख लिटरपेक्षा जास्त बायोडिझेलचे उत्पादन आणि 53 बायोडिझेल उत्पादक, 12 साबण उत्पादकांची नोंदणी.
|
तेल, साखर आणि तेल घट करण्यात उद्योगांचा सहभाग
|
क्षेत्र
|
वचनबद्धता
|
|
खाद्यान्न उत्पादक, किरकोळ आणि ई-कॉमर्स
|
ब्रिटानिया, आयटीसी, नेस्ले, एचयूएल, बिकानेरवाला, हल्दीराम,अमेझॉन, झोमॅटो, बिग बास्केट, स्पेन्सर, आदींची या ध्येयाप्रती वचनबद्धता
|
निष्कर्ष
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला सक्रीय करण्याचे आणि आरोग्यदायी आहार आणि तंदुरूस्ती राखण्यासाठी सक्रीय कृती करण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने, ईट राईट उपक्रम अन्न पुरवठा साखळीतून लोकांनी सेवन केलेल्या आहाराची गुणवत्ता वृद्धींगत करणयासाठी कार्यरत आहे. नियामक, वैयक्तिक आणि सामुदायिक सहभागातून भारतातील आहार परिसंस्थेत परिवर्तन घडवून आणणे हे उद्दीष्ट आहे.
Click here to download PDF
* * *
Jaydebi PS/Tushar Pawar/Vijayalaxmi Salvi/Darshana Rane
(Backgrounder ID: 155617)
Visitor Counter : 5
Provide suggestions / comments