• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यातील एअर फोर्स स्टेशन इथल्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये परीक्षा पे चर्चा 2024 निमित्त, चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Posted On: 23 JAN 2024 6:50PM by PIB Mumbai

पुणे, 23 जानेवारी 2024

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आज पुण्यात, एअर फोर्स स्टेशन परिसरातल्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये परीक्षा पे चर्चा 2024 निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सीबीएसई, राज्य शासनाच्या शाळा, केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी ते दहावीपर्यंतच्या एकूण 100 विद्यार्थ्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतला, परीक्षा पे चर्चा 2024 चित्रकला स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या संकल्पनांमध्ये चांद्रयान मिशन, भारताचे क्रीडाक्षेत्रातील यश, आदित्य एल-1, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विकसनशील भारत, या विषयांव्यतिरिक्त एक्साम वॉरियर मधील परीक्षा मंत्र यांचा समावेश होता.

पुण्याचे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कलाकार ज्ञानेश्वर ढवळे, एफटीआयआयच्या कला दिग्दर्शिका गजाला परवीन आणि पुण्यातील सिम्बायोसिस शाळेतील कला शिक्षिका गीतांजली लोंढे यांचा या परीक्षक मंडळात समावेश होता. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि अभिनव कल्पनाशक्ती, संकल्पना स्पष्टपणे अभिव्यक्त करण्याची हातोटी, तांत्रिक उत्कृष्टता आणि चित्राचे एकूण सौन्दर्य यांचा विचार करण्यात आला होता.

  

स्पर्धेचा सांगता समारंभ, शाळेच्या सीसीए सभागृहात दुपारी दीड वाजता पार पडला. चंदननगर इथल्या एअर फोर्स शाळेतील, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सिद्रा सिद्दीकी हिने काढलेल्या चित्राला सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून निवडण्यात आले. तर दुसरा क्रमांक याच शाळेच्या इयत्ता दहावीच्या काव्या कोंडलकरने पटकावला. पीएम श्री केंद्रीय विद्यालयातील, इयत्ता नववीचा अनिकेत तोमरने तिसरा, तर लोहगावच्या  विखे पाटील मेमोरियल शाळेतील नववीची विद्यार्थिनी इशिता हांडा आणि पुण्याच्या दिघी इथल्या लष्करी शाळेतील नववीची विद्यार्थिनी रिद्धी खंडाळकर यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना, राष्ट्रीय स्वातंत्र्यसैनिकांची पुस्तके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली, तर उर्वरित 95 सहभागींना  परीक्षा योद्धा पुस्तकाची प्रत आणि डिजिटल प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनाचे, सर्व मान्यवर आणि सहभागींनी कौतुक केले.

 

* * *

PIB Pune | R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998900) Visitor Counter : 72

Read this release in: English

Link mygov.in